agricultural stories in Marathi, Rice plantation new technique | Page 2 ||| Agrowon

तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित तंत्र

डॉ. नरेंद्र काशीद, संदीप कदम, डॉ. विक्रम जांभळे
बुधवार, 29 मे 2019

भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश आहे. भारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पीकक्षेत्रापैकी सुमारे २३.३ टक्के इतके क्षेत्र हे भाताखाली आहे. महाराष्ट्र राज्यातील भात उत्पादकता ही सरासरीपेक्षा कमी असून, उत्पादकता वाढीसाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश आहे. भारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पीकक्षेत्रापैकी सुमारे २३.३ टक्के इतके क्षेत्र हे भाताखाली आहे. महाराष्ट्र राज्यातील भात उत्पादकता ही सरासरीपेक्षा कमी असून, उत्पादकता वाढीसाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

 • भाताचे सुधारित वाण हे कमी उंचीच्या, न लोळणारे व खतास उत्तम प्रतिसाद देणारे आहेत. पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असून, कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे झाल्याने पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन कमी कालावधीत निसवतात.
 • हळवा वाण ः कर्जत १८४, रत्नागिरी १, कर्जत ४, रत्नागिरी २४, रत्ना, फुले राधा, कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी ५.
 • निमगरवा वाण ः जया, पालघर १, फुले समृद्धी, रत्नागिरी ४, कर्जत ५, कर्जत ६, कर्जत ९
 •  गरवा वाण ः रत्नागिरी २, कर्जत २, मसूरी, रत्नागिरी ३, कर्जत ८
 • सुवासिक वाण ः इंद्रायणी, भोगावती, पी. के. व्ही. खमंग
 • खार जमिनीसाठी वाण ः पनवेल १, पनवेल २, पनवेल ३.
 • पेरभातासाठी वाण ः अंबिका, तेरणा, प्रभावती, सुगंधा, पराग अविष्कार
 • संकरित वाण ः सह्याद्री १, सह्याद्री २ (वाशिष्ठी), सह्याद्री ३ (सावित्री), सह्याद्री ४ (हंसा), सह्याद्री ५ (हिरकणी)

बियाणे खरेदी
भात पिकाच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रातूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे.

बियाण्यांचे प्रमाण :
भात पिकांमध्ये पेरणीचे अंतर, जातीपरत्वे, बियाण्यांचे वजन, आकार यानुसार कमी जास्त होत असते.
अ) पुनर्लागवड पद्धतीसाठी-
१.    १००० दाण्याचे वजन १४.५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बारीक जातींच्या भात पिकाचे बियाणे पुढीलप्रमाणे लागते. १५ बाय १५ सें.मी. अंतरावर १५.५ किलो प्रतिहेक्टरी २० बाय १५ सें.मी. अंतरावर २०.० किलो प्रतिहेक्टरी    
२.    मध्यम दाणे असणाऱ्या भातजाती (१००० दाण्याचे वजन १४.५ ग्रॅमपेक्षा जास्त आणि २० ग्रॅमपेक्षा कमी असेल तर) बियाण्यांचे प्रमाण २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी लागते.
३.    मध्यम जाड जात (१००० दाण्याचे वजन २० ते २५ ग्रॅम असेल) बियाण्यांचे प्रमाण ३५ ते ४० किलो प्रतिहेक्टरी.
४. जाड जातींसाठी (१०००  दाण्याचे वजन २५ ग्रॅम पेक्षा जास्त असेल) बियाण्यांचे प्रमाण ४० ते ४५ किलो प्रतिहेक्टरी.
५.    संकरित जातींसाठी हेक्टरी २० किलो बियाणे.
ब) पेरणी पद्धतीसाठी ५० ते ६० किलो प्रतिहेक्टरी.
क) टोकण पद्धतीसाठी २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी.
इ) रहु पद्धतीमध्ये ६० ते ७५ किलो प्रतिहेक्टरी.

बीजप्रक्रीया :

 • भात बियाण्यास तीन टक्के मिठाच्या द्रावणामध्ये (म्हणजे १० लीटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून तयार द्रावणामध्ये) बी बुडवावे. पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. तळाचे जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक व जीवाणूनाशकाची बीजप्रक्रीया करावी.
 •  करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी नियंत्रणासाठी - कार्बेन्डाझीम किंवा बेनलेट  ३ ग्रॅम प्रती किलो.
 •  कडा करपा नियंत्रणासाठी - स्ट्रेप्टोमायसीन ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या द्रावणात बियाणे आठ तास भिजवावे. त्यानंतर बियाण्यावर २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रती १० किलो प्रमाणे किंचित ओलसर करून चोळावे. सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी.

रोपवाटिका व्यवस्थापन  
पुनर्लागवड पद्धतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.  खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते २५ जून पर्यंत १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० सें.मी. उंच गादीवाफ्यावर करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी १० गुंठे रोपवाटिका पुरेशी होते.

