agricultural stories in Marathi, sigatoka on banana | Agrowon

केळीवरील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापन

डॉ. प्रियंका ब्राह्मणे, डॉ. गणेश देशमुख, प्रा. अंजली मेंढे, डॉ. सी. डी. बडगुजर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडाच्या खालील पानांवर आढळून येतो. सुरुवातीला पानांवर तसेच शिरेस समांतर लहान पिवळसर लांबट गोल ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन वाळतात. त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. या ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाची वलये निर्माण होतात.

सध्या केळी बागेत सिगाटोका म्हणजेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पोषक वातावरण मिळताच रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते. अतिविस्तृत लागवड, हवेतील आर्द्रता फार वेळ टिकून राहणे, दवबिंदू पडून पानांवरील पृष्ठभाग ओला राहणे, ढगाळ वातावरण, २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान या बाबी रोगाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरतात. सतत एकाच वाणाची लागवड, पिलाची अतिरिक्त वाढ, कमी निचऱ्याच्या हलक्या जमिनीत (पोटॅशिअम कमतरता) केळी लागवड करणे इत्यादी कारणांमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि तीव्रता वाढत जाते.
या रोगाने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर रोगनियंत्रण करणे अतिशय अवघड ठरते. त्यामुळे रोगप्रसार होण्याआधीच सामूहिकरीत्या उपाययोजना कराव्यात.

रोगाची लक्षणे 
रोगकारक बुरशी ः मायकोस्पेरीला म्युसिकोला

 •  रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडाच्या खालील पानांवर आढळून येतो.
 •  सुरुवातीला पानांवर तसेच शिरेस समांतर लहान पिवळसर लांबट गोल ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन वाळतात. त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. या ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाची वलये निर्माण होतात. हे ठिपके साधारणतः १ ते २ मिमी पासून २ ते ३ सेंमी आकाराचे असतात.
 •  ठिपके साधारणपणे पानांच्या कडा आणि शेंड्याकडील भागांवर आढळून येतात. ठिपक्यांची संख्या जास्त असेल, तर ठिपके ओळखणे अवघड होते.
 •  अनुकूल हवामान राहिल्यास ठिपके एकमेकांत मिसळून पाने करपतात आणि फाटतात. पाने देठापासून मोडून लोंबकळतात.
 •  पानांचा कार्यक्षम भाग कमी होऊन ती अकाली पिवळी पडतात. देठाशी मडपून लटकलेली दिसतात. कार्यक्षम पानांची संख्या कमी झाल्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. परिणामी झाडाची वाढ खुंटते.
 •  रोगाची तीव्रता वाढल्यास घडावर परिणाम होऊन फळे अकाली पिकू लागतात.

रोगाचा प्रसार 

 •  रोगाच्या वाढीसाठी आर्द्रता हा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवामान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी आहेत.
 •  रोगाची बुरशीचे बिजाणू पानाच्या खालील बाजूने पर्णरंधाच्या पेशीतून आत शिरून रोगाचा प्रादुर्भाव करतात.
 •  बीजाणूंचा प्रसार पानांवर पडणाऱ्या पाऊस किंवा दवबिंदूद्वारे होतो. पावसाच्या पाण्यामुळे पाने धुतली जात असताना मुख्य झाडाखाली वाढणाऱ्या पिलावर या बुरशीचे बीजाणू पडून त्यांना देखील रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे खोडवा ठेवलेल्या बागेत या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते.
 •  पोषक तापमान आणि आर्द्रता असेपर्यंत हे बिजाणू रोगनिर्मितीचे कार्य करत असतात. पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे बीजाणू लांब अंतरावर वाहून नेले जातात, त्यामुळे रोगाचा प्रसार जलद गतीने होतो.
 •  रोगग्रस्त बेणे किंवा उतिसंवर्धित रोपामार्फतही प्रसार होतो.

