agricultural stories in Marathi, pomogranate dumping off problem | Page 2 ||| Agrowon

डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल ?
डॉ. ज्योत्स्ना शर्मा, युवराज शिंदे, दिनकर चौधरी, रमाकांत घरटे
गुरुवार, 13 जून 2019

डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने वाढत आहे. झाडांवरील लक्षणांचा व्यवस्थित आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यावे.

डाळिंबबागेमध्ये एखादे झाड वाळलेले आढळल्यास काळजीपूर्वक पाहणी करावी. लक्षणे तपासून खरेच मररोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा अन्य कारणांमुळे वाळले हे पाहावे. अनेक वेळा अन्नद्रव्यांचा अतिरिक्त अथवा अत्यल्प पुरवठा, निष्काळजी पाणीपुरवठा अशा कारणांमुळेही झाडे पिवळी पडून वाळतात. मररोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याआधी झाडांवरील सर्व लक्षणांचा सारासार विचार करावा.

लक्षणे :

डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने वाढत आहे. झाडांवरील लक्षणांचा व्यवस्थित आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यावे.

डाळिंबबागेमध्ये एखादे झाड वाळलेले आढळल्यास काळजीपूर्वक पाहणी करावी. लक्षणे तपासून खरेच मररोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा अन्य कारणांमुळे वाळले हे पाहावे. अनेक वेळा अन्नद्रव्यांचा अतिरिक्त अथवा अत्यल्प पुरवठा, निष्काळजी पाणीपुरवठा अशा कारणांमुळेही झाडे पिवळी पडून वाळतात. मररोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याआधी झाडांवरील सर्व लक्षणांचा सारासार विचार करावा.

लक्षणे :

 • सर्वप्रथम बागेची नियमित काळजीपूर्वक पाहणी करावी. एखादे झाड अथवा झाडाची फांदी पिवळी पडली किंवा वाळली असल्यास किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसत असल्यास अशा निवडक झाडांचे सखोल परीक्षण करावे.
 • झाडाखालील ड्रिपर्स तपासून पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करावी.
 • झाडांच्या मुळांवर आतून अथवा बाहेरील बाजूवर बुरशीचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करावी.
 • डाळिंबामध्ये अनेक माध्यमांतून मररोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त झाडाची मुळे व जमिनीलगतचे खोड यांचा उभा छेद घेऊन आतील भागांवरील लक्षणे तपासावीत.

अ) त्यावर काळपट तपकिरी अथवा काळ्या रंगाच्या बुरशीची लागण खोडाच्या आतील बाजूस दिसून आल्यास ती सिराटोसिस्ट्रीस फ्रीम्ब्रीयटा बुरशी असल्याचे समजावे. प्राथमिक अवस्थेमध्ये मुळांचा रंग हा तांबूस पिवळसर दिसून येतो, तसेच त्याला अल्कोहोलसारखा वास येतो. यामध्ये एकपाठोपाठ एक अशा ओळींमधील झाडांना यांचा प्रादुर्भाव होतो.

ब) जर खोडाच्या मध्य भागातील गाभ्यात (झायलेम पेशी) हा तपकिरी रंगाचा आढळल्यास फ्युजारिअम स्पे. या बुरशीचा प्रादुर्भाव असतो. मात्र, डाळिंबात या बुरशीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळतो.

क) काळपट तपकिरी रंगाची मुळकूज ही स्केल्रोशियम किंवा मॅक्रोफोमिना या प्रकारच्या बुरशींमुळे होते. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुळाजवळील भागात पाण्याचे प्रमाण अतिरिक्त झाल्यामुळे होतो.

ड) जमिनीलगत असणाऱ्या खोडावर गाठ अथवा गोलाकार पद्धतीची बुरशी आढळल्यास त्यास फायटोफ्थोरा निकोटिना किंवा रायझोक्टोनीया याचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. तो पुढे वाढून मूळकुज होण्याची शक्यता असते.

इ) मुळांवर राखाडी रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास तो रायझोक्टोनिया बुरशीचा असतो. यामागे प्रामुख्याने झाडाच्या लागवडीनंतर तयार करण्यात येणारे गादी वाफे, त्याचबरोबर झाडाच्या खोडांना लावलेली माती ही प्रमुख कारणे होत.

ई) खोडाच्या आतील भागांवर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळल्यास मुख्यत्वे शॉट होल बोअरर (खोड भुंगेरा) चा प्रादुर्भाव समजावा. प्रामुख्याने कमजोर झाडांवर व सिराटोसीस्टीस बुरशीची लागण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या द्रव्याकडे खोड भुंगेरे आकर्षित होतात.

फ) झाडाच्या मुळांवर असणाऱ्या गाठी ही सूत्रकृमीची लक्षणे आहेत. यामध्ये झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फुले बहरण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाडांना दीर्घ कालावधीमध्ये (एक वर्षापेक्षा जास्त) फूलधारणा होत नाही. अशी झाडे मेलेडोगाइनी इनकाँग्नाटा नावाच्या सूत्रकृमीने प्रादुर्भावग्रस्त असतात. डाळिंबामध्ये रॉटिलेनक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीवटोंनक्लस या परजीवीचा आढळही काही प्रमाणात दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे.
डाळिंबामध्ये वर नमूद केलेली लक्षणे ही स्वतंत्रपणे अथवा दोन किंवा अधिक प्रकारच्या जीवाणूंच्या एकत्रितरीत्या मर रोगास कारणीभूत ठरतात. आपणास अशा लक्षणांवरून व्यवस्थितरीत्या अंदाज न बांधता आल्यास अशा झाडांचे नमुने (खोड, मूळ, माती) जवळच्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये किंवा संशोधन केंद्रामध्ये तपासून घ्यावेत.

अस्तित्व आणि प्रसार :

 • मररोगास कारणीभूत ठरणारी सिराटोसिस्टीस फ्रिम्ब्रीयटा बुरशी ही ५ ते ७ वर्षाहून अधिक कालावधीकरिता जमिनीमध्ये अथवा रोगग्रस्त झाडांच्या अवशेषांवर जिवंत राहू शकते. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव असला तरी विशेषत: वालुकामय जमिनी तसेच सच्छिद्र जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जास्त दिवसांपर्यंत आढळून येतो.
 • मररोगाचा प्रसार हा प्रामुख्याने रोगग्रस्त कलमे, त्याकरिता वापरण्यात येणारी माती आणि सघन पद्धतीची लागण यामुळे होतो.
 • पावसाचे पाणी, खोड भुंगेऱ्यासारखे कीटक आणि बागेमध्ये मशागतीकरिता वापरण्यात येणारी यंत्रे आणि अवजारे हेही मररोगाच्या प्रसाराकरिता कारणीभूत ठरतात.

  संपर्क ः ०२१७-२३५०२६२
  (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव, सोलापूर.)

फोटो गॅलरी

इतर फळबाग
सीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरणगेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण...द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक,...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...