agricultural stories in Marathi, medical use of Malabar Ebony | Agrowon

जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्त
अश्विनी चोथे
शनिवार, 30 मार्च 2019

टेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर उंच वाढलेले आढळतात. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, सातारा तसेच विदर्भातील काही भागांत याचे वृक्ष जंगलात वाढलेले दिसतात.

टेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर उंच वाढलेले आढळतात. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, सातारा तसेच विदर्भातील काही भागांत याचे वृक्ष जंगलात वाढलेले दिसतात.

 • स्थानिक नाव    :     टेंबुरणी, टेंभुरुन, टेभ्रूनी,
 •             तेंदू , टेमरू, टेंभूरणी   
 • शास्त्रीय  नाव    : Diospyros                 melanoxylon Roxb.
 • इंग्रजी नाव     :     Malabar Ebony,  Ebony Persimmon,      East Indian Ebony       Coromandel Ebony,    Black Ebony, Ebony,        
 • संस्कृत नाव     :     दीर्घपत्रक, तिंदुका        
 • कुळ    :     Ebenaceae       
 • उपयोगी भाग    :     पिकलेली फळे        
 • उपलब्धीचा काळ    :     एप्रिल-जून          
 • झाडाचा प्रकार    :     झाड       
 • अभिवृद्धी     :     बिया        
 • वापर    :     पिकलेले फळे खाण्यासाठी

वनस्पतीची ओळख  

 • टेंभुरणीची पानझडी वृक्ष साधारण २० ते २५ मीटर उंच १.६ ते २ मीटर घेराचे वाढतात.
 • झाडाची साल चॉकलेटी किंवा काळ्या रंगाची असून, तडे गेलेली असते. झाडाला अनेक फांद्या असून पाने साधी, एका आड एक येणारी, दोन्ही बाजूने मऊसर,  २० ते ३०  सें.मी लांब व ३ ते ५ सें.मी रुंद असून फिक्कट हिरव्या रंगाची असतात.
 • पाने बिडी बनवण्यासाठी वापरली जातात. फुले लहान, १ ते १.५ सें.मी लांब, फिक्कट पिवळ्या रंगाची असून पानाच्या बेचक्यातून येणारी असतात.
 • फळे गोल, हिरवी, चेंडूच्या आकाराची, पिकल्यावर आकर्षक नारंगी रंगाची, आतील गर पिवळा आणि खाण्यासाठी योग्य असतात. बिया ६ ते ८, चकाकणाऱ्या, चॉकलेटी रंगाच्या असतात.
 • औषधी उपयोग
 • टेंभुरणीची कच्ची फळे जुलाब, हगवण यांसारख्या आजारांवर उपयुक्त आहे.

तोंड आल्यावरही कच्च्या फळांचा उपयोग केला जातो.
टीप : पिकलेली फळे खाण्यासाठी वापरतात. तर काही भागांत पानांचा वापर विडी बनवण्यासाठी केला जातो. औषधी उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत.

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...