agricultural stories in Marathi, Mushroom Cultivation - A Pathway to Economic Sustainability in Doon Valley of Uttarakhand | Page 2 ||| Agrowon

डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी उत्पादनातून घेतली झेप

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

२० किलो प्रति दिन उत्पादनापासून सुरू केलेल्या या उद्योगामध्ये हिरेशा यांनी १० ए.सी. खोल्यासह अत्याधुनिक सुविधा, यंत्रे यासह १००० किलो प्रति दिन पर्यंत झेप घेतली आहे. आता त्या संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेतात.

अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शाश्वत उत्पन्नाचा एक स्रोत तयार होत आहे. या नव्या क्षेत्राकडे पारंपरिक शेतकऱ्यांबरोबरच नोकरी पेशा सोडून नव्या उद्योगामध्ये उतरणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. डेहराडून येथील चार्बा गावातील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कु. हिरेशा वर्मा यांचेच यशस्वी उदाहरण आहे. त्यांच्या अळिंबी उत्पादक कंपनीचे नान ‘हॅनअॅग्रोकेअर’ असे आहे.

या क्षेत्रामध्ये पारंपरिक भात, गहू आणि भाजीपाला उत्पादन केले जाते. यातून शिल्लक राहणाऱ्या अवशेष जाळण्याचा पारंपरिक प्रघात आहे. तो पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने त्याच्या वापरातून नवी उत्पादने विकसनावर भर दिला जात आहे. योग्य वातावरण तयार केल्यास या अवशेषांवर अळिंबीची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. या उद्योगातून चांगला फायदा मिळू शकतो, हे लक्षात आल्यानंतर हिरेशा यांनी आपली चांगली नोकरी सोडून २०१३ मध्ये कृषी क्षेत्रात उडी घेतली.

प्रारंभी घरातील शिल्लक खोल्यांमध्ये २५ पिशव्या भरून ओयस्टर अळिंबी उत्पादनाला सुरुवात केली. केवळ दोन हजार रुपये गुंतवून त्यातून पाच हजार रुपये मिळाले. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. मग आणखी माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी डेहराडून येथील कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतले. पुढे २०१४ मध्ये सोलन येथील अळिंबी संशोधन संचालनालयामध्ये आणखी एक प्रशिक्षण घेतले. डेहराडून (हिमाचल प्रदेश) येथील अळिंबी विभागाकडून अळिंबीचे बीज मिळवले. भांडवलासाठी बॅंक आणि नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन आणि नॅशनल हॉर्टीकल्चर ब्युरो यांच्याशी संपर्क केला. प्रत्यक्ष उत्पादनासाठी स्वतःच्या चार्बा या गावात बांबूच्या तीन झोपड्या उभारल्या. या प्रत्येक झोपडीमध्ये ५०० या प्रमाणे एकूण १५०० पिशव्या भरल्या. या प्रत्येक टप्प्यात अनेक अडचणी आणि आव्हाने आली तरी हिरेशा यांनी इच्छाशक्ती आणि संयमाने त्यावर मात केली.

या झोपड्यातून १५ टक्के उत्पादन मिळाले. त्यानंतर त्यांनी ओयस्टर अळिंबीच्या दोन वेळा उत्पादन घेतले. दोन वर्षामध्ये वातावरण चांगले असल्याच्या स्थितीमध्ये हंगामी उत्पादन घेताना वेगवेगळ्या अळिंबी प्रजाती वाढवून पाहिल्या. सुमारे चार वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेण्याइतका आत्मविश्वास मिळाला.

प्रशिक्षण आणि व्यवसायातील वाढ
अळिंबी उत्पादन आणि प्रक्रिया विषयातील वेगवेगळी नावीन्यपूर्ण तंत्रे शिकण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यातून स्वतःचे कंपोस्ट आणि बीज निर्मितीचे उत्पादनही सुरू केले. आता त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रे व सुविधांसह अळिंबी उत्पादन युनिट तयार आहे. प्रति दिन एक टन इतकी उत्पादनक्षमता असलेल्या या युनिटमध्ये १५ लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. अलीकडेच कर्करोग विरोधी, विषाणू विरोधी आणि अॅण्टीऑक्सिडण्ड गुणधर्म असलेल्या व वैद्यकीय औषधे निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिताके आणि गोनोडर्मा सारख्या अळिंबी उत्पादनालाही सुरुवात केली आहे.
उत्तराखंड येथील दुर्गम अशा पर्वतीय प्रदेशामधील शेतकऱ्यांनाही कंपोस्ट, बीज आणि मार्गदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली. आजवर हिरेशा यांनी २००० पेक्षाही अधिक महिला आणि शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनाचे प्रशिक्षण दिले आहे.

वैशिष्ट्ये -

  • २० किलो प्रति दिन उत्पादनापासून सुरू केलेल्या या उद्योगामध्ये हिरेशा यांनी १० ए.सी. खोल्यासह अत्याधुनिक सुविधा, यंत्रे यासह १००० किलो प्रति दिन पर्यंत झेप घेतली आहे. आता त्या संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेतात.
  • अळिंबीपासून लोणचे, कुकीज, नगेट्स, सूप, प्रोटीन पावडर, चहा, पापड इ. मूल्यवर्धित व प्रक्रिया उत्पादनेही तयार केली आहेत.
  • तहरी, पौरी आणि गरहवाल या पर्वतीय प्रदेशातील शेतकऱ्यांनाही अळिंबी वाढीसाठी हिरेशा मदत व मार्गदर्शन करतात.
  • अळिंबी उत्पादन, वापर आणि विक्री या तिन्ही क्षेत्रामध्ये हिरेशा यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या कार्यासह उद्योजकतेबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळालेले आहेत.

 


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...