जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत आवश्यक

जमिनीच्या सुपीकतेसह उत्पादकता वाढीसाठी शेणखत आवश्यक
जमिनीच्या सुपीकतेसह उत्पादकता वाढीसाठी शेणखत आवश्यक

कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व पिकांच्या लागवडीमध्ये शेणखत वापरण्याची शिफारस हमखास असली तरी शेणखतांचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जैविक प्रक्रिया करून शेणखताचा वापर केल्यास अधिक फायदे मिळतात.

शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. अशा स्थितीमध्ये पिकाच्या पांढऱ्या मुळीची चांगली वाढ होऊन, जमिनीतून अन्नद्रव्याचे शोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यल्प असते. मात्र, त्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू उदा. ॲझेटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू वाढतात. नियमित शेणखतांचा वापरामुळे  जमिनीत गांडुळांचे प्रमाणही वाढते.   जमिनीतून वापरलेल्या जैविक कीडनाशकांचे उदा. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझिम आणि जैविक खते, उदा. ॲझेटोबॅक्‍टर व नत्रासह अन्य अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढते. पाांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होते. परिणामी झाडातील संजीवकांची निर्मिती आणि अन्नद्रव्याचे वहन उत्तम होते.   जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात.

 शेणखत वापरताना...

  • शेणामध्ये हुमणी, भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याची अळी अशा अवस्था आढळतात. विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे शेतात पसरून पिकास नुकसान पोचवितात. हुमणीसह विविध भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी कडक उन्हाळ्यामध्ये हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. शेणखत जमिनीत मिसळताना भुंगेऱ्यांच्या व हुमणीच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
  • काही शेतकरी शेतात शेळ्या-मेंढ्या गोलाकार रिंगणात बसवतात. अशा भागामध्ये पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो.
  • कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी उदा. मररोग, मूळकूज, करपा, सडया रोग यासाठी कारणीभूत, बुरशी वाढू शकते. पूर्णपणे कुजलेले शेणखत वापरावे.
  • जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणीआधी हेक्‍टरी ५ ते १० टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी १०-१५ टन शेणखत मिसळावे.
  • भाजीपाला रोपवाटिकेमध्ये गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करावा.
  • शेणखतावरील प्रक्रिया

  • शेणखत चांगले कुजवण्यासाठी कंपोस्टिंग कल्चर वापरावे. प्रति टन शेणखतासाठी एक किलो/ लिटर कल्चर पुरेसे ठरते.
  • शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा. शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझिम ॲनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा. त्यात ओलसरपणा राहील इतके पाणी शिंपडावे.
  • म्हशी, गाईंच्या गोठ्यातून आणल्या जाणाऱ्या शेणात प्लॅस्टिक बाटल्या, इंजेक्‍शन सिरींज, सुया, टाकाऊ पदार्थ, काच, प्लॅस्टिक हातमोजे, नळ्या आढळतात. त्या काढून टाकाव्यात.
  • भाजीपाला पिकात अर्धवट कुजलेले शेणखत मिसळल्यास शेण कुजताना निर्माण झालेल्या उष्णतेमुळे  पांढऱ्या मुळ्यांसह उपयुक्त सूक्ष्मजीव, गांडुळे, होऊ शकतो. असे शेणखत वापरणे टाळावे.
  •  ः विजय राऊत, ९८३४२०१४४२ (एकात्मिक पद्धती शेती संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com