agricultural stories in Marathi, Pomegranate advice (Mrug) | Agrowon

मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजन

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. आशिस माइति, डॉ. मल्लिकार्जुन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.

मृग-बहार
(i) मे-जून बहार नियमन
(ii) उशिरा मृग बहार (जुलै बहार नियमन)

पिकाची अवस्था - फळ वाढ आणि पक्वता

बागेची मशागत :

 • फळबागेतून पाण्याचा संपूर्ण निचरा झालेला असावा. जास्त पावसामुळे झाडांच्या मुळांच्या जवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य स्टॅकिंग किंवा आधार करावा.
 • फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गुच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत. पाच वर्षांच्या झाडासाठी प्रति झाड सुमारे ८० ते १०० फळे घ्यावीत.
 • जास्त आर्द्रतेमुळे फळे गळण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच फळांची परिपक्वता आणि चांगला रंग येण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
 • लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन :

 • ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे - १५-२० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या.
 • मॅंगेनीज सल्फेटच्या ६ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे - १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या.
 • प्रति हेक्टरी विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १२.८० किलो + युरिया ३१.४० किलो प्रति हेक्टर + ००:००:५० (पोटॅशिअम सल्फेट) ११.५० किलो याप्रमाणे - ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा ड्रिपद्वारे द्यावे.

कीड व्यवस्थापन
पिकाची अवस्था- फळ पक्वता
१) रस शोषणारा पतंग

 • गुळवेल बागेतून किंवा बांधावरून काढून टाकावेत.
 • फळांचे रस शोषणाऱ्या पतंगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी फळांना पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. झाकण्यापूर्वी तेलकट डाग, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन प्रथम नियंत्रण करून घ्यावे.
 • जर फळांना बॅग लावण्यास उशीर होत असल्यास, ॲझाडिरेक्टीन/ निम तेल (१%) १० हजार पी.पी.एम. ३ मि.लि. प्रति लिटर + फिश ऑइल रेझिन सोप ०.५ ते १ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे बांधाकडील झाडांवर फवारावे.

२) फळ माशी :
फळमाशीसाठी बागेत १२ पाण्याच्या सछिद्र रिकाम्या बंद बाटल्यांचा वापर करून टोरूला इस्ट किंवा बॅक्ट्रोसेरा गंध (ल्यूर) पासून सापळे बनवावेत. ते बागेत विविध ठिकाणी टांगावेत. त्यातील गंध (ल्यूर) प्रत्येक १५-२० दिवसाला बदलावेत.

३) सदर्न स्टींक बग
फवारणी प्रति लिटर पाणी

 • अंडी अवस्था : ॲझाडिरेक्टीन/ निम तेल (१%) १० हजार पी पी एम) ३ मि.लि. + करंज बियाचे तेल ३ मि.लि. + स्प्रेडर स्टीकर ०.२५ मि.लि.*
 • पिल्ले व प्रौढ : सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६% ओडी) ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५% एससी) ०.७५ मि.लि. किंवा स्पिनेटोराम (१२ % एससी) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ % ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि. + स्प्रेडर स्टिकर ०.२५ मि.लि.

------
दिनकर चौधरी, ९४०३३९०६२७
(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)

(* एनआरसीची शिफारस)


इतर फळबाग
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
द्राक्ष बागेत फळछाटणी काळातील अडचणी अन्...द्राक्ष बागेत फळछाटणीसाठी हा महत्त्वाचा कालावधी...
केळीवरील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापनसध्या केळी बागेत सिगाटोका म्हणजेच करपा रोगाचा...
डाळिंब पिकावरील खोड किडा व्यवस्थापनडाळिंब पिकामध्ये झाडाची पाने पिवळी होणे किंवा...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
मोसंबीवरील साल खाणारी अळी, कोळी, रसशोषक...मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर...
ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या...सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी पाऊस पुन्हा...
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
लिंबूवरील खैऱ्या रोगाचे व्यवस्थापनलिंबावरील खैऱ्या (कँकर) हा रोग संसर्गजन्य आहे....
द्राक्ष सल्ला : आगाप छाटणीचे बागेतील...दर वर्षी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, येवला या...
शेतकरी नियोजन - डाळिंबशेतकरी ः दिनेश सीताराम लेंगरे गाव ः खुपसंगी, ता...
फळपिकांसाठी अभिवृद्धीच्या सुधारित पद्धतीफळझाडांची अभिवृद्धी बिया तसेच शाखीय पद्धतीने...
द्राक्ष बागेत खुंट रोपांचे व्यवस्थापन...सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या...
द्राक्ष बागेत द्या अन्नद्रव्यांच्या...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष लागवडीखालील...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
नियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि...
पाऊस झालेल्या द्राक्ष बागेतील समस्यांचे...गेल्या आठवड्यात बऱ्याचशा बागेत पाऊस झाला. काही...
डाळिंब बागेतील मृग बहराचे नियोजनमृग बहराची अवस्था  पीक नियमन, फुलधारणा आणि...