agricultural stories in Marathi, semi compact model for poultry | Agrowon

कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे अर्धबंदिस्त मॉडेल

डॉ. मुकुंद कदम, डॉ. गजानन नागरे
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

परसातील मोकाट कुक्कुटपालनातील अडचणी लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने अर्धबंदिस्त शेड मॉडेल उभे करण्याची गरज आहे. यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापन सोपे जाते, आर्थिक उत्पन्न वाढीला चालना मिळते.

आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या अंड्यातील प्रथिनांना संदर्भ प्रथिने मानली जातात. इतर प्रथिनांच्या तुलनेत अंड्यातून मिळणारी प्रथिने उत्तम स्वरूपाची असून स्वस्त दरात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी सुधारित जातीच्या कोंबड्या, संतुलित आहार आणि शास्त्रोक्त व्यवस्थापनाची गरज आहे.

कोंबडीच्या सुधारित जाती व तिचा उद्देश
गिरिराजा-अंडी व मांस
गिरिराणी-अंडी
वनराजा -अंडी व मांस
ग्रामप्रिया -अंडी
हितकारी --अंडी व मांस
उपकारी -अंडी
कृष्णा -अंडी
नंदनम -अंडी
ग्रामलक्ष्मी -अंडी
सातपुडा -अंडी व मांस
कावेरी -अंडी व मांस
चैतन्य -अंडी व मांस

अर्धबंदिस्त शेड मॉडेलचा तपशील ः
१) मध्य उंची : ६ फूट
२) लांबी : ८ फूट
३) रुंदी : ६ फूट
४) एकूण क्षेत्रफळ : ४८ चौरस फूट
५) कोंबडी बसण्याकरिता रॉड : ६ फूट लांब
६) शेडमध्ये उंदीर, साप, सरपटणारे प्राणी येऊ नयेत यासाठी : १ फूट उंचीचा पत्रा
७) बाजूची उंची : ५ फूट
८) पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून पाणघळ : शेडच्या बाहेर निघालेली, १ फूट
९) वेल्डेड पाइप : ११२ चौ. फूट, १४ गेज
१०) एम.एस. पाइप : ६ इंच
११) दरवाजा : ३×५ फूट बाहेर बाजूस निघणारा
१२) दरवाजाच्या बाजूला विजेचे बटण : रात्रीच्या वेळी शेडमध्ये उजेडासाठी लावलेला बल्ब चालू करता येईल
१३) दरवाजा कडी : २, (३ इंच )
१४) छत पत्रा : ७० चौ. फूट
१५) मध्य पाइप : फिडर आणि ड्रिंकर टांगण्यासाठी २ हूक.
१६) अवती भवती मोकळी जागा : २०० ते २५० चौ. फूट (अधिक असेल तर उत्तम)
१७) उपलब्ध साहित्यातून स्वरंक्षक कुंपण/ भिंत : ८ फूट उंची

