agricultural stories in Marathi, raw fodder processing | Agrowon

निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्य
कृषी महाविद्यालय, धुळे
बुधवार, 24 एप्रिल 2019

उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते.

 जनावरांच्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित, सकस आणि पुरेसा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे ७० टक्के खर्च होतो, हा खर्च कमी करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे खाद्य (१६-२० टक्के प्रथिने व ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ) घरच्याघरी तयार करावे.

उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते.

 जनावरांच्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित, सकस आणि पुरेसा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे ७० टक्के खर्च होतो, हा खर्च कमी करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे खाद्य (१६-२० टक्के प्रथिने व ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ) घरच्याघरी तयार करावे.

चाऱ्यावर प्रक्रिया
जनावरांना नियमितपणे वर्षभर सकस व संतुलित चारा मिळणे आवश्यक असते. मात्र अनियमित पाऊस, पाण्याचा अभाव, चारा लागवडीसाठी जमिनीची कमतरता या गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता जास्त असूनसुद्धा दूध उत्पादनामध्ये घट होते. जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेल्या चाऱ्याचा पुरवठा नियमितपणे करणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते. यासाठी निकृष्ठ चाऱ्यावर कमी खर्चामध्ये प्रक्रिया करणे आणि त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यावर करणे उपयुक्त ठरते.

उसाच्या भुश्‍यावर प्रक्रिया  

  • उसाच्या भुश्‍यावर वाफेची प्रक्रिया करून त्यांमध्ये २ टक्के युरिया, १२ टक्के मळी आणि २ टक्के खनिज मिश्रण मिसळून त्यावर ठरावीक वजनाचा दाब देऊन ब्लॉक तयार केले जातात. हे ब्लॉक तयार केल्यावर २ ते ३ महिन्यांनी जनावरांच्या खाद्यामध्ये वापरावेत.

गहू भुश्यावर प्रक्रिया

  • प्रथम १०० किलो भुसा फरशीवर पसरावा. एका ड्रममध्ये  ५० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण झारीच्या साह्याने सर्व भुश्यावर व्यवस्थित शिंपडावे. भुश्यावर युरियाचे द्रावण शिंपडल्यानंतर तो चांगला खाली वर करावा. यामुळे सर्व भुश्‍यावर सम प्रमाणात द्रावण मिसळते.
  • त्यानंतर भुश्‍याचा ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने हवाबंद करावा. बाजूने शेणमातीचा थर द्यावा. साधारणपणे २१ दिवसांनी या भुश्‍यामध्ये अमोनियाची प्रक्रिया होऊन त्याची पाचकता व रुचकरपणा वाढून त्यामधील प्रथिनांचे प्रमाणही वाढते. यानंतर हा चारा जनावरांच्या खाद्यात वापरावा.
  • प्रक्रिया केलेला गव्हाचा भुसा जनावरांना सुरवातीला १० ते १२ दिवस २ ते ३ किलो द्यावा. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेला चारा दिल्यावर दररोज ५ ते ७ किलो हिरवा चारा देणे आवश्यक असते. जनावरांना स्वच्छ पाणी भरपूर पाजावे.

युरोमोल निर्मिती  

  • प्रथम १५ किलो गव्हाचा कणीयुक्त कोंडा किंवा भाताचा कणीयुक्त कोंडा (तेलविरहित राईस ब्रान) घ्यावा.
  • एका भांड्यामध्ये १२ किलो उसाची मळी आणि त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून २५ ते ३० मिनिटे उकळावे. या गरम द्रावणामध्ये १५ किलो कोंडा चांगला मिसळून घ्यावा.
  • युरोमोल तयार करताना युरिया, उसाची मळी, आंबवण भरडा व्यवस्थित मिसळावे.
  • जनावरांना सुरवातीला सवय होईपर्यंत ८ ते १० दिवस प्रत्येक दिवसासाठी १ किलो युरोमोल द्यावे. हे खाद्य २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस उपयोगात आणू नये.
  • युरोमोल खाद्य ६ महिन्यांपेक्षा लहान वयाच्या वासरांना देऊ नये. जर दुभते जनावर प्रतिदिन २० लिटर पेक्षा अधिक दूध देत असेल तर नेहमीच्या खुराकामध्ये ५० टक्‍क्यांपर्यंत युरोमोल खाद्य उपयोगात आणावे आणि उरलेले ५० टक्के नेहमीचे खाद्य द्यावे. युरोमोलचा जनावरांच्या आहारामध्ये वापर केल्यास खाद्यातील पेंडीचे प्रमाण कमी करता येते.

टीप ः पशूतज्ज्ञाच्या सल्यानेच जनावरांच्या आहारात प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर करावा.

- कु. घोषिता हिंगोणेकर, ८३०८७२६६६८
 (कृषी महाविद्यालय, धुळे)

टॅग्स

इतर कृषिपूरक
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...