agricultural stories in Marathi, market trends in MCX,NCDEX | Agrowon

रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 3 मे 2019

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू, सोयाबीन, गवार बी व हरभरा यांचे दर घसरले. कापसाच्या किमतींत अजूनही तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मक्याचे दर घसरतील. इतरांचे मात्र वाढतील.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू, सोयाबीन, गवार बी व हरभरा यांचे दर घसरले. कापसाच्या किमतींत अजूनही तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मक्याचे दर घसरतील. इतरांचे मात्र वाढतील.

देशातील निवडणुकांचे मतदान बऱ्यापैकी संपत आले आहे. भारतीय हवामान खात्याने मॉन्सून सरासरी एवढाच होण्याची शक्यता वर्तवली आहे.  रब्बीची आवक आता सुरू होत आहे.  यापुढे ती वाढणार आहे. त्यामुळे या पुढे कापसाखेरीज इतर वस्तूंची मागणी कमी होऊन पुरवठा वाढणार आहे. त्याचा परिणाम यापुढे किमती नरम राहण्यावर होणार आहे. कापसातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

१ मे पासून सप्टेंबर डिलिवरीसाठी रब्‍बी मका, हळद व गहू यांचे ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी हरभऱ्याचे, नोव्हेंबर डिलिवरीसाठी गवार बी चे आणि डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोयाबीनचे व्यवहार सुरू झाले आहेत.

अमेरिकेच्या कृषी खात्याने पुढील वर्षी (ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०१२०) भारतातील सोयाबीनचे उत्पादन या वर्षीपेक्षा ८ टक्क्याने वाढून ३८० लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज केला आहे. अर्थात, या अंदाजामागे मॉन्सून पाऊस सर्व-साधारण असेल अशी अपेक्षा आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू, सोयाबीन, गवार बी व हरभरा यांचे दर घसरले. (आलेख १ पाहावा).  कापसाच्या किमतींत अजूनही तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मक्याचे दर घसरतील. इतरांचे मात्र वाढतील. (आलेख २ पाहावा).

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार ः

मका
रब्बी मक्याच्या (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. १,५७० ते रु. १,८००).  आत्ता त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने घसरून रु. १,८४८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,८४० वर आल्या आहेत. हमी दर  रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी दरापेक्षा अधिक आहेत.  मागणी चांगली आहे. रब्‍बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी दराच्या आसपास राहतील.

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात रु. ३,६९५ व रु. ३,८२६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८०६ वर आल्या आहेत. हमी दर  रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ३० एप्रिल रोजी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे  रु. ३,७१५, ३,७५७, ३,८०९, ३,७५०, ३,५२३ व ३,४९३ दर  होते.  

हळद
हळदीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ६,४९२ ते रु. ६,०९२).  गेल्या सप्ताहात त्या रु. ६,३७६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. ६,४३८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४०० वर  आल्या आहेत.  जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ६,६४०).  आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण मागणीसुद्धा वाढत आहे.

गहू  
गव्हाच्या (मे २०१९) किमती मार्च महिन्याअखेर घसरल्या. (रु. १,८६२ ते रु. १,७९७). या सप्ताहात त्या रु. १,८९० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९१९ वर  आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,९१५).  नवीन हमी दर रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). मे-जून मध्ये  बाजार भाव हमी दराच्या जवळ असतील.

साखर
साखरेच्या (मे २०१९) किमती  मार्च  मध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४३ वर आलेल्या आहेत.  भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती  मार्च महिन्यात वाढत  होत्या (रु. ४,२५२ ते रु. ४,४९०). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,३२९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,३३७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४५०). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. २१,२०० ते रु. २१,९६०). गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २२,३३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २२,४६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,१७४ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,८९० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे.  निर्यात मागणी अजून तरी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा वाढत आहेत. वाढीचा कल यापुढे टिकण्याचा संभव आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,१८६ ते रु. ४,४००). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,३२७ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२११ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.३  टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३५). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी दर
रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

(टीप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठी).

डॉ. अरुण कुलकर्णी

arun.cqr@gmail.com


इतर अॅग्रोमनी
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...