त्यात प्रतिगुंठा २५० किलो शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि १ किलो युरीया खत मातीत मिसळून द्यावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती गुंठा १ किलो युरीया खत द्यावे. पावसाअभावी व अन्य कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास युरीया १ किलोप्रमाणे तिसरा हप्ता द्यावा. कीड व रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.

रोप लावणी (रोवणी)/ पुनर्लागवड :
चिखलणी : रोपांच्या पुनर्लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या साहाय्याने चिखलणी करावी. पारंपरिक पद्धतीने स्थानिक लाकडी नांगराने प्रतिदिन ५ ते ६ गुंठे क्षेत्रांची चिखलणी होते. श्रम कमी करण्यासाठी पावर टीलर किंवा ट्रॅक्टरला लोखंडी चाके लावून रोटॅव्हेटरच्या मदतीने चिखलणी करावी.
हळव्या जातींची पुनर्लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी. एका चुडात ३ ते ४ रोपे ठेवावीत. संकरित जातींसाठी एका चुडात फक्त १ ते २ रोपेच ठेवावीत. हळव्या जातींच्या रोपांची लावणी १५ बाय १५ सें.मी. तर निमगरव्या व गरव्या जातींची २० बाय १५ सें.मी. अंतरावर करावी.

शिफारशीत रासायनिक खत मात्रा ः
हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश. हळव्या जातींमध्ये लागवडीवेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागवडीवेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. संकरित जातींकरिता हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलोग्रॅम पालाश अशी खत शिफारस आहे. पैकी लागवडीवेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. उरलेले २५ टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी, उर्वरित २५ टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

भात पुनर्लागवडीचे चारसूत्री तंत्रज्ञान
(डॉ. नारायण सावंत यांच्या चारसूत्री लागवडीची सूत्रे)
सूत्र १: भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा \वापर
१अ. भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटीकेत बी पेरण्यापूर्वी मिसळणे.
भाताच्या राख (पूर्ण जळालेली
पांढरी राख नव्हे) रोपवाटीकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रती चौरस मीटर एक किलो या प्रमाणात ४ ते ७ से. मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी.
नंतर प्रक्रीया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.
१ब. भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडणे.
भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी २ टन या प्रमाणात शेतात गाडून घ्यावा. यामुळे :
१. भातपिकांना पालाश २०-२५ किलो आणि सिलिका १००-१२० किलो यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थात वाढ होते.
२. रोपे निरोगी व कणखर होतात.
३. रोपांच्या अंगी खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
४. भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

सूत्र २ : गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) हिरवळीच्या खताचा वापर
यामध्ये गिरीपुष्प या जलद वाढणाऱ्या वनस्पतीची बांधावर लागवड करून, त्याच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा. चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस प्रतिगुंठा ३० किलो हिरवी पाने जमिनीत गाडल्यास पुरेशी होतात. यामुळे :
१. भातरोपांना सेंद्रिय-नत्र (हेकटरी १० ते १५ किलो) वेळेवर मिळते.
२. खाचरात सेंद्रिय पदार्थ मिळून जमिनीची जडणघडण सुधारते.
३. गिरीपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात.

सूत्र ३: नियंत्रित पुनर्लागवड :
दोरीवर २५ सें. मी व १५ सें. मी आलटून पालटून (-२५-१५-२५-१५-सें. मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें. मी अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. खाचरात १५ बाय १५ सें. मी चुडांचे चौकोन व २५ सें. मी चालण्याचे रस्ते तयार होतात. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (२ ते ४ सें. मी. खोलीवर) लावावीत. यामुळे प्रचलीत पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३०% बचत होते. रोपे तयार करण्याचे श्रम व पैसा वाचतो.

सूत्र ४ : नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची  (युरिया-डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें. मी. खोल खोचावी.  
युरिया-डीएपी खत (६०:४० मिश्रण) वापरून ब्रिकेटस (२७ ग्रॅम/१० ब्रिकेटस) ब्रिकेटिंग मशीनद्वारे तयार करता येतात. एका गुंठ्यामध्ये ६२५ ब्रिकेटस (१.७५ किलो) पुरतात. यातून मिळणाऱ्या खताची मात्रा (प्रती हेक्टरी) : ५७ किलो नत्र + २९ किलो स्फुरद इतकी असते. यामुळे पाण्याबरोबर नत्र व स्फुरद खते वाहून जात नाही. खतामुळे होणारे प्रदूषण टळते. दिलेल्या खतापैकी ८०% पर्यंत नत्र भात पिकास उपयोगी पडते. खतात ४०% पर्यंत बचत होते. ब्रिकेटस खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत.  चारसूत्री पुनर्लागवडीचे हे तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीचा (बी, मजूर व खत यांचा) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर करणारे आहे.


फोटो गॅलरी

इतर तृणधान्ये
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
साठवणूकीतील कीडी रोखण्यासाठी उपाययोजनाशेतीमालाच्या साठवणुकीच्या किफायतशीर आणि...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...