पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
ताज्या घडामोडी
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे वाचवा
कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होते. असा कोवळा पाला शक्यतो जनावरे खाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. चुकून खाण्यात आल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन व्हिनेगरचे द्रावण पाजावे.
कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होते. असा कोवळा पाला शक्यतो जनावरे खाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. चुकून खाण्यात आल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन व्हिनेगरचे द्रावण पाजावे.
उन्हाळ्यामधील चाराटंचाईमुळे जनावरे थोड्या फार प्रमाणात दिसेल ती हिरवी पाने खातात. काही ठिकाणी जनावरांनी ज्वारीची कोवळी पाने खाल्ल्याने विषबाधा होते. ज्वारी पिकातील हायड्रोजन सायनाइट या विषारी घटकामुळे जनावरांना विषबाधा होते. विशेषतः कोवळ्या ज्वारीचा चारा खाल्ल्यामुळे विषबाधा होते.
ज्वारीतील सायनोजेनिक ग्लायकोसाइड हा विषारी घटक सुमारे हजार वनस्पती प्रजातींमध्ये आढळून येतो. अपरिपक्व पिकामध्ये या घटकाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. ज्या जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण अधिक व फॉस्फरसचे प्रमाण कमी असते अशा जमिनीतील पिकामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइडचे प्रमाण अधिक असते.
सायनोजेनिक ग्लायकोसाइड हा विषारी घटक असणाऱ्या वनस्पती :
गुडघ्याइतक्या उंचीची ज्वारी, बाजरी
हिरवा कोवळा मका, जांभळाची पाने व बिया, निलगिरीची पाने
विषबाधा झाल्यावर दिसणारी लक्षणे :
विषारी घटक (सायनोजेनिक ग्लायकोसाइड) असणारी वनस्पती पिके जास्त प्रमाणात खाल्ल्यास जनावर दगावते.
जनावर अस्वस्थ होते, श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धापा टाकते.
जनावर अडखळत चालते, जास्त प्रमाणात लाळ गळते, डोळ्यांत पाणी येते, सतत लघवी करते व शेण टाकते.
डोळ्यांच्या बुबुळांचा आकार वाढतो.
हिरड्या व पापण्यांच्या आतील त्वचा गडद लाल रंगाची होते.
स्नायूचा कंप होऊन स्नायू आकुंचन पावतात.
जनावरांच्या तोंडाद्वारे चारवट पडते व त्याचे पोट फुगते.
हृदयाचे ठोके वाढतात.
ऑक्सिजनची कमतरता भासून जनावर दगावते.
उपचार :
कोवळे ज्वारी पीक जनावरांनी खाल्ल्याचे लक्षात येताच तत्काळ पशुवैद्यकाकडून तपासणी करावी.
तात्पुरत्या उपायासाठी ४ लिटर व्हिनेगर १५ ते २० लिटर थंड पाण्यात मिसळून जनावरास पाजावे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
जनावरास कोवळी ज्वारी खाऊ देऊ नये.
ज्वारीचे पीक १८ ते २४ इंच उंचीचे झाल्याशिवाय ते चारा म्हणून वापरू नये.
कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन)
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.
- 1 of 580
- ››