agricultural stories in Marathi, parasite incident in animals | Agrowon

ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव ...

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा लक्षात घेऊन परजिवींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परजिवींचा प्रादुर्भाव ओळखून वेळेवर उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये ज्या भागात सिंचनाची व्यवस्था नाही तेथे जंताचा प्रादुर्भाव दिसत नाही. परंतु, येत्या काळात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या उपाययोजना करा ...

सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा लक्षात घेऊन परजिवींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परजिवींचा प्रादुर्भाव ओळखून वेळेवर उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये ज्या भागात सिंचनाची व्यवस्था नाही तेथे जंताचा प्रादुर्भाव दिसत नाही. परंतु, येत्या काळात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या उपाययोजना करा ...

१) जंताचा प्रादुर्भाव पावसाळी हंगामात कमी होण्यासाठी चरावयाच्या कुरणावरील व्यवस्था प्रभावी केल्यास जंत तसेच गोचीडांची लागण कमी होते. यासाठी सोपा उपाय म्हणजे चरावयाच्या कुरणातील पडक नांगरावी.
२) चरावयाचे क्षेत्र पिकाखाली आणि पिकाखालील क्षेत्र हे चराऊ क्षेत्र अशी अदलाबदल करावी. या बदलामुळेदेखील जंत, गोचिडांचा प्रादुर्भाव कमी होतो.
३) पाण्याचा प्रादुर्भाव असल्याने साचलेले डबक्‍यातील किंवा खाच खळग्यातील पाणी जनावरे पितात. अशा वेळेस तेथे गोगलगायींची संख्या जास्त असल्यास पर्ण कृमीजन्य आजार प्रसारित होतात. हे लक्षात घेऊन जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी.
४) गोठा पत्र्याचा असेल, हवा खेळती नसेल तर गोठ्याच्या पत्र्यावर हरीकेन वायूविजन यंत्र बसवावे. यामुळे बाह्य परजिवीचा प्रादुर्भाव कमी होतो. शक्‍यतो जनावरांसाठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. विशेषतः ही काळजी उन्हाळी हंगामात घ्यावी.
५) गोठ्याच्या परिसरातील असलेल्या नाल्या स्वच्छ कराव्यात. यामुळे त्यात पाणी साचणार नाही. डास तसेच चावणाऱ्या माश्‍यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
६) शेणाचा खड्डा खोल करून त्यात टाकलेले शेण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. खड्डा गोलाकार असावा. उन्हाळा, पावसाळी हंगामात खड्‌ड्यात शेण टाकल्यानंतर त्यावर पॉलिथी कागदाचे आवरण घालावे. यामुळे जनावरास चावणाऱ्या लायपरोझीया माश्‍यांचा प्रादुर्भाव टाळता येतो. या माश्‍या जनावरांच्या शरीरावर राहतात. ही माशी जनावरांचा चावा घेऊन रक्त शोषण करते. म्हणून उकिरडा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.
७) विशेषतः कोकणासारख्या भागामध्ये दमट हवामान असल्याने पिसवांचा प्रादुर्भाव उन्हाळ्यातही जाणवतो. म्हणून गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जळमटे काढावीत. निंबोळी अर्क (५ टक्के) याची फवारणी करावी.

हे करू नका ः

१. ज्या ठिकाणी सिंचन कमी असून उन्हाळ्यामध्ये पडक, गवत, कुरण किंवा हिरवा चारा अजिबात उपलब्ध नाही अशा ठिकाणी गवताद्वारे होणाऱ्या जंताचा प्रादुर्भाव मेंढी, शेळी तसेच इतर जनावरांना होत नाही. म्हणून अशा भागांतील जनावरांना उन्हाळ्यामध्ये जंतनाशकाची मात्रा देण्याची गरज नाही. यामुळे खर्चामध्ये बचत करता येते. ज्या प्रक्षेत्रावर उन्हाळ्यामध्ये देखील हिरवे कुरण चरण्यासाठी उपलब्ध आहे तेथील जनावरांना जंतनाशकाची मात्रा देण्याची आवश्‍यकता आहे.
२. गाभण जनावरांना अलबेन्डॅझॉल या जंतनाशकाची मात्रा देण्याचे टाळावे. कारण गर्भपात होण्याची शक्यता असते.

संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४
( पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...
किफायतशीर दूध उत्पादनासाठी गाईची निवड गाईची निवड करताना शरीररचना, रंग याचबरोबर...
फायदेशीर देशी मागूर माशांचे संवर्धन कराथाई मागूर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागूरची वाढ...
देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफाव्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा...
गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाचीजनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य...
संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध...जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने...
वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा...कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात...
प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पोषकतावाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे...
हिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्यहिवाळ्यात पोट्री शेडच्या लिटरमधील ओलसर भाग...