शेड बांधतानाचे नियोजन ः
१) शेडमध्ये अंडी देणाऱ्या ३५ गावरान आणि ५० मांसल कोंबड्यांचे संगोपन शक्य.
२) शेड मॉडेल सगळ्या बाजूने प्रायमर आणि ऑइल पेंटने रंगवावे.
३) जमिनीवर कमीत कमी १ फूट उंचीचा वीट आणि सिमेंट कोबा करावा. साधारण ५५ ते ६० चौरस फूट फ्लोअरिंग करावे. शेड मॉडेल त्यावर ठेवावे, जेणेकरून पावसाचे पाणी आत जाणार नाही.
४) अर्धबंदिस्त शेड मॉडेल ठेवलेल्या मोकळ्या जागेला कुंपण
करावे. कुंपण तयार करण्यासाठी मुर्गा जाळी, ग्रीन नेट, पत्रा वापरावा.
५) परसातील अर्धबंदिस्त शेड मॉडेलमध्ये सुरुवातीला साधारण एक महिना वयाची पिले (ब्रूडिंग व्यवस्थापन) शेडमध्ये राहतील. पिलांना चांगल्या प्रकारचे खाद्य व पाणी व्यवस्थापन शेडमध्येच करता येते.
६) पिल्ले साधारणपणे एक महिन्याची झाल्यावर दिवसा हळूहळू
अर्धबंदिस्त जागेत फिरण्यासाठी सोडावे. रात्रीच्या वेळी शेडमध्ये ठेवावे.
७) सुरुवातीच्या काळात एक महिना उत्तम प्रतीचे बाजारात उपलब्ध असलेले खाद्य द्यावे किंवा पशुवैद्यकाच्या मदतीने घरी तयार करावे.
८) एक महिना कालावधीनंतर अर्धबंदिस्त जागेत उपलब्ध तसेच घरातील उष्टे अन्न, आठवडी बाजारातील शिल्लक भाजीपाला, तांदूळ, गहू, ज्वारी व उपलब्ध कडधान्य द्यावे. याव्यतिरिक्त म्हैस, गाईचे शेण, ॲझोला तसेच निरुपयोगी खाद्य मोकळ्या शेडमध्ये पसरावे. जेणेकरून ते कोंबड्यांना दिवसा उपलब्ध होईल. खाद्य खर्च कमी करण्यास मदत होईल. अर्धबंदिस्त जागेत उपलब्ध किडे, मुंग्या इतर प्राणिजन्य खाद्य कोंबड्यांना प्रथिने मिळविण्यास उपयुक्त ठरते.
९) उपलब्ध डाळ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, सुके मासे यापासून घरच्या घरी खाद्य तयार करावे.
१०) अर्धबंदिस्त शेडमध्ये रंगीत, देशी, गावरान, ब्रॉयलर व अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन करता येते.
११) सुरवातीचा एक महिना कालावधीनंतर कोंबड्यांना कमीत कमी ५० ते ७५ टक्के संतुलित आहार आणि अर्धबंदिस्त जागेत उपलब्ध खाद्य घटक दिले तर खाद्य खर्चात मोठी बचत होते.
१२) अर्धबंदिस्त शेड मॉडेलमध्ये पावसाळ्यात बाहेर सोडण्यात अडचण येऊ शकते. उन्हाळ्यात नैसर्गिक खाद्य कमतरता व अधिक उष्णता जाणवते. त्यानुसार उपाययोजना कराव्यात.
१३) अर्धबंदिस्त शेड मॉडेलमध्ये जेवढी जास्त जागा कोंबड्यांना बाहेर मिळेल तसेच नैसर्गिक खाद्य विविधता असणे आवश्यक आहे.

महाविद्यालय प्रक्षेत्रावर अंडी देणाऱ्या इंडिब्रो कोंबड्याचे शास्त्रोक्त पद्धतीने अर्धबंदिस्त शेड मॉडेलचे अर्थशास्त्र ः
कालावधी ः सहा महिने (साधारण २५ आठवडे)
कोंबड्यांची संख्या ः ३५ (२५ ते ५० आठवडे)
जागा प्रति कोंबडी ः १. ५ चौरस फूट

१) अंड्यावर येणाऱ्या कोंबडीची किंमत ः २५० प्रति कोंबडी (८,७५० रुपये) २) उत्तम प्रतीचे खाद्य :ः १२० ग्रॅम/ कोंबडी/दिन (एकूण २२ किलो प्रति कोंबडी, एकूण खाद्याची गरज ७७० किलो)
३) खाद्य किंमत -: २३ प्रती किलो (२३ × ७७० = १७,७१० रुपये)
४) इतर खर्च : १० रुपये / कोंबडी (एकूण खर्च ३५० रुपये)
५)एकूण खर्च : ७८९ रुपये / कोंबडी ( एकूण खर्च २६,८१० रुपये)

अंडी देणाऱ्या ३५ कोंबड्यांपासून मिळालेला नफा

१) ३५ कोंबड्यांपासून (१४३ अंडी/ कोंबडी) अंडी उत्पादन ः ५,००५
२) प्रति अंडी किंमत ः १० रुपये
३) अंडी विक्रीतून उत्पन्न ः ५०,०५० रुपये
४) खुडूक कोंबडीची किंमत (१५०/ कोंबडी) ः ५,२५० रुपये
५) एकूण नफा ः ५५,३०० रुपये.
६) एकूण खर्च ः २६,८१० रुपये
७) सहा महिन्यांमध्ये निव्वळ उत्पन्न (२५ ते ५० आठवडे) ः २८,४९० रुपये.
८) प्रति महिना उत्पन्न ः ४,७४८ रुपये

टीप ः
१) दिवसातून दोन ते तीन वेळा अंडी गोळा करावी लागतात.
२) खराब झालेली आणि घरी खाल्लेली अंडी यामध्ये गृहीत धरलेली नाहीत.

