आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआ

आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची लागवड मोठ्या प्रमाणात होते. क्विनोआ हे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआ
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआ

आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची लागवड मोठ्या प्रमाणात होते. क्विनोआ हे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. क्विनोआ अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे आपल्या हृदय आणि इतर अवयवांचे नुकसान रोखू शकते. क्विनोआ पासून सलाड, पोहे, उपमा तयार करता येतो. क्विनोआच्या सेवनाने पूर्ण दिवसाच्या पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होते. क्विनोआमध्ये कर्बोदके ६९ टक्के, प्रथिने १६.५ टक्के, स्निग्ध पदार्थ ६.३ टक्के, राख ३.२८ टक्के, तसेच ब व क जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशियम पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. क्विनोआचे प्रकार: पांढरा क्विनोआ: पांढऱ्या रंगाच्या क्विनोआची जगभरात सर्वात जास्त उत्पादन होते. पांढऱ्या क्विनोआची खासियत म्हणजे दुसऱ्या रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत शिजायला कमी वेळ लागतो.   लाल क्विनोआ: १) लाल रंगाचं क्विनोआ जास्त प्रमाणात सॅलेडमध्ये वापरले जाते. या रूपात क्विनोआला जास्त पसंती मिळते. २) इतर रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत शिजताना याचा आकार सर्वात जास्त बदलतो. काळा क्विनोआ : १) काळ्या रंगाचे क्विनोआ इतर धान्याच्या तुलनेत गोड असते. शिजवल्यानंतर याचा मूळ आकार बदलत नाही. २) काळ्या रंगाच्या क्विनोआला शिजण्यास थोडा जास्त वेळ लागतो. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत याचा वापर कमी होतो. आरोग्यासाठी फायदे ः १) आहारामध्ये क्विनोआचा वापर असेल तर शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत करते. ज्यामुळे एथोसिलेरोसिस आणि हृदयसंबंधित रोग होण्याची शक्यता कमी होते. २) हाडांसाठी फारच फायदेशीर आहे. कारण यातील मॅग्नेशिअममुळे ते हाडांच्या निर्मितीसाठी लाभदायी ठरते. त्यासोबतच क्विनोआ मध्ये ९ प्रकारची अमिनो आम्ले आहेत, ज्याची निर्मिती शरीरामध्ये होत नाही आणि कोणत्याही धान्यातही आढळत नाहीत. ३) इतर धान्यांच्या तुलनेत क्विनोआमध्ये प्रथिनेच्या निर्मितीसाठी सर्व अमिनो आम्ल असतात, जे रक्तामध्ये शर्करा (साखर) स्तर नियंत्रित करण्यात उपयुक्त ठरतात. यामुळे मधुमेहासारख्या आजाराला रोखण्यास मदत मिळते. ४) क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यामुळे अॅनिमियाला रोखण्यास मदत मिळते. एक कप शिजलेल्या क्विनोआमध्ये जवळजवळ ३ मिलीग्रॅम लोह तत्त्व असते, जे शरीराच्या रोजच्या गरजेच्या १५ टक्के आहे. ५) दुसऱ्या धान्याच्या तुलनेत क्विनोआमध्ये सर्वात कमी स्निग्ध पदार्थ असतात. जे आपलं वजन वाढण्यापासून रोखतात. पण शरीरामध्ये स्निग्धपदार्थही जमा होऊ देत नाही. क्विनोआमध्ये प्रथिनांची मात्रा जास्त असल्याने आपल्या शरीराला ते पचवण्याकरिता जास्त मेहनतही लागत नाही. ६) क्विनोआमध्ये जीवनसत्त्व बी सारखी पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे त्वचेतील डार्क मेलनिन कमी होऊन चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा वाढत नाहीत. क्विनोआ जीवनसत्त्व अ चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. त्वचा तरुण दिसते.   ७) क्विनोआमध्ये असलेल्या हायड्रोलाईज्ड प्रथिनेमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. केस जलद वाढण्यास मदत होते. केस मजबूत आणि चमकदार होतात. यामधील अमिनो आम्ल केसांचे पोषण करते.त्यांची वाढ लवकर होण्यास मदत करतात. संपर्क ः कुणाल गायकवाड,७९७२३३९५८८ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com