agricultural stories in Marathi, soyabean pattaper, chic pea & sugarcane crop cycle gives more profit, Kailas Giri, Chidgiri dist. Nanded | Agrowon

सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये मिळवली वाढ
प्रा. जितेंद्र दुर्गे
मंगळवार, 4 जून 2019

चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी सोयाबीन पट्टा पेर, ऊस आणि त्यात हरभरा आंतरपिकांची पीकपद्धती तज्ज्ञांच्या सहकार्याने बसवली आहे. या पीकपद्धतीमुळे त्यांच्या सोयाबीन उत्पादनामध्ये एकरी ५ क्विंटल, तर ऊस उत्पादनामध्ये एकरी १५ टनापर्यंत वाढ शक्य झाली. सोबतच आंतरपिकामुळे उत्तम बेवड, तणांचे नियंत्रण, पिकाची देखरेख, पीक संरक्षण, रासायनिक खतांमध्ये बचत अशा अनेक बाबी साध्य झाल्या.

चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी सोयाबीन पट्टा पेर, ऊस आणि त्यात हरभरा आंतरपिकांची पीकपद्धती तज्ज्ञांच्या सहकार्याने बसवली आहे. या पीकपद्धतीमुळे त्यांच्या सोयाबीन उत्पादनामध्ये एकरी ५ क्विंटल, तर ऊस उत्पादनामध्ये एकरी १५ टनापर्यंत वाढ शक्य झाली. सोबतच आंतरपिकामुळे उत्तम बेवड, तणांचे नियंत्रण, पिकाची देखरेख, पीक संरक्षण, रासायनिक खतांमध्ये बचत अशा अनेक बाबी साध्य झाल्या.

नांदेड जिल्ह्यातील चिदगिरी (ता. भोकर) येथील कैलास सदाशिव गिरी यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी राज्यशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शेतीमध्ये लक्ष घालू लागल्यानंतर नवीन काय करता येईल, याचा शोध सुरू झाला. त्याच वेळी अॅग्रोवनमध्ये सोयाबीनमध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब करण्याविषयी लेख आला होता. तो वाचल्यानंतर तज्ज्ञांशी संपर्क साधत माहिती घेतली. २०१८ च्या खरीप हंगामामध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन पट्टापेर पद्धतीचे नियोजन केले.

असे होते काटेकोर नियोजन  

 •  सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जेएस ९३०५ वाणाची निवड केली.  
 •  एकरी २५ किलो प्रमाणे ६ ओळी पट्टापेर पद्धतीने १३ जून २०१८ रोजी पेरणी केली. प्रत्येक सातवी ओळ खाली ठेवली.
 •  पेरणीपूर्वी सोयाबिन बियाण्याला सोयाबिन गटाचे रायझोबिअम, पीएसबी व ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया केली. बीजप्रक्रियेमुळे बियाणांची एकसारखी उगवण होण्यास मदत झाली.
 •  चक्रीभुंगा व खोडमाशीचा पुढे होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पीक १५ दिवसांचे असतांना कीटकनाशकाची फवारणी केली.
 •  पीक २० दिवसांचे असताना दोन ओळीतील तणांचे कोळपणीद्वारे तणनियंत्रण केले.
 •      कोळपणीच्या वेळी प्रत्येक सातव्या खाली ठेवलेल्या ओळींच्या ठिकाणी कोळप्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घेतल्या. चिदगिरी परिसरात चांगला पाऊस झाला. दांड पाडलेले असल्यामुळे मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य झाले. त्यामुळे जमिनीतील ओल शेवटपर्यंत पुरून ओलीत करण्याची गरज भासली नाही.
 •      पीक फुलोरावस्थेत येताना बुरशीनाशक + कीटकनाशक + मायक्रोन्युट्रीयंट यांची फवारणी केली.
 •      पिकामध्ये खाली ओळीमुळे पिकाचे निरीक्षण व फवारणी करणे सोपे झाले. शेंगामध्ये दाणे भरतांना ढगाळ वातावरणात अळींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यावर पुन्हा एकदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली.

सोयाबीनचा ताळेबंद

 •  उत्पादन खर्च ः दोन एकर सोयाबिनसाठी दोन बॅग बियाणे ४५०० रुपये, पेरणीखर्च २००० रुपये, रासायनिक खत २४०० रुपये, निंदणी खर्च १००० रुपये, कापणी खर्च ३५०० रुपये, काढणी (मळणी) खर्च ५००० रुपये व तसेच जमिनीची मशागत/फवारणी/डवरणी यासह दोन एकरसाठी साधारणपणे २४ ते २५ हजार रुपये खर्च आला.
 •      दोन एकर क्षेत्रात तब्बल २७ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. पूर्वी एकरी केवळ ८ ते ९ क्विंटल उत्पादन होत असे. तसेच सोयाबिनची प्रत चांगली मिळाली.
 •      सोबायीन गेल्या वर्षी ३३०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. म्हणजेच दोन एकरातून रुपये ८९,१००/- उत्पन्न झाले. त्यातून खर्च २५ हजार वजा जाता निव्वळ ६४ हजार रुपये नफा प्राप्त झाला.