रोग प्रसारास अनुकूल घटक 

 •  शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड करणे.
 •  पाण्याचा अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळी लागवड करणे.
 •  बागेत तणांचा प्रादुर्भाव होणे. सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.
 • पाण्यात अतिरिक्त वापर.
 •  मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढता त्याकडे दुर्लक्ष राहणे.
 •  पिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेणे.
 •  वर्षभरात केव्हाही केळीची लागवड करणे.
 •  केळीचा खोडवा घेण्याकडे वाढता कल.

एकात्मिक पद्धतीने रोगनियंत्रण 
मशागतीचे उपाय 

 •  रोगट पानांचा भाग किंवा पाने कापून नष्ट करावीत.
 •  श्रीमंती या करपा सहनशील वाणाची लागवड करावी.
 •  शिफारशीत अंतरावर (१.५ मी. बाय १.५ मीटर किंवा १.८ मी. बाय १.८ मीटर) लागवड करावी.
 •  बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे लक्ष द्यावे.
 •  ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना हवामान, वाढीची अवस्था आणि जमिनीची मगदूर यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी.
 •  केळी बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत.
 •  मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत.
 •  शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा (नत्र २०० ग्रॅम, स्फुरद ४० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी.
 •  बागेतील पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
 •  केळी हे एक पीक सतत न घेता पिकाची फेरपालट करावी.

रासायनिक नियंत्रण : (फवारणी प्रतिलिटर पाणी)
प्राथमिक लक्षणे दिसताच,
 क्लोरोथॅलोनील २ मिलि किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त झाल्यास,
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
प्रॉपीकोनॅझोल १ मिलि
स्टिकर मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

(टीप : केळी संशोधन केंद्राकडून शिफारस करण्यात येते.)

- डॉ. सी. डी. बडगुजर, ८८८८८५०८५८
- डॉ. गणेश देशमुख, ९४२२०२१०१६

(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)


इतर फळबाग
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
द्राक्ष बागेत फळछाटणी काळातील अडचणी अन्...द्राक्ष बागेत फळछाटणीसाठी हा महत्त्वाचा कालावधी...
केळीवरील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापनसध्या केळी बागेत सिगाटोका म्हणजेच करपा रोगाचा...
डाळिंब पिकावरील खोड किडा व्यवस्थापनडाळिंब पिकामध्ये झाडाची पाने पिवळी होणे किंवा...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
मोसंबीवरील साल खाणारी अळी, कोळी, रसशोषक...मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर...
ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या...सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी पाऊस पुन्हा...
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
लिंबूवरील खैऱ्या रोगाचे व्यवस्थापनलिंबावरील खैऱ्या (कँकर) हा रोग संसर्गजन्य आहे....
द्राक्ष सल्ला : आगाप छाटणीचे बागेतील...दर वर्षी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, येवला या...
शेतकरी नियोजन - डाळिंबशेतकरी ः दिनेश सीताराम लेंगरे गाव ः खुपसंगी, ता...
फळपिकांसाठी अभिवृद्धीच्या सुधारित पद्धतीफळझाडांची अभिवृद्धी बिया तसेच शाखीय पद्धतीने...
द्राक्ष बागेत खुंट रोपांचे व्यवस्थापन...सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या...
द्राक्ष बागेत द्या अन्नद्रव्यांच्या...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष लागवडीखालील...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
नियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि...
पाऊस झालेल्या द्राक्ष बागेतील समस्यांचे...गेल्या आठवड्यात बऱ्याचशा बागेत पाऊस झाला. काही...
डाळिंब बागेतील मृग बहराचे नियोजनमृग बहराची अवस्था  पीक नियमन, फुलधारणा आणि...
संत्रा बागेच्या पुनरुज्जीवनाचे तंत्रसंत्रा बागेमध्ये जमिनीचा पोत आणि झाडाच्या...
फळबागांमध्ये कंदपिकांचे आंतरपीकफळपिकामध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...