agricultural stories in Marathi, Rajuri village in dist. Pune yashkatha | Agrowon

आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा आदर्श

अमोल कुटे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व कृषिसंपन्न गाव म्हणून पुणे जिल्ह्यातील राजुरी नावारूपाला आले आहे. मृदा, जलसंधारणाची कामे, विविध पिके, फळबाग केंद्रित शेतीचा विकास, दुग्ध व्यवसाय, अन्य पूरक व्यवसाय, शिक्षण आदी विविध उपक्रमांमधून ग्रामविकासाचा मोठा मापदंड गावाने उभा केला आहे.

आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व कृषिसंपन्न गाव म्हणून पुणे जिल्ह्यातील राजुरी नावारूपाला आले आहे. मृदा, जलसंधारणाची कामे, विविध पिके, फळबाग केंद्रित शेतीचा विकास, दुग्ध व्यवसाय, अन्य पूरक व्यवसाय, शिक्षण आदी विविध उपक्रमांमधून ग्रामविकासाचा मोठा मापदंड गावाने उभा केला आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला राजुरी हे कोरडवाहू गाव आहे. वार्षिक सरासरी ४५० ते ०० मिमी पाऊस पडतो. सुमारे २, २६१ हेक्टर क्षेत्रफळ आणि ९, ४११ लोकसंख्या असलेल्या गावात पूर्वी सातत्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. गावात सन १९७२ मध्ये ८४ कोटी लिटर क्षमतेचा पहिला पाझर तलाव बांधण्यात आला. तेथूनच राजुरीत विकासाच्या गंगेचा उगम झाला. कोरडवाहू शेती असलेल्या १५ शेतकऱ्यांनी १९८५ मध्ये कुकडी नदीतून उपसा सिंचन योजना केली. यातून गावातील शेतीचे रूप पालटू लागले. पुढील काळात झालेली मृदा, जलसंधारणाची कामे, गावातून जाणाऱ्या पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्यातून पाण्याची उपलब्धता झाली. गावात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, खरबूज, कलिंगड यासह बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरासारखे पिके घेतली जातात. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्याची निर्यातही केली जात आहे.

पूरक व्यवसायांची वृद्धी

 • दुग्धोत्पादन व्यवसायाचीही वृद्धी झाली असून, गावात सुमारे ४० हजार दुभती जनावरे आहेत.
 • कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषि पर्यटनासारख्या क्षेत्रात गावाने प्रगती केली आहे.
 • शिक्षण, व्यवसायाच्या माध्यमातून मुंबई- पुणे शहरांत वास्तव्य करणाऱ्या गावातील नागरिकांचाही
 • विकासाला हातभार लागत आहे. गावाचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न १९ लाख ६६ हजार रुपये, तर वार्षिक उत्पन्न ७१ कोटी ७६ लाख रुपयांवर पोचले आहे.

दूध संस्थेमुळे आर्थिक चालना

 • मार्च १९७६ मध्ये गावात गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था स्थापना झाली.
 • पहिल्या दिवशी आठ लिटर संकलनापासून सुरवात करून आज रोजी सरासरी प्रति दिवस सुमारे ३४,००० लिटर दूध संकलन होत आहे. संस्थेकडे ५० हजार लिटर क्षमतेचा दूध शीतकरण प्रकल्प आहे. या संस्थेमुळे गावातील आर्थिक वाटचालीला मोठी चालना मिळाली. संस्थेने ‘राजुरी दूध’ ब्रॅण्ड तयार केला आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर २३ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ४८ रुपये दर दिला जात आहे.
 • सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या संस्थेच्या सभासदांना सवलतीच्या दरात पशू खाद्य, औषध व किराणा मालाचा पुरवठा होतो. सभासदांना खेळते भांडवलही उपलब्ध होते. बॅंकेतही सभासदांची पत वाढली असून, गरजेच्या वेळी तेथून अर्थपुरवठा उपलब्ध होतो. सहकारी दूध संस्थेला ग्राहकाभिमुख दर्जेदार सेवेसाठी आयएसओ दर्जा मिळाला आहे.

