कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल वाळवणी यंत्र

कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल वाळवणी यंत्र
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल वाळवणी यंत्र

कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने बंदिस्त सौर ऊर्जा वाळवणी यंत्र (ड्रायर) विकसित केले आहे. वाया जाणाऱ्या किंवा टाकाऊ नाशवंत शेतमालावर अशा पद्धतीने प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे कमी खर्चात हे तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा संस्थेचा विचार आहे. भाजीपाला, फळे, धान्ये अशा सर्व प्रकारांची वाळवणी या यंत्राद्वारे शक्य झाली आहे. कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्था पर्यावरण विषयात १९८२ पासून कार्यरत आहे. प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेचे सुमारे २०० सदस्य असून ते नोकरी, व्यवसाय सांभाळून संस्थेच्या उद्दीष्ट कार्यासाठी आपला वेळ देतात. पराग केमकर हे यापैकीच एक संस्थेचे सदस्य आहेत. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहेत. वाया जाणारा किंवा टाकाऊ शेतमाल पुन्हा उपयोगात आणण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण व बुद्धीकौशल्य वापरून ड्रायरची (शेतमाल वाळवणी यंत्र) निर्मिती केली आहे. यंत्राच्या विविध चाचण्या झाल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. असा प्रक्रियायुक्त माल टिकावू स्वरूपात ठेवणे व गरजेनुसार त्याची विक्री करणे सुलभ होणार आहे. असे आहे सौर ऊर्जा शेतीमाल वाळवणी यंत्र

  • सौरऊर्जेचा वापर
  • अत्यंत कमी देखभाल खर्च
  • आकार- लांबी १२२ सेंमी, रुंदी ९६ सेंमी, उंची ९५ सेंमी
  • रचना

  • सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर होण्यासाठी ११५ बाय ११५ सेंमीची संपूर्ण पारदर्शक टफन्ड ग्लास
  • संपूर्ण बॉडीची लाकडी रचना. आत तयार झालेली उष्णता बाहेर जाऊ नये असे त्याचे महत्त्व
  • उष्णता शोषून घेण्यासाठी ॲल्युमिनिअमच्या चौकटी
  • शेतमाल वा पदार्थ वाळविण्यासाठी स्टेनलेस स्टील जाळी (फूड ग्रेडची)
  • गरजेनुसार यंत्राची दिशा सहज बदलता यावी यासाठी चाकांची योजना
  • वाळवणी क्षेत्रक्षमता- ४० चौरस फूट
  • यंत्राची वैशिष्ट्ये

  • मजबूत, टिकाऊ बांधणी, वापरण्यास सुलभ
  • बंदिस्त रना केल्याने वातावरणातील धूळ, काडी कचरा, पक्षी, प्राणी यांपासून सुरक्षित, म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीनेही सुरक्षित
  • वाळवणी दरम्यान निर्माण होणारे बाष्प बाहेर काढण्यासाठी प्रत्येकी ७५ मिमी. व्यासाचे सहा स्वयंचलित निकास पंखे
  • या पंख्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्वयंचलित इलेक्‍ट्रॉनिक टायमर
  • यंत्रातील तापमान मोजण्यासाठी तापमापक, तापमापक- शून्य अंश ते १२० अंश
  • वापरलेली विद्युत प्रणाली

  • सोलर पॅनल- १२ व्होल्ट, पाच वॅट
  • अत्यंत कमी देखभाल असलेली बॅटरी- १२ वॅट- तिची आयुष्यमर्यादा- चार वर्षे, किंमत ४०० रु.
  • यंत्रातील तापमान ३० ते ९० अंश सेल्सिअस
  • स्वच्छ सूर्यप्रकाशाचे सरासरी दिवस २०० ते २५०
  • वाळवणी यंत्राची क्षमता- दरदिवशी सर्वसाधारण २५ किलो (डाळी, धान्ये)
  • नोव्हेंबर ते मे या कालावधीत सुमारे सव्वा सहा टन मालावर प्रक्रिया करणे शक्‍य
  • पालेभाज्या असल्यास अडीच ते तीन तासात सुकवणी, कांदा, चिकूसाठी हाच कालावधी दीड दिवसही लागू शकतो.
  • वाळविता येणारा शेतमाल

  • कडीपत्ता, कोथिंबीर, पालक, पुदीना, शेवगा पाने, ओवा, मेथी, कांदा, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, बीट, टोमॅटो, गाजर, चिक्कू, कैरी, केळी आंबा, आले, मोड आणलेली मटकी, मूग, चवळी, हरभरा, सांडगे, पापड, कुरड्या, तिखट सांडगे.
  • याचबरोबर झेंडू, गुलाब पळस, काटेसावर, कडूलिंब, बेलपाने, जास्वंद
  • विशेष म्हणजे पालक, पुदीना, कोथिंबीर वाळवून त्यापासून पावडर तयार करता येते. त्याचा वापर वनस्पतीजन्य म्हणजे नैसर्गिक रंग म्हणून करता येतो.
  • असे चालते वाळवणीचे कार्य

  • यंत्राच्या मागील बाजूला असलेल्या ड्रॉवररूपी माध्यमातून माल यंत्राच्या आता घातला जातो.
  • यंत्रामध्ये स्टेनलेस स्टीलची जाळी वापरण्यात आली आहेत.
  • तापमान जास्त झाल्यानंतर निकास पंखे सुरू होतात.
  • साधारणपणे पाच मिनिटे सुरू राहून आतील जादा उष्णता बाहेर सोडतात.
  • यामुळे वाळवण करण्यासाठी जितके आवश्‍यक आहे तितकेच हवामान मिळते.
  • कोणतीही किचकट प्रक्रिया न वापरता सुलभ पद्धतीने यंत्र काम करते.
  • शेतकरी हेच मुख्य उद्दीष्ट्य संस्थेचे तंत्रज्ञ केमकर म्हणाले, की यंत्राची निर्मिती करताना शेतकरी हाच घटक केंद्रस्थानी ठेवला आहे. त्याचा वाया जाणारा शेतमाल या यंत्राच्या माध्यमातून उपयोगात आला तर त्याचा आर्थिक फायदा त्याला घेता येईल. यंत्राची रचना करताना त्यासाठी लागणारे सुट्टे भाग बाजारातून आणले आहेत. त्याचा ढाचा तयार केला. त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत याचे मोठे समाधान आम्हाला आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना तसेच प्रक्रिया उद्योजकांना नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्‍वास आहे. विक्री करणे हा आमच्या संस्थेचा उद्देश नाही. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधल्यास त्यांना हे तंत्रज्ञान पुरवणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर यंत्र तयार केल्याने त्याचा खर्च तीस हजार रुपयांपर्यंत आला आहे. मात्र, व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू केल्यास हा खर्च २२ हजार रुपयांपर्यंतही कमी होऊ शकतो असे केमकर यांनी सांगितले. पावडरनिर्मिती फायदेशीर आम्ही अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष फिरलो. बाजार संपल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे कोथिंबीर किंवा तत्सम भाज्यांच्या पेंढ्या शिल्लक आहेत त्या विकत घेतल्या. त्यापासून पावडरी तयार केल्या. अशा प्रकारचा व्यवसाय निश्‍चित फायदेशीर ठरू शकतो. या प्रकल्पात संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनीही मदत केली आहे, असे संस्थेचे सदस्य अनिल चौगुले यांनी सांगितले. पराग केमकर- ९१४५६८२५४४ अनिल चौगुले- ९४२३८५८७११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com