agricultural stories in Marathi, preparation of nadep compost, | Agrowon

तयार करा सेंद्रिय निविष्ठा
एस. बी. झाडे
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

अलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खतांसह विविध उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात बायो डायनॅमिक कंपोस्ट, नॅडेप कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतींची माहिती घेत आहोत.

 

अलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खतांसह विविध उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात बायो डायनॅमिक कंपोस्ट, नॅडेप कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतींची माहिती घेत आहोत.

 

बायो डायनॅमिक कंपोस्ट  
साहित्य:
१) एस – ९ कल्चर २) शेतातील काडीकचरा ३) कापसाच्या काड्या ४) शेतातील तण ५) कडूनिंबाच्या झाडाची पाने ६) निरगुडीची पाने ७) एरंडीची पाने ८) गाजर गवत ९) गिरीपुष्प १०) बेशरम ११) ताजे शेण ८ ते १० दिवसांचे १२) १५०० ते २००० लिटर पाणी.
एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, ५ फूट रुंद जागा लागते. ती शक्यतो पूर्व-पश्चिम असावी.

निवडलेली जागा स्वच्छ करून त्यावर हलका पाण्याचा सडा टाकावा. वरीलप्रमाणे जमा केलेल्या ओल्या व सुक्या काडीकचऱ्यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. त्यानंतर पहिला १ फुटाचा काडीकचऱ्याचा थर द्यावा. त्यावर पाणी टाकावे. दुसऱ्या ८ ते ३ इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा. १ किलो एस-९ कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ चांगले ढवळावे. हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यानंतर १ फुटापर्यंत जैविक पदार्थ व ओले शेण यांचा थर लावावा. प्रत्येक थरावर एस-९ कल्चरचे द्रावण शिंपडावे. अशाप्रकारे ३ ते ४ फूट उंच ढीग तयार करावा. तो शेणमातीने लिंपून घ्यावा. एक महिन्यानंतर ढिगाला पलटी द्यावी. अशाप्रकारे आठ महिन्यांत उत्तम कंपोस्ट तयार होते.

नॅडेप कंपोस्ट  
टाकी बांधण्याची पद्धत :               

  •  पाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी.
  •  टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये ९ इंच जाडीचे करावे.
  •  टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसऱ्या थरामध्ये खिडक्या ठेवाव्यात. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पाहावे.

टाकी भरण्यासाठी सामग्री
१) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ.
२) ९० ते १०० किलो गाईचे शेणखत व १ गाडी माती.
३) १५०० ते २००० लिटर पाणी.
४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.

पद्धत

  • सर्व साहित्य एकत्र आणून ठेवावे. साहित्य टाकीत भरण्याआधी आतील भिंतीवर शेण आणि माती यांचे मिश्रण शिंपडावे.
  • नाडेप टाकी भरताना पहिला थर देताना तळाला १५ ते ८० सेंमी जाडीचा काडी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन, त्यावर शेण + पाणी यांचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे. त्यावर साधारण ५ ते ६ घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशाप्रकारे एकावर एक थर देऊन नाडेप बांधकामाच्या वर १.५ फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती व शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिंपून घ्यावे.
  • काही दिवसांनंतर नाडेप टाकीतील सामग्री खाली दबलेली आढळते. त्या वेळी पुन्हा वरीलप्रमाणे एकावर एक थर देऊन माती व शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन लिंपून घ्यावे.

- एस. बी. झाडे, ८८५५८२३५४६

(कृषी महाविद्यालय, रिसोड

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...