प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी

पॉप कॉर्न
पॉप कॉर्न

मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे. मक्यापासून स्टार्च, पॉप कॉर्न (लाह्या), पोहे, तेल, भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मक्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध आणि खनिज पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे उत्पादन असते. जागतिक पातळीवर अन्नधान्य तसेच औद्योगिक वापरासाठी मक्याचा उपयोग सर्वात अधिक आहे. मक्याचे उत्पादन भारतातील सर्व राज्यांमध्ये होते.

पोषक तत्त्वे  र्बोदके ६६.२ टक्के, जलांश १४.९ टक्के, प्रथिने ११.१ टक्के, स्निग्ध पदार्थ ३.६ टक्के, तंतू २.७ टक्के, खनिज पदार्थ १.४ टक्के

भरड

  • मका दळून त्याचे रूपांतर जाडेभरडे, मध्यम किंवा बारीक कणात केले जाते. या भरड्याचा वापर एक्सटुडेड अल्पोपहार आणि तळलेले किंवा भाजलेले नमकीन मध्ये संपूर्ण किंवा तांदळाच्या भरड्यासोबत करतात.
  • मका भरड हे अन्नाची पौष्टिकता व चव वाढवितात. याचा वापर अल्पोपहार, बेकरी पदार्थ तसेच तृणधान्यावर आधारित तयार पदार्थ बनविण्यासाठी करतात.
  • एक भाग भरडा घेऊन त्यात २ ते ३   भाग उकळलेले पाणी मिसळून २० ते  ३० मिनिटे शिजवावे. त्यामुळे पाणी शोषून कण हे चिकट बनतात. उष्णतेमुळे भरड प्रसरण पावते. चिकट पांढरा पदार्थ तयार होतो. हे भरड चीज, लोणी, सॉसेज सोबत खातात.
  • अंकूर

  • मका अंकुर हा महत्त्वाचा पदार्थ असून यात तेलाचे प्रमाण १४ टक्के असते.
  • खाद्य व पशुखाद्यासाठी वापर केला जातो. मका अंकुर तेलात मुक्त फॅटी ॲसिड निर्माण होऊ नये, यांसाठी जलांशाचे प्रमाण २ ते ३ टक्के असावे लागते.
  •   पीठ

  • पिठाचा वापर मका पाव, कप केक, मफीन्स तयार करण्यसाठी करतात. हे पीठ ग्लुटेन विरहित तात्काळ पाव बनविण्यासाठी उपयोगी आहे.
  • पिठाचा वापर बेंकिंग उद्योग, पास्ता आणि सॉसेज बनविण्यासाठी करतात.
  • कोंडा

  • कोंड्यात न विरघळणारे तंतू  असल्यामुळे ते पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. न विरघळणारे तंतू रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात.
  • कोंड्याचा वापर पशुखाद्य, कोंबड्या, पाळीव प्राणी तसेच इथेनॉल उत्पादनात केला जातो.
  • ग्लुटेन

  • प्रथिने व खनिज पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याचा वापर पशुखाद्य, बेकरी उद्योगात करतात.
  • पावाचा पोत सुधारण्यासाठी काही प्रमाणात मका ग्लुटेनचा वापर करतात.
  • पॉप कॉर्न  

  • मक्याचे स्टार्च व प्रथिने हे टणक अशा कवचामध्ये बंद असतात. स्टार्च पाण्याच्या योग्य प्रमाणात येईपर्यंत त्याला भिजवून घेऊन कोरडे केले जातात. उच्च तापमानात ते ठेवले असता स्टार्चमधील पाण्याचे रूपांतर होऊन उच्च तापमानाची वाफ दाण्याबाहेर पडते.
  • पॉपकार्न अत्यंत कुरकुरीत, स्वादिष्ट असतात. त्यावर थोडासा मसाला, मीठ टाकून त्याची चव वाढविली जाते.
  • स्टार्च

  • मका स्टार्च हे एक तृणधान्य स्टार्च असून त्यामध्ये प्रथिने व खनिज द्रव्यांचे प्रमाण कमी असते. मका स्टार्चच्या जास्त शुद्धेतेमुळे त्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत.
  • मक्यामध्ये ६६ टक्के स्टार्चचे प्रमाण असून ते अनेक प्रक्रियेद्वारे वेगळे केले जाते. त्यामध्ये भिजवणे, दळणे आणि वाळविणे, आर्द्र दळण या पद्धतीचा समावेश होतो. विशिष्ठ प्रक्रियेमुळे दाण्यावरील टरफल निघून ग्लुटेन मऊ होते. त्यानंतर स्टार्चचे विरंजन होते. यंत्राच्या सहाय्याने अंकुर व टरफले वेगळी काढली जातात.
  • शुष्क दळून स्टार्च व ग्लुटेन केंद्रोत्सारी यंत्राच्या साह्याने वेगळी केली जातात. स्टार्चवर संस्करण करून डेक्स्ट्रोज, मका पाक व मका स्टार्च वेगळे केले जातात.
  • कागद, कापड, अन्नप्रक्रिया, औषधी उद्योगामध्ये स्टार्चचा वापर करतात.
  • पोहे (कार्न फ्लेक्स)

  • मका पोहे हा लोकप्रिय न्याहारीचा पदार्थ आहे. मक्यापासून चिवडा तयार केला जातो.
  • योग्य आर्द्रता, पाण्याचे प्रमाण व उष्णता या बाबीचे संतुलन राखून स्टीलच्या रोलर मीलमधून उच्च दाब प्रक्रियेद्वारे पोहे तयार केले जातात.
  • तेल

  • मका तेल हे मक्याच्या अंकुरापासून रासायनिक किंवा यांत्रिक पद्धतीने काढले जाते. साधारत: प्रती १०० किलो मक्यापासून २.२ किलो तेल मिळते.
  • मका तेलात अनसॅच्युरेटेड चरबीचे प्रमाण असल्यामुळे याचा वापर सॅलड ड्रेसिंग, शिजविण्यासाठी व तळण्यासाठी वापरतात. तेलाचा वापर मारगारिन उत्पादनात जीवनसत्त्व वाहक म्हणून करतात.
  • तेलाचा वापर कृत्रिम रबर, सौंदर्यप्रसाधने, साबण, रंग उद्योग, कापड उद्योग, शाई व कीटकनाशक उद्योगात केला जातो.
  • - शैलेंद्र कटके ९९७०९९६२८२ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com