agricultural stories in Marathi, medicinal use of Wild Jujube | Agrowon

हिरड्या, दातदुखीवर तोरण उपयुक्त
अश्विनी चोथे
शनिवार, 11 मे 2019
 • स्थानिक नाव    :    तोरण, तोरणी   
 • शास्त्रीय नाव    :    Ziziphus rugosa l.       
 • इंग्रजी नाव    :    Wild Jujube, Kotta, Wrinkled Jujube,        Zunna Berry    
 • संस्कृत नाव    :    बदरा        
 • कुळ    :    Rhamnaceae       
 • उपयोगी भाग    :    पिकलेले फळ   
 • उपलब्धीचा काळ    :    पिकलेले फळ : एप्रिल-मे        
 • झाडाचा प्रकार    :    काटेरी झुडूप    
 • स्थानिक नाव    :    तोरण, तोरणी   
 • शास्त्रीय नाव    :    Ziziphus rugosa l.       
 • इंग्रजी नाव    :    Wild Jujube, Kotta, Wrinkled Jujube,        Zunna Berry    
 • संस्कृत नाव    :    बदरा        
 • कुळ    :    Rhamnaceae       
 • उपयोगी भाग    :    पिकलेले फळ   
 • उपलब्धीचा काळ    :    पिकलेले फळ : एप्रिल-मे        
 • झाडाचा प्रकार    :    काटेरी झुडूप    
 • अभिवृद्धी    :    बिया         
 • वापर    :    पिकलेले फळ, बिया भाजून

आढळ

तोरणाचे काटेरी झुडूप महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम घाटातील ठराविक जंगलात वाढलेले दिसते. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, तसेच पश्चिम घाटातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तोरणाचे झुडूप रस्त्याच्या कडेला, डोंगरकपारीला वाढलेले दिसते. काही भागात या काटेरी झुडपांचा शेताच्या भोवती तसेच परसबागेला कुंपण बनविण्यासाठी वापर केला जातो. साधारण एप्रिल-मे महिन्यात स्थानिक लोक गावाच्या बाजारात पानाच्या द्रोणामध्ये तोरणाची पिकलेली गोड, मधुर अशी लहान लहान फळे विकायला घेऊन बसतात. या फळांना चांगली मागणी असते.

वनस्पतीची ओळख

 • तोरणाचे सदाहरित, काटेरी झुडूप साधारण ९ ते १० मीटरपर्यंत उंच वाढते. तांबूस, कोवळ्या फांद्यावर नाजूक लव असून एकेरी किंवा दुहेरी काटे असतात. काटे काहीशे मागे वाकलेले असून ३ ते ५ मी.मी. लांब असतात.
 • जुन्या फांद्या लालसर तांबूस रंगाच्या, खरखरीत, पट्टे किंवा खोबण्या असणाऱ्या असतात. पाने साधारण ८ ते १० सें.मी. लांब व ५ ते ८ सें.मी. रुंद असून मोठी व लंबवर्तुळाकार, काहीशी सुरकुतलेली व टोकाशी निमुळती तर कधी गोलाकार होत गेलेली असतात.
 • कोवळी पाने लालसर तांबूस रंगाची व लवयुक्त कालांतराने हिरवी होऊन ३ ते ५ शिरायुक्त असतात. पानाचा देठ साधारण १ ते १.५ सें.मी. लांब. १० ते २० फुले फांदीच्या टोकाशी किंवा पानाच्या देठाच्या बेचक्यातून गर्दीने येणारी असतात. फुलांना पाकळ्या नसून त्याचा बाह्यदल फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो तर देठ १ सें.मी. पर्यत लांब असते.
 • फळे ५ ते ८ मिमी व्यासाचे व लंबगोलाकार साधारण १ सें.मी. लांब असते. फळे कच्ची असताना लालसर हिरवी व पिकल्यावर पांढरी होतात. हा पांढरा गर खाण्यासाठी मधुर लागतो. फळाच्या आत एक लहान बी पांढरट रंगाची असते.
 • साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यांत तोरणाच्या काटेरी जाळीवर अगदी लहान लहान फुले येऊ लागतात. तर एप्रिल-मे महिन्यात ही फळे पिकून खाण्यास योग्य बनतात.

औषधी उपयोग

 • तोरणाच्या पानाचा, सालीचा, फुलांचा औषध म्हणून उपयोग होतो.
 • सालीपासून बनवलेली पेस्ट रक्ताभिसरण सुधारणा आणि वेदना कमी करण्यात येणारा शेक बनविण्यासाठी करतात. तसेच सुजलेल्या हिरड्या व दातदुखी थांबण्यासाठी लावतात.
 • सालीची पावडर शुद्ध तुपासोबत मिसळून तोंड आलेल्या जागी तसेच गालफुगीवर लावतात.

इतर उपयोग

 • तोरणाची पिकलेली पांढरी फळे खाण्यासाठी अतिशय मधुर असतात. त्याच्या बियाही भाजून  खाल्ल्या जातात. तोरणाचे लाकूड अतिशय मजबूत व कडक असते. त्यामुळे त्यापासून शेतीची अवजारे बनवली जातात. पानाचा वापर चिरुट बनवण्यासाठी केला जातो. तसेच शेळ्यांना चारा म्हणून केला जातो. हे झुडूप काटेरी असल्यामुळे अनेक ठिकाणी फांद्यांचा वापर कुंपणासाठी केला जातो.

ई-मेल : ashwinichothe7@gmail.com
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
त्वचारोग, मधुमेह, संधिवातावर बोंडारा... स्थानिक नाव ः बोंडारा     ...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....