त्वचा अन्‌ हृदयविकारात करवंद उपयुक्त

करवंदाची कच्ची फळे
करवंदाची कच्ची फळे
  • स्थानिक नाव    : करवंद, डोंगरची काळी मैना         
  • शास्त्रीय  नाव    : Capparis carandas       
  • इंग्रजी नाव    : Karonda, Indian wild black                     berry, Bengal Current, Carandas Plum       
  • संस्कृत नाव    : करमर्दक         
  • कुळ    : Apocynaceae       
  • उपयोगी भाग    : कोवळी फळे, पिकलेली फळे, फुले         
  • उपलब्धीचा काळ     : कोवळी फळे व फुले : फेब्रुवारी-एप्रिल,  पिकलेली फळे:  एप्रिल- जून (पाऊस पडेपर्यंत)       
  • झाडाचा प्रकार    : काटेरी झुडूप         
  • अभिवृद्धी     : बिया, जुन्या फांद्या        
  • वापर    :  भाजी, लोणचे, सरबत
  • आढळ 

    करवंदाचे मोठे काटेरी सदाहरित झुडूप महाराष्ट्रात पानझडी तसेच निमसदाहरित जंगलात आढळते. मोठ्या जंगलात डोंगरकपरीला, माळरानात तसेच रस्त्याच्या कडेला करवंदाच्या दाट जाळ्या पसरलेल्या दिसतात.  

    वनस्पतीची ओळख

  • करवंदाचे खोड लहान, थोडे खरबरीत असून फांद्या अनेक, पसरणाऱ्या असतात. साल फिकट तपकिरी रंगाची असून खोडाच्या प्रत्येक पेरावर दणकट, तीक्ष्ण १.५ ते २ लांबीच्या काट्यांचे जोडी असते.
  • पाने साधी, समोरासमोर, ४ ते ७.५ सें.मी. लांब व ३ ते ५ सें.मी. रुंद, लंबअंडाकृती, गुळगुळीत, चकाकणारी, गडद हिरव्या रंगाची. खोड, फांद्या व पानामध्ये पांढरा दुधी रंगाचा चीक असतो.
  • फुले लहान, सुवासिक, पांढरी, नियमित, फद्याच्या टोकावर गुच्छात येणारी. फळे गोल, थोडीशी लांबट आकाराची, १.५ ते २.५ सें.मी. लांब. पिकलेली फळे काळ्या रंगाची असतात.
  • बिया २ ते ४ गोलाकार चपट्या लालसर, फिक्कट गुलाबी गरात लगडलेल्या असतात.
  •   औषधी उपयोग करवंदच्या फळामध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्वचाविकार व हृदयविकारात करवंदाची फळे सेवन करावीत. अपचनावर उपाय म्हणून करवंदाचे सरबत प्यावे.

    पाककृती   कोवळ्या करवंदाच्या फळाची भाजी साहित्य: २-३ वाट्या कोवळी करवंदाची फळे, २-३ बारीक चिरलेले कांदे, ४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणेपूड, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ व गूळ. कृती: प्रथम करवंदाची फळे स्वच्छ धुऊन हळूवार ठेचून त्यातील बिया काढून घ्याव्या. नंतर फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण मंद आचेवर शिजवून नंतर लाल मिरची पावडर आणि हळद टाकून चांगले परतवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ व गूळ घालून झाकण ठेऊन मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.      पिकलेल्या करवंदाचे सरबत साहित्य : ४-५ वाट्या पिकलेली करवंद, चवीपुरते मीठ व साखर. कृती: प्रथम करवंद स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. एका पसरट चाळणीत घेऊन त्याखाली एक पातेले ठेऊन दाबून त्यातून रस काढून घ्यावा. वर उरलेला चोथा एकत्र करून त्यात थोड पाणी  घालून थोडावेळ तसाच ठेवावा. व नंतर मूळ रसात गाळून टाकावा. चवीप्रमाणे मीठ व साखर मिसळावी. हे सरबत लगेच तयार करून पिण्यासाठी उत्तम. साठवून ठेऊ नये. करवंदापासून पौष्टिक आणि टिकाऊ असे लोणचे बनवता येते.  

    ई-मेल : ashwinichothe7@gmail.com (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com