agricultural stories in Marathi, Need of Market focused Agriculture production : Suhas Divase | Agrowon

बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून आगामी काळात राज्य शासनाचे ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेवर भर देण्याचे धोरण आहे. येत्या काळात शेती ही उत्पादन आधारित नव्हे तर बाजार आधारित करण्याची आवश्यकता आहे. बाजाराची गरज, बाजाराला काय लागते याचा विचार करून शेतीच्या तंत्रात बदल करण्याचा, त्यानुसार ज्ञानाचा वापर करण्यावर भर देणारे धोरण राबवण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले. ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून आगामी काळात राज्य शासनाचे ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेवर भर देण्याचे धोरण आहे. येत्या काळात शेती ही उत्पादन आधारित नव्हे तर बाजार आधारित करण्याची आवश्यकता आहे. बाजाराची गरज, बाजाराला काय लागते याचा विचार करून शेतीच्या तंत्रात बदल करण्याचा, त्यानुसार ज्ञानाचा वापर करण्यावर भर देणारे धोरण राबवण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले. ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी सुहास दिवसे यांच्या हस्ते मराठवाडा विभागाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार निपाणी (जि. उस्मानाबाद) येथील प्रयोगशील शेतकरी राजशेखर पाटील यांना प्रदान करण्यात आला. राजशेखर पाटील यांनी कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा असलेल्या उस्मानाबादच्या फोंड्या माळावर तब्बल ५५ एकरांत बांबू लागवडीचा अनोखा प्रयोग केला आहे. बांबू शेती आणि फळबागेच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी पट्ट्यात शाश्वत शेतीचे यशस्वी मॉडेल उभे केले आहे.  या वेळी मनोगतामध्ये आयुक्त दिवसे म्हणाले, राज्यातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आहेत. गेल्या पाच वर्षापैकी तीन वर्षे निसर्ग परीक्षा घेत आहे, तरीसुद्धा जिद्द, कल्पकता आणि मेहनतीने राज्यातील शेतकरी शेती करीत आहेत. गुणगौरव केलेल्या या स्मार्ट शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला दाद द्यावी असे शेतकरी निवडले, ही विशेष आणि कौतुकाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या या यशकथा इतर शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या आहेत. फक्त शेतकऱ्यांना नजरेपुढे ठेवून एखादे दैनिक सुरू करणे ही संकल्पनाच मुळी क्रांतिकारी आहे.

ते पुढे म्हणाले, राज्याच्या कृषी आयुक्तपदाची सूत्रे घेऊन मला तीन महिने झाले. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्य शासनाने स्मार्ट शेती संकल्पनेवर भर देण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्याअनुषंगाने कृषी खात्यात काम सुरू आहे. येत्या काळात शेती उत्पादन आधारित नाही तर बाजार आधारित करण्याची आवश्यकता आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा स्मार्ट कार्यक्रम राज्यभर सुरू केला आहे. तसेच येत्या काळात शेती उत्पादनांना प्रभावी मार्केटिंगची जोड देऊन खासगी उद्योग, व्यापार जगतासोबत मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...