agricultural stories in Marathi, more crop per hactor with more knowledge | Agrowon

शाश्वत शेतीसाठी ‘अधिक ज्ञान प्रति हेक्टर’

डॉ. गोविंद जाधव
शनिवार, 22 जून 2019

पर्यावरण टिकवून ठेवतानाच शेती शाश्वत करणे अत्यावश्यक ठरत आहे. कृषी निविष्ठांचा वापर करताना नावीन्यपूर्णता, कार्यक्षमता यासोबतच शाश्वतता आणि पर्यावरणपूरक विचार आवश्यक आहे. किमान निविष्ठांतून अधिक उत्पादकता मिळविण्यासाठी ‘अधिक ज्ञान प्रति हेक्टर’ हे तत्त्वही रुजविणे आवश्यक आहे.

पर्यावरण टिकवून ठेवतानाच शेती शाश्वत करणे अत्यावश्यक ठरत आहे. कृषी निविष्ठांचा वापर करताना नावीन्यपूर्णता, कार्यक्षमता यासोबतच शाश्वतता आणि पर्यावरणपूरक विचार आवश्यक आहे. किमान निविष्ठांतून अधिक उत्पादकता मिळविण्यासाठी ‘अधिक ज्ञान प्रति हेक्टर’ हे तत्त्वही रुजविणे आवश्यक आहे.

हरितक्रांतीच्या कालखंडात कृषी उत्पादनवाढीचे प्रमुख साधन हे तंत्रज्ञान होते. मात्र, गेल्या एक-दोन दशकांमध्ये प्रमुख पिके व पशुधनाची उत्पादकता वाढीचे दर स्थिर आहेत किंवा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या लोकसंख्येची अपेक्षित अन्नधान्य मागणी पूर्ण करण्यासाठी हा पीक उत्पादकता वाढीचा दर पुरेसा ठरणार नाही. कृषी आणि अन्न उत्पादनातील भविष्यातील वाढ सध्या लागवडीखाली असलेल्या शेतजमिनीच्या सधनतेतून किंवा सुपीकतेतून आली पाहिजे.
शेती अधिक उत्पादक करण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, शेती यंत्रे/अवजारे आणि इतर सामग्री याचा प्रति हेक्टरी अधिक वापर केला पाहिजे, हा समज खोलवर रुजला आहे. मात्र, अशा घटकांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणीय दुष्परिणाम वाढले. जमीन, पाणी व ऊर्जा यांसारखी प्रमुख नैसर्गिक संसाधने आहे तितकीच राहणार आहेत. उलट वाढत्या संख्येवर त्यांचे प्रमाण कमी होत जाणार आहेत. सोबतच वातावरणातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, गारपीट यांचे प्रमाण व वारंवारता वाढत आहे. या दोन्हीचा मेळ घालून शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल, हा आपल्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. त्यासाठी पारंपरिक घटकांऐवजी शाश्वतता आणणाऱ्या घटकांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ. दुर्मीळ निविष्ठांचा वापर करताना पारंपरिक विचारांनी चालणे परवडणारे नाही. त्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना वापरल्या तरच त्या दीर्घकाळ पुरतील. याला शाश्वत सधनता म्हणता येईल. एकाच वेळी शेतीची उत्पादकता वाढवणे आणि पर्यावरणीय परिणाम अत्यल्प ठेवणे ही जुळी प्रक्रिया राबवावी लागेल. त्याच्या प्रत्यक्ष कृतीसाठी पूर्वीच्या निविष्ठा प्रति हेक्टर तत्त्वाऐवजी अधिक ज्ञान प्रति हेक्टर हे तत्त्व अवलंबणे गरजेचे आहे.

हे कसे करता येईल, ते उदाहरणातून पाहू.

  • केवळ ठिबक सिंचन संच वापरल्याने फायदा होत नाही, तर त्यासोबत योग्य पाणी, विद्राव्य खते यांचा वापर केला पाहिजे. त्याला आच्छादनाची जोड दिल्यास पाणी देण्याची वारंवारता कमी करता येईल. त्यातून ऊर्जेची बचत साधता येईल.
  • कृषी परिसंस्थेमध्ये जैविक नियमन यंत्रणा आणि वनस्पती-सूक्ष्मजीव यांच्या परस्परपूरक क्रियांचा समावेश असतो. त्यामुळे (१) वनस्पती पोषक तत्त्वांचे शोषण, (२) रोगास प्रतिकार, (३) पिकांवरील किडींच्या नैसर्गिक शत्रूंची वाढ आणि (४) वनस्पतीची वाढ यांना प्रोत्साहन मिळते. या सूक्ष्मजीवांच्या उपयोगातून आपले कृत्रिम खते आणि कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होऊ शकेल.
  • जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढविणे, आच्छादन पिकांचा वापर, किमान मशागत, सुधारित पीक फेरपालट आणि सुधारित चराई अशा कृषी जमीन व्यवस्थापन पद्धती वापराव्या लागतील. त्यातून मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून सुपीकता (कस) आणि पाणी धारण क्षमता वाढू शकते. अशा जमीन व्यवस्थापन पद्धतीचा विद्यमान शेतीक्षेत्रावर व्यापक अवलंब केल्यास वातावरणातील कर्ब वायूची (CO२) तीव्रता कमी होऊन शतकांच्या अखेरीपर्यंत जागतिक तापमान ०.२६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्याची क्षमता आहे. (संदर्भ ः अॅलेग्रा मेयर व सहकारी, २०१८)
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असून, त्यांच्यामध्ये उत्पादकता वाढवण्यासोबत व्यापार करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. दर्जेदार उत्पादन, कापणीनंतर हाताळणी, पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन श्रृंखला यासाठी शाश्वत शेतीसाठी अधिक ज्ञान प्रति हेक्टर हे तत्त्व गावपातळीपर्यंत पोचवले पाहिजे. या ज्ञानामुळे गरीब शेतकरी बाजारपेठांशी जोडले जातील. त्यातून त्यांच्या फायद्यामध्ये वाढ होईल.
  • भविष्यात संसाधने दुर्मीळ होत जाणार आहेत. बदलत्या पर्यावरणीय आणि आर्थिक पार्श्वभूमीवर कृषी आणि अन्न उत्पादन आव्हान अधिक जटिल होणार आहे. त्यासाठी जैवविविधता, कार्यक्षमता, लवचिकता, एकत्रीकरण आणि उत्पादनक्षम तंत्रज्ञान व ज्ञान शेतीत आले पाहिजे. यासाठी देशातील कृषी संशोधन आणि विस्तार शिक्षण संस्थांनी खालील उपाययोजनांवर काम सुरू केले पाहिजे.
  1. शेतीमध्ये शाश्वतता आणण्यासाठी विविध पर्याय एकत्रित आणणे.
  2. शाश्वत सधनतेचा निर्देशक विकसित करणे.
  3. शाश्वत सधनता वाढविण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करणे.
  4. कृषी ज्ञानावर आधारीत अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे.

डॉ. गोविंद जाधव, ९८९०९५४२३१
(माजी संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...