agricultural stories in Marathi, market trends in MCX,NCDEX | Agrowon

कापूस, मक्याच्या मागणीत वाढ

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 29 मार्च 2019

सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे. चीन सध्या आपल्याकडून कापसाची आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. पण अमेरिका व चीनमधील समझोता होण्यावर आपली निर्यात अवलंबून असेल.

सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे. चीन सध्या आपल्याकडून कापसाची आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. पण अमेरिका व चीनमधील समझोता होण्यावर आपली निर्यात अवलंबून असेल.

नि वडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.  त्यामुळे येत्या मॉन्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.  मात्र या सर्वांचा अजून फारसा प्रभाव किमतींवर दिसत नाही. एप्रिल महिन्यात एल निनो संबंधी निश्चित माहिती उपलब्ध होईल. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू, हळद व सोयाबीन यांचे भाव घसरले. शासनाने हळद खरेदी करावी, अशी मागणी जोर धरीत आहे. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. हळदीची मागणी अजून मर्यादित आहे. उत्पादन वाढलेले आहे.  मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. चीन सध्या आपल्या देशातून कापसाची आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. पण अमेरिका व चीनमधील समझोता होण्यावर आपली निर्यात अवलंबून आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील.  

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि
एमसीएक्समधील किमतीतील चढउतार ः 
मका
रब्बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. १,४६२ ते रु. १,५५०) या सप्ताहात त्या १,७४२ रुपयांवर स्थिर आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,१२५ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.

साखर  
साखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारी मध्ये वाढत होत्या (रु. ३,००५ ते रु. ३,११९).  सध्या त्या रु. ३,११९ वर स्थिर आहेत.  स्पॉट (कोल्हापूर) किमती ३,१४४ रुपयांवर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९१४ ते रु. ३,६६१).  या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६२ वर आल्या आहेत.  स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७९८ वर आल्या आहेत.  हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). २६ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,७२२, ३,७७२, ३,८१६, ३,८६०, ३,९६४ व ३,५६० भाव होते.
 
हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,३९८ ते रु. ६,१४८).  गेल्या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,१३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या किंचित घसरून रु. ६,१२६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,०१८ वर घसरल्या आहेत.  जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ६,३७६). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण निर्यात मागणी स्थिर आहे.

गहू
गव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २,०८७ ते रु. १,८०८). या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून १,८६० रूपयांवर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९४७ वर आल्या आहेत. जून  २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,९१९). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमी भावाच्या जवळ असतील.

गवार बी  
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४२१ ते रु. ४,१८४). गेल्या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,४३७ वर आल्या आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,४०९ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५२६).  खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा  
हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती  १४ फेब्रुवारीनंतर घसरत  होत्या. (रु. ४,३२९ ते रु. ४,११४).  गेल्या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२  टक्क्यांनी वाढून ४,२५६ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१०० वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३३५). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस  
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्या नंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. २१,४८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,६८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,५२७ वर आल्या आहेत.  जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,२०० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. निर्यात मागणी अजून तरी वाढत आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...