मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढ

मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढ
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढ

अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या करांमुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढले आहेत. कापसाची निर्यात मात्र कमी झाली आहे, आयात वाढती आहे. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आहेत. पुढील काही महिन्यांत बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढतील; कापसाच्या भावात घट संभवते.

देशातील निवडणुकांमधील अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्कायमेट या संस्थेने १४ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार भारतात या वर्षी सरासरीपेक्षा ७ टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळात तो ४ जून रोजी येण्याचा अंदाज असून मध्य भारतात पाऊस ९ टक्क्याने कमी असेल असा सध्याचा अंदाज आहे. यामुळे व अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढवलेल्या करांमुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढले आहेत. कापसाची निर्यात मात्र कमी झाली आहे, आयात वाढती आहे. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आहेत. (आलेख १). पुढील काही महिन्यांत बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढतील; कापसाच्या भावात घट संभवते. (आलेख २). पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार

मका (रब्बी) रब्बी मक्याच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात रु. १,८७७ ते रु. १,९४२ या दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्याने वाढून रु. १,९०४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,८०८ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो  रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती    सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत.  मागणी चांगली आहे.

साखर साखरेच्या (जून २०१९) किमती एप्रिलमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१७० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.

  सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,९०९ ते रु. ३,७१५). या सप्ताहात त्या २ टक्क्याने वाढून रु. ३,७७१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८४५ वर आल्या आहेत. १४ मे रोजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,८०४, ३,८३७, ३,६८७, ३,५१०, ३,४४५ व ३,४४५ भाव होते.  

हळद हळदीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ६,८८४ ते रु.  ६,४३०). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७२८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५२५ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९३८). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण निर्यात मागणीसुद्धा वाढत आहे.

गहू गव्हाच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात वाढत होत्या. (रु. १,८६२ ते रु. १,९२८).   या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी वाढून रु. २,०२० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०८२). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). मे-जूनमध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५८२ ते रु. ४,३७८). गेल्या सप्ताहात त्या रु. ४,५०१ वर  आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४५९ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६४२). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,६२० ते रु. ४,३७४). गेल्या सप्ताहात त्या रु. ४,३७२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,५२० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४११ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६२६). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आवक पण वाढणारी आहे. शासनाकडे पुरेसा साठा आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात रु. २२,३०० व रु. २२,८१० दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. २२,२१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,१६४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,१०० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण निर्यातीतील घट व आयातीमधील वाढ याचा परिणाम किमतींवर होत आहे.

टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी. ई-मेल ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com