agricultural stories in Marathi, qunova is healthful | Page 3 ||| Agrowon

आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआ

कुणाल गायकवाड, डॉ. विजया पवार
सोमवार, 17 मे 2021

आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची लागवड मोठ्या प्रमाणात होते. क्विनोआ हे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची लागवड मोठ्या प्रमाणात होते. क्विनोआ हे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. क्विनोआ अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे आपल्या हृदय आणि इतर अवयवांचे नुकसान रोखू शकते.

क्विनोआ पासून सलाड, पोहे, उपमा तयार करता येतो. क्विनोआच्या सेवनाने पूर्ण दिवसाच्या पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होते. क्विनोआमध्ये कर्बोदके ६९ टक्के, प्रथिने १६.५ टक्के, स्निग्ध पदार्थ ६.३ टक्के, राख ३.२८ टक्के, तसेच ब व क जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशियम पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

क्विनोआचे प्रकार:
पांढरा क्विनोआ:

पांढऱ्या रंगाच्या क्विनोआची जगभरात सर्वात जास्त उत्पादन होते. पांढऱ्या क्विनोआची खासियत म्हणजे दुसऱ्या रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत शिजायला कमी वेळ लागतो.  

लाल क्विनोआ:
१) लाल रंगाचं क्विनोआ जास्त प्रमाणात सॅलेडमध्ये वापरले जाते. या रूपात क्विनोआला जास्त पसंती मिळते.
२) इतर रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत शिजताना याचा आकार सर्वात जास्त बदलतो.

काळा क्विनोआ :
१) काळ्या रंगाचे क्विनोआ इतर धान्याच्या तुलनेत गोड असते. शिजवल्यानंतर याचा मूळ आकार बदलत नाही.
२) काळ्या रंगाच्या क्विनोआला शिजण्यास थोडा जास्त वेळ लागतो. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या क्विनोआच्या तुलनेत याचा वापर कमी होतो.

आरोग्यासाठी फायदे ः
१) आहारामध्ये क्विनोआचा वापर असेल तर शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत करते. ज्यामुळे एथोसिलेरोसिस आणि हृदयसंबंधित रोग होण्याची शक्यता कमी होते.
२) हाडांसाठी फारच फायदेशीर आहे. कारण यातील मॅग्नेशिअममुळे ते हाडांच्या निर्मितीसाठी लाभदायी ठरते. त्यासोबतच क्विनोआ मध्ये ९ प्रकारची अमिनो आम्ले आहेत, ज्याची निर्मिती शरीरामध्ये होत नाही आणि कोणत्याही धान्यातही आढळत नाहीत.
३) इतर धान्यांच्या तुलनेत क्विनोआमध्ये प्रथिनेच्या निर्मितीसाठी सर्व अमिनो आम्ल असतात, जे रक्तामध्ये शर्करा (साखर) स्तर नियंत्रित करण्यात उपयुक्त ठरतात. यामुळे मधुमेहासारख्या आजाराला रोखण्यास मदत मिळते.
४) क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यामुळे अॅनिमियाला रोखण्यास मदत मिळते. एक कप शिजलेल्या क्विनोआमध्ये जवळजवळ ३ मिलीग्रॅम लोह तत्त्व असते, जे शरीराच्या रोजच्या गरजेच्या १५ टक्के आहे.
५) दुसऱ्या धान्याच्या तुलनेत क्विनोआमध्ये सर्वात कमी स्निग्ध पदार्थ असतात. जे आपलं वजन वाढण्यापासून रोखतात. पण शरीरामध्ये स्निग्धपदार्थही जमा होऊ देत नाही. क्विनोआमध्ये प्रथिनांची मात्रा जास्त असल्याने आपल्या शरीराला ते पचवण्याकरिता जास्त मेहनतही लागत नाही.
६) क्विनोआमध्ये जीवनसत्त्व बी सारखी पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे त्वचेतील डार्क मेलनिन कमी होऊन चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा वाढत नाहीत. क्विनोआ जीवनसत्त्व अ चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. त्वचा तरुण दिसते.  
७) क्विनोआमध्ये असलेल्या हायड्रोलाईज्ड प्रथिनेमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. केस जलद वाढण्यास मदत होते. केस मजबूत आणि चमकदार होतात. यामधील अमिनो आम्ल केसांचे पोषण करते.त्यांची वाढ लवकर होण्यास मदत करतात.

संपर्क ः कुणाल गायकवाड,७९७२३३९५८८
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषिपूरक
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...