ग्रामपंचायत, १२ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’

 • राजुरी ग्राामपंचायतीची स्वातंत्र्यपूर्व काळात १९३५ मध्ये स्थापना
 • दर्जेदार सेवेसाठी ग्रामपंचायतीला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी १२ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र
 • विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अंगणवाड्या, शाळांमध्ये आरओ प्रकल्प
 • दोन प्राथमिक शाळा आणि विद्या विकास मंदिर हे माध्यमिक विद्यालय
 • प्राथमिक शाळा पूर्णपणे डिजिटल. माध्यामिक शाळा डिजिटल होण्याच्या मार्गावर
 • ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी ग्रामसचिवालय उभारण्याचे नियोजन
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुधन आरोग्य सुविधा केंद्र, विविध कार्यकारी सोसायटी, पाच पतसंस्था व आयडीबीआय, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारत वाचनालय, पराशर कृषि पर्यटन केंद्र, प्रशस्त क्रीडांगण, व्यायामशाळा
 • अनेक मंदिरे असलेल्या गावात धार्मिक समारंभ, उत्सव, आरोग्य शिबिरे, पशुधन आरोग्य शिबिरे, कृषी महोत्सव, प्रदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन

    दर शनिवारी आठवडे बाजार
    स्मशानभूमी, दशक्रिया घाट सुशोभीकरण, नळ पाणीपुरवठा, भूमिगत गटारे, कचरा व्यवस्थापन, सिमेंट रस्ते या पायाभूत सुविधा  

निराधारांना मोफत भोजन
निराधार ज्येष्ठ नागरिकांना मोफत भोजन देण्याचा अनोखा उपक्रम राजुरीने राबविला आहे. यात अपत्यहीन, तसेच पाल्य जवळ नसलेल्या आर्थिकदृष्ट्या गरीब ४० ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळेचे जेवण विनाशुल्क देण्यात येते. नागरिकांकडून वाढदिवस, दशक्रिया यासारख्या धार्मिक आणि कौटुंबिक समारंभांना फाटा देत, तसेच दानशूर व्यक्तींकडूनही रक्कम संकल्प बहुद्देशीय संस्थेला दिली जाते. त्यातून हा खर्च होतो.

माती व जलसंधारण
पाणलोट क्षेत्र आधारित माती व जलसंधारणावर भर दिला असून, पावसाच्या पाण्याचा एकही थेंब गावाबाहेर जात नाही. द्राक्ष, डाळिंबासह फळबागा, ऊस व भाजीपाला सिंचनासाठी अधिकाधिक क्षेत्रावर ठिबकचा वापर होतो. पाटाद्वारे पाणी देताना होणारा अपव्य टाळण्यासाठी कोरडवाहू शेती अभियानांतर्गत ५० टक्के अनुदानावर पाच हजार ९९४ पाइप्सचे वितरण करण्यात आले आहे.

राबविलेले ठळक उपक्रम

 • गावातील शेतकऱ्यांच्या पीकनिहाय गटांची स्थापना
 •  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना
 •  कृषी विद्यापीठे, कृषी प्रदर्शन, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास दौरे
 •  चारा विकास कार्यक्रमात दुग्ध व्यवसायिकांना सुधारित मका बियाणेवाटप
 •  गावातील १९२ हेक्टर वनक्षेत्र संवर्धनात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग
 •  वनक्षेत्रात मृद् व जलव्यवस्थापन कामे पूर्ण.
 •  युरोप देशातील शेतकरी अभ्यास दौऱ्यात तीन शेतकरी सहभागी
 •  महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पअंतर्गत शेतीमालासाठी बाजारतळ निर्मिती
 •  शेतीमालाच्या सुरक्षित हाताळणीसाठी एक हजार ५५० प्लॅस्टिक क्रेटचे वाटप
 •  सेंद्रिय शेती, आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञानाबाबत शेतकरी प्रशिक्षण
 •  फळबाग लागवडसाठी अनुदान लाभ, प्रगतिशील शेतकऱ्यांना विविध पारितोषिके.

