agricultural stories in Marathi, market trende of varoius crops | Agrowon

मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कल

डॉ.अरूण कुलकर्णी
शुक्रवार, 24 मे 2019

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. हळदीच्या ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १५ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाचे मे-जूनमध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

सध्याच्या काळात उशिरा पाऊस येण्याचा अंदाज लक्षात घेता किमतींचा कल वाढीचा असण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सोयाबीन, गहू व गवार बी वगळता इतरांचे भाव वाढले. हळदीमध्ये मोठी (८ टक्क्यांहून अधिक वाढ) वाढ झाली. पुढील काही महिन्यांत सर्व पिकांचे भाव वाढतील.पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. हळदीच्या ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १५ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाचे मे-जूनमध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

सध्याच्या काळात उशिरा पाऊस येण्याचा अंदाज लक्षात घेता किमतींचा कल वाढीचा असण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सोयाबीन, गहू व गवार बी वगळता इतरांचे भाव वाढले. हळदीमध्ये मोठी (८ टक्क्यांहून अधिक वाढ) वाढ झाली. पुढील काही महिन्यांत सर्व पिकांचे भाव वाढतील.पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार ः
मका (रब्बी)
रब्बी मक्याच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात रु. १,८७७ ते रु. १,९४२ या दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. १,९०४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. १,९५० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. १,८५० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे.

साखर
साखरेच्या (जून २०१९) किमती एप्रिलमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१६४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,९०९ ते रु. ३,७१५). गेल्या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ३,७७१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने घसरून रु. ३,७१२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८४७ वर स्थिर आहेत. २१ मे रोजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,७३३, ३,७६५, ३,६९०, ३,५०८, ३,४४५ व ३,४४५ भाव होते.  

हळद
हळदीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ६,८८४ ते रु. ६,४३०). गेल्या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७२८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ८.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,२८० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,७४८ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,७६०). वाढत्या भावाच्या अपेक्षेने आवक कमी आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण निर्यात मागणीसुद्धा वाढत आहे. सध्या त्यामुळे तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गहू
गव्हाच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात वाढत होत्या. (रु. १,८६२ ते रु. १,९२८).   गेल्या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी वाढून रु. २,०२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने कमी होऊन रु. १,९९७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९८९ वर  आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०५७). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). मे-जूनमध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५८२ ते रु. ४,३७८). गेल्या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८१ वर आल्या होत्या. याही सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,४१४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,४३० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५४९). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय  किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,६२० ते रु. ४,३७४). गेल्या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,५२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ४, ६८४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,५७४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.५  टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,७५१). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आवक त्या प्रमाणात होत नाही. शासनाकडे पुरेसा साठा आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).
(टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).    
    
 - arun.cqr@gmail.com


इतर अॅग्रोमनी
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...