agricultural stories in Marathi, medical use of Schrebera swietenioides Roxb | Page 2 ||| Agrowon

अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा
अश्विनी चोथे
शनिवार, 27 एप्रिल 2019
 • स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी, नकटी        
 • शास्त्रीय नाव     : Schrebera swietenioides Roxb       
 • कूळ    : Oleaceae       
 • इंग्रजी नाव     : Weaver's Beam Tree        
 • संस्कृत नाव     :  कस्तपाटोळा, गोलीधा, घंटापटली   उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळा देठ       
 • उपलब्धीचा काळ    : पाने- फेब्रुवारी-एप्रिल, फुले- मार्च-एप्रिल        
 • झाडाचा प्रकार    : झाड       
 • अभिवृद्धी     : बिया        
 • वापर    : भाजी   

आढळ

 • स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी, नकटी        
 • शास्त्रीय नाव     : Schrebera swietenioides Roxb       
 • कूळ    : Oleaceae       
 • इंग्रजी नाव     : Weaver's Beam Tree        
 • संस्कृत नाव     :  कस्तपाटोळा, गोलीधा, घंटापटली   उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळा देठ       
 • उपलब्धीचा काळ    : पाने- फेब्रुवारी-एप्रिल, फुले- मार्च-एप्रिल        
 • झाडाचा प्रकार    : झाड       
 • अभिवृद्धी     : बिया        
 • वापर    : भाजी   

आढळ
मोखा हा पानझडी वृक्ष महाराष्ट्रातील जंगलात वाढलेले दिसतात. पालघर, ठाणे, रायगड तसेच नगर, पुणे, नाशिक या जिह्यातील डोंगराळ भागात मोख्याची झाडे काही प्रमाणात आढळतात. काही ठिकाणी शेताच्या बांधावरही या झाडांची लागवड केली जाते.   

वनस्पतीची ओळख

 • मोख्याचे झाड साधारण १५ ते २० मीटर उंच वाढते. सालीचा रंग काळपट तपकिरी-करड्या रंगाचा असून, पाने अनेक, संयुक्त आकाराची असून फिक्कट हिरव्या रंगाची असतात. ३ ते ४ पर्णिकांच्या जोड्या समोरासमोर येणाऱ्या व एक पर्णिका टोकाशी येते.
 • देठ साधारण ३ ते ३० सें.मी. लांब असते. फुले द्विलिंगी, पिवळसर तपकिरी रंगाच्या छटा असणारी व गुच्छ्यात येणारी असतात. फुले रात्रीच्या वेळी उमलणारी, सुगंध देणारी व नरसाळ्याच्या आकाराची असतात. ८ ते १२ मी. मी. पाकळ्या, तपकिरी रंगाच्या ग्रंथीयुक्त असतात. फळे ५ सें. मी. लांब व २.५ सें. मी. रुंद असून थोडी लांबट आकाराची असतात.
 • फळे कडक, वरून खरखरीत व ४ बियायुक्त असतात. बिया पंखाच्या आकाराच्या असतात.
 • झाडाची पाने साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात पूर्णपणे गळून जातात. तर मार्च एप्रिलमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. या कोवळ्या पानाचा वापर काही भागात भाजी करून खाण्यासाठी केला जातो.   

औषधी उपयोग

 • झाडाचे मूळ, खोड, साल व पाने औषधासाठी वापरली जातात.
 • मूळ, साल व पाने चवीला कडू असून झणझणीत, पाचक, भूक वाढवणारे, मलावरोधक, रेचक तसेच कृमिनाशक असून अनेक आजारांवर उपयुक्त आहे. अपचन, त्वचारोग, कुष्ठरोग, गळू अशा अनेक व्याधींवर वापरले जातात.
 • सालीचा वापर गळ्याच्या रोगावर, रक्तक्षय, मधुमेहावर तसेच कुष्ठरोगावर उपाय करण्यासाठी वापरतात.
 • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.

कोवळ्या पाल्याची भाजी
साहित्य : ३-४ वाट्या मोख्याचा कोवळा पाला, २-३ बारीक चिरलेले कांदे, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल व चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ.
कृती :  प्रथम मोख्याचा पाला स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला वाफवून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी व हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या व वाफवून पिळून घेतेलेले मोख्याची पाने टाकून चांगले परतून घ्यावे. ही भाजी ५ मिनटे झाकण ठेऊन शिजवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ मिसळावे.

 

ई-मेल : ashwinichothe7@gmail.com
(क. का. वाघ उद्यान विद्या
महाविद्यालय, नाशिक)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...