agricultural stories in Marathi, Rice plantation technique | Agrowon

चारसूत्री, ड्रम सीडरने भात लागवड

डॉ. बी. डी. वाघमोडे, डॉ. पी. बी. वणवे
सोमवार, 19 जुलै 2021

चारसुत्री भात लागवड आणि ड्रम सीडरने पेरणी पद्धतीचे विश्लेषण

चारसूत्री पद्धतीने लागवड 

सूत्र १: भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर
भात तुसाच्या राखेचा वापर (०.५ ते १ किलो प्रति चौ.मी.)
लागवडीपूर्वी भाताचा पेंढ्यांचा वापर (२ टन प्रति हेक्टर) यातून ३० ते ४० किलो पालाश आणि १२० ते १४० किलो सिलिकॉन मिळते.

सूत्र २: गिरिपुष्पाच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर
 ३ टन प्रति हेक्टर चिखलणीपूर्वी ६ ते ७ दिवस अगोदर शेतात पसरावा (१२ ते १५ किलो नत्र उपलब्ध)

सूत्र ३ : भाताच्या सुधारित/संकरित जातींच्या रोपांची नियंत्रित लावणी
 जोड ओळ पद्धतीने नियंत्रित लागवड १५-२५ बाय १५-२५ सेंमी (२५ चूड प्रति चौ.मी.)

सूत्र ४: युरिया डीएपी ब्रिकेट्सचा वापर
 २.७ ग्रॅम वजनाच्या युरिया-डीएपी ब्रिकेट्स(६०:४० प्रमाणात)
 लावणीनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक चार चुडांच्या (१५ बाय१ ५ सेंमी) मध्यभागी ७ ते १० सेंमी खोलीवर एक ब्रिकेट खोचावी.
 १७० कि.ग्रॅ. प्रति हेक्टर. यातून प्रति हेक्टरी ५६ किलो नत्र व १४ किलो स्फुरद उपलब्ध.

चार सूत्री पद्धतीचे फायदे 
 शिफारशीपेक्षा ४० टक्के रासायनिक खताची बचत.
 बियाण्यांची ५० टक्क्यांपर्यंत बचत व परिणामी मजुरीवरील खर्च कमी.
 उत्पादनात भरीव वाढ (सरासरी प्रति हेक्टरी ४ टन सुधारित जाती व ६ टन संकरित जाती)
 खर्च : नफा गुणोत्तर - १: १.६०

ड्रम सीडर भात पेरणी पद्धत
१) आवश्यक बियाणे (किलो प्रति हेक्टर)

 बारीक दाण्याच्या भात जाती - ६० ते ७०
 मध्यम बारीक दाण्याच्या भात जाती - ७० ते ८०
 जाड दाण्याच्या भात जाती - ८० ते ९०

२) मोड काढून बियाण्याचा वापर
 रहू पद्धतीने बियाण्यास ३ ते ५ मिमी लांबीचे मोड आणावेत. मोड आलेले बियाणे पेरणीपूर्वी १० ते १५ मिनिटे सावलीत वाळवावे.

३) शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा : (१०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश किलो प्रति हेक्टर)

४) शिफारशीत सेंद्रिय खताच्या मात्रा; शेणखत/हिरवळीचे खत १० टन प्रति हेक्टर

५) भात पेरणीचे दोन ओळींतील अंतर : २० ते २५ सें.मी.

६) ड्रम सीडरचा वापर : मोड आलेल्या बियाण्याची ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करावी.

७) पाण्याचे नियोजन
पेरणीनंतर २ ते ३ दिवस पाणी देऊ नये. भात रोपे वाढीस लागल्यानंतर पाण्याची पातळी वाढवावी.

फायदे
पुनर्लागवडीच्या खर्चात बचत
खर्च : नफा प्रमाण - १ : १.१५

संपर्क : डॉ. बी. डी. वाघमोडे, ९४०४५८०४१६
(प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड)


इतर तृणधान्ये
चारसूत्री, ड्रम सीडरने भात लागवडचारसूत्री पद्धतीने लागवड  सूत्र १: भात...
कृषी शिक्षणाचा उठलेला बाजारम हाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांमध्ये शिक्षण...
बाजरी लागवडीचे तंत्रबाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी....
ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनज्वारी पिकांच्या कमी उत्पादकतेमध्ये कीड, रोगामुळे...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरीअलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण...
उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवडराज्यामध्ये परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रखपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य...
नियंत्रण भातावरील दाणे रंगहीनता रोगाचे...सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान...
बागायती गहू लागवडीची सूत्रेगव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
भातसल्ला (कोकण विभाग)पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
जमिनीच्या प्रकारानुसार वापरा ज्वारी वाणराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू...
रब्बी ज्वारीसाठी करा मुलस्थानी जलसंधारणरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे...खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण...
भातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे...उष्ण - दमट हवामान, जास्त आर्द्रता, भात खाचरातील...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...