agricultural stories in Marathi, market trends in NCDEX, MCX | Agrowon

मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढ
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 17 मे 2019

अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या करांमुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढले आहेत. कापसाची निर्यात मात्र कमी झाली आहे, आयात वाढती आहे. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आहेत. पुढील काही महिन्यांत बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढतील; कापसाच्या भावात घट संभवते.

अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या करांमुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढले आहेत. कापसाची निर्यात मात्र कमी झाली आहे, आयात वाढती आहे. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आहेत. पुढील काही महिन्यांत बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढतील; कापसाच्या भावात घट संभवते.

देशातील निवडणुकांमधील अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्कायमेट या संस्थेने १४ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार भारतात या वर्षी सरासरीपेक्षा ७ टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळात तो ४ जून रोजी येण्याचा अंदाज असून मध्य भारतात पाऊस ९ टक्क्याने कमी असेल असा सध्याचा अंदाज आहे. यामुळे व अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढवलेल्या करांमुळे बहुतेक शेतीमालाचे भाव वाढले आहेत.
कापसाची निर्यात मात्र कमी झाली आहे, आयात वाढती आहे. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आहेत. (आलेख १). पुढील काही महिन्यांत बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढतील; कापसाच्या भावात घट संभवते. (आलेख २). पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार

मका (रब्बी)
रब्बी मक्याच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात रु. १,८७७ ते रु. १,९४२ या दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्याने वाढून रु. १,९०४ वर आल्या आहेत.
स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,८०८ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो  रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती    सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत.  मागणी चांगली आहे.

साखर
साखरेच्या (जून २०१९) किमती एप्रिलमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१७० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.

  सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,९०९ ते रु. ३,७१५). या सप्ताहात त्या २ टक्क्याने वाढून रु. ३,७७१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८४५ वर आल्या आहेत. १४ मे रोजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,८०४, ३,८३७, ३,६८७, ३,५१०, ३,४४५ व ३,४४५ भाव होते.  

हळद
हळदीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ६,८८४ ते रु.  ६,४३०). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७२८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५२५ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९३८). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण निर्यात मागणीसुद्धा वाढत आहे.

गहू
गव्हाच्या (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात वाढत होत्या. (रु. १,८६२ ते रु. १,९२८).   या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी वाढून रु. २,०२० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०८२). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). मे-जूनमध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५८२ ते रु. ४,३७८). गेल्या सप्ताहात त्या रु. ४,५०१ वर  आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४५९ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६४२). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,६२० ते रु. ४,३७४). गेल्या सप्ताहात त्या रु. ४,३७२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,५२० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४११ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑगस्ट २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६२६). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आवक पण वाढणारी आहे. शासनाकडे पुरेसा साठा आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१९) किमती एप्रिल महिन्यात रु. २२,३०० व रु. २२,८१० दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. २२,२१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,१६४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,१०० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण निर्यातीतील घट व आयातीमधील वाढ याचा परिणाम किमतींवर होत आहे.

टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी.
ई-मेल ः arun.cqr@gmail.com

 

इतर अॅग्रोमनी
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...