शेळी, मेंढीच्या जातीची निवड

उस्मानाबादी शेळी
उस्मानाबादी शेळी

राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी फायदेशीर आहे. या सर्व जाती महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतात. त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे. उस्मानाबादी शेळी ः या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. निवड पद्धतीने जुळी करडे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे. संगमनेरी शेळी ः या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी असतात. या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. ही जात दूध आणि मांसासाठी वापरली जाते. माडग्याळ मेंढी ः या मेंढीची शरीरवाढ चांगली आहे. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन २२ किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो इतके असते. या मेंढ्याच्या अंगावर लोकर कमी असते.

 - ०२४२६ - २४३४५५ वरिष्ठ शास्त्रज्ञ, संगमनेरी शेळी संशोधन योजना  - ०२४२६ - २९४२२५ सर्वसमावेशक दख्खनी मेंढी प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com