उत्पन्न वाढ दृष्टिक्षेपात  

दुग्धोत्पादन  एक कोटी २५ लाख २७ हजार लिटर ३० कोटी ६ लाख ५७ हजार रु.
खरीप पिके, बाजरी सोयाबीन क्षेत्र ४५५ हेक्टर  एक कोटी ८२ लाख रु.
रब्बी- गहू, हरभरा क्षेत्र  २५२ हेक्टर  एक कोटी १३ लाख ४० हजार रु.
ऊस (२८० हेक्टर क्षेत्र)     ३५, ००० टन  ९ कोटी १० लाख रु.
भाजीपाला  २३० हेक्टर  ३ कोटी ४५ लाख रु.
पूरक व्यवसाय व अन्य पिकांतील उत्पन्न  सुमारे १५ लाख रु.     
 
एकूण वार्षिक सरासरी उत्पादन
 सुमारे ७१ कोटी ७५ लाख ७२ हजार रु.  
सरासरी दैनंदिन उत्पादन सुमारे १९ लाख ६६ हजार रु.  

    
मृद् व जलसंधारण अंतर्गत कामे
कामाचा प्रकार    संख्या
शेततळे    ३४
सामूहिक शेततळे    ५
माती नालाबांध    २६
सिमेंट नालाबांध    २७
नाला खोलीकरण    ११
कोल्हापुरी बंधारे    २
पाझर तलाव    १
कंपार्टमेंट बंडिंग    २८० हेक्टर

 

भविष्यातील विकासाचे बदलते स्वरूप विचारात घेऊन राजुरी गावाने मृद् व जलसंधारणाबरोबरच शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, वनसंवर्धन, पर्यावरण आणि आर्थिक उन्नती या बाबींवर भर दिला. ग्राम विकासाचा नवीन मापदंड निश्चित केला. आदर्श व शाश्वत ग्रामविकासाचे केंद्र म्हणून राजुरीची ओळख कायम ठेवण्याच्या दृष्टीने आमची सातत्यपूर्ण वाटचाल चालू राहील.
 - विनयकुमार आवटे, अधीक्षक कृषी अधिकारी (मनरेगा) ९४०४९६३८७०

शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रक्रिया प्रकल्प उभारून सांडपाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर, घन कचऱ्यातून सेंद्रिय खतनिर्मिती यासह गावात सौरऊर्जेचा प्रसार करण्यात येणार आहे. शहरात आणि गावाबाहेर नोकरी, व्यवसाय करणारे युवक तसेच लोकवर्गणीतून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
 -संजय रमेश गवळी,
सरपंच, राजुरी, ९८६०८१५१८२

गावातील दूध उत्पादकांना चांगला दर देता यावा यासाठी ‘राजुरी दूध’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. शहरातील खासगी व्यवसायिकांना दूधपुरवठा करण्यात येत आहे. पेढा, लस्सी, श्रीखंड, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ला, आइस्क्रीम आदी पदार्थ बनविण्याचे नियोजन आहे.
 -गोपाळा सहादू औटी,
चेअरमन, गणेश सहकारी दूध संस्था

कोरडवाहू शेतीला बारमाही संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याने गाव बागायती झाले आहे. डेअरीच्या माध्यातून आर्थिक सुबत्ता आली. विकासाच्या राजकारणावर भर दिल्याने गावाची प्रगती वेगाने झाली.
 -बाळाजी तात्याबा डुंबरे,
प्रगतिशील शेतकरी


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....
मोसंबी कलमांची दुप्पट विक्री औरंगाबाद : पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद...
केळीसाठी पीक विम्याचे निकष पूर्ववत...जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत...सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...