देशी जातीच्या (कावेरी, सातपुडा, चैतन्य इ .) कोंबड्याचे अर्धबंदिस्त शेड मॉडेलचे साधारण तीन महिन्याचे अर्थशास्त्र ः
एकूण कोंबड्या ः ५०
प्रति कोंबडी जागा ः एक चौरस फूट
१) एक दिवसाचे पिल्लू ः २२ रुपये (एकूण खर्च १,१०० रुपये)
२) दर्जेदार खाद्य (१० आठवड्यांपर्यंत) ः १.५ किलो/ कोंबडी ( एकूण खाद्य ७५ किलो)
३) खाद्य किंमत ः २५ प्रति किलो (एकूण खर्च १,८७५ रुपये)
४) इतर खर्च (औषधी, लस, वीज, लिटर, इत्यादी) ः ५ रुपये / कोंबडी (एकूण खर्च २५० रुपये)
५) एकूण खर्च ः ६४.५ रुपये / कोंबडी ( ३,२२५ रुपये)

टीप ः
१) उपलब्ध डाळ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, याव्यतिरिक्त म्हैस, गाईचे शेण, अॅझोला तसेच इतर निरुपयोगी खाद्य मुक्त संचार शेडमध्ये टाकावे. जेणेकरून हे खाद्य कोंबड्यांना दिवसा उपलब्ध होईल, खाद्य खर्च कमी होईल.
२) घरातील उष्टे अन्न, आठवडी बाजारातील शिल्लक भाजीपाला कोंबड्यांना द्यावा. (हा खर्च अर्थशास्त्रात गृहीत धरलेला नाही.)

देशी जातीच्या कोंबड्यांपासून मिळणारा नफा ः
१) विक्री किंमत ः १५० रुपये प्रति कोंबडी
२)एकूण नफा ः ७,५०० रुपये
३) एकूण खर्च ः ३,२२५ रुपये
४) निव्वळ उत्पन्न ः ४,२७५ रुपये

टीप ः
१) कोंबडीची विक्री जेवढ्या जास्त किमतीने होईल तेवढा नफा अधिक असेल.
२) कोंबडी मरतूक अर्थशास्त्रात ग्राह्य धरलेली नाही. साधारण ५ टक्के मरतूक अपेक्षित आहे.

अर्धबंदिस्त शेड मॉडेलचा फायदा ः
१) शास्त्रोक्त पद्धतीने अर्धबंदिस्त शेड मॉडेलमध्ये देशी किंवा व्हाइट लेग हॉर्न कोंबडीचे नर चांगल्या प्रकारे सांभाळता येतात.
२) एकदा अर्धबंदिस्त शेड मॉडेल परसात उभे केले की, त्याचा उपयोग कोणत्या कोंबड्या पाळण्यासाठी करायचा हे बाजार मागणीनुसार शक्य होईल.
३) अशा प्रकारचे अर्धबंदिस्त शेड मॉडेल शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
४) अधिक प्रमाणात अर्धबंदिस्त शेड मॉडेल हवे असेल तर बाजारात व्यावसायिक दृष्ट्या उपलब्ध होऊ शकते किंवा आपण घरच्या घरी लाकडाच्या साहाय्याने तयार करू शकतो.
५) अर्धबंदिस्त शेड मॉडेलमध्ये घरच्या महिला/ पुरुष यांना कोंबड्यांवर वेगळे लक्ष देण्याची गरज नाही. शेती काम करताना अर्धबंधिस्तमध्ये कोंबडीपालन शास्त्रोक्त पद्धतीने होऊ शकते.
६) शेतीपूरक व्यवसायासाठी अर्ध बंदिस्त शेड मॉडेल हा चांगला पर्याय आहे.

संपर्क ः डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४
(विभाग प्रमुख, कुक्कुट संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कुक्कपटपालनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)


इतर कृषिपूरक
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...