ऊस व आंतरपिक हरभऱ्याचे नियोजन
 

 •     कमी कालावधीचे सोयाबीन वाण असल्यामुळे शेत लवकर खाली झाले. याच शेतात सोयाबिनची पक्वता झाल्याबरोबर प्रत्येक चौथी ओळ लगेचच कापून घेतली. म्हणजेच शेतात प्रत्येक चौथी ओळ व पट्टापेर पद्धतीत खाली ठेवलेली प्रत्येक सातवी ओळ या ठिकाणी उसाच्या बेण्याची लागवड केली. त्यानंतर शेतातील उरलेल्या सोयाबिन पिकाची कापणी केली. उसाच्या दोन ओळीमधील ४.५ फुटांच्या जागेची मशागत करून त्या ठिकाणी हरभरा पिकाच्या दिग्विजय वाणाच्या दोन ओळीमध्ये मजुरांच्या सहाय्याने टोकण केली. ओळीतील अंतर दीड फूट व दोन झाडातील अंतर ८-१० सें. मी. ठेवले. या ४० आर क्षेत्रासाठी १८ किलो बियाणे लागले.
 •      पेरणीपूर्वी बियाण्याला हरभऱ्याचे रायझोबियम व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया केली.
 •      पीक २५ दिवसांचे असतांना स्प्रिंकलरने पहिले पाणी दिले. त्यानंतर पीक फुलकळी अवस्थेत असताना दुसरे ओलीत दिले. तिसरे व शेवटचे ओलीत पीक ६५-७० दिवसांचे म्हणजेच गाठे भरताना दिले.
 •      पीक संरक्षण - पहिली फवारणी पीक २० दिवसांचे असतांना कीटकनाशक + बुरशीनाशक + मायक्रोन्युट्रीयंट ग्रेड - II ची केली. अशाच प्रकारे पीक फुलकळी अवस्थेत असताना दुसरी व घाटे पक्के होतांना तिसरी फवारणी केली.
 •   निंदणीच्या वेळी हरभरा पिकांचे शेंडे खुडून घेतले. हरभऱ्यांच्या फांद्याच्या संख्येत वाढ झाल्याने ऊस पिकाच्या दोन ओळीमधील ४.५ फूट जागा झाकून गेली. हरभऱ्याचे २० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला ४२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळून एकूण ८४ हजार रुपये उत्पन्न मिळाले.
 •     उत्पादन खर्च ः बियाणे ९०० रुपये, पेरणीची मजुरी २००० रुपये, पीक संरक्षण २००० रु., निंदणी व शेंडे खुडणी १५०० रु., काढणी व मळणी ५००० रु. व अन्य खर्च रुपये १५०० या प्रमाणे दोन एकरसाठी एकंदर उत्पादन खर्च १२९०० रुपये एवढा आला.
 •      निव्वळ नफा ७१,१०० रुपये एवढा मिळाला.
 •     दोन एकर क्षेत्रातून खरीप सोयाबीन आणि रब्बी हरभरा पिकातून मिळालेला एकूण नफा ः १३५१०० रु.

उसाच्या उत्पन्नातही वाढ अपेक्षित  

 सोयाबीन पट्टापेर आणि हरभरा आंतरपीक घेतलेल्या याच शेतामध्ये ऊस सध्या जोमदार आलेला आहे. वरील दोन्ही पिकांचे चांगले बेवड मिळाल्यामुळे उसाची वाढ चांगली झाली आहे. रासायनिक खतांचा एकच डोस दिला आहे. एकरी ५५ ते ६० टनापर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीप्रमाणे प्रति टन २१०० रुपये दर धरला तरी २,३१,०००/- रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. येथे आंतरपिकामुळे तणाचा प्रादुर्भाव अत्यल्प राहिला. एकूणच उत्पादन खर्च २० हजार रुपयांपर्यंत आला. ऊस पिकातील निव्वळ २,११,००० रुपये उत्पन्न मिळेल.  
 या दोन एकर क्षेत्राव्यतिरीक्त आणखी ५ एकर पारंपरिक ऊस लागवड आणि खोडवा मिळून आहे. त्यातून एकरी ३५ ते ४० टन ऊस उत्पादन मिळेल. १७५ टन गुणिले २१०० रुपये या प्रमाणे एकूण ३,६७,५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यातून उसाचा उत्पादन खर्च एकरी १३ हजार रुपये प्रमाणे ६५,००० रुपये वजा केल्यास साधारणपणे ३ लाख रुपये निव्वळ उत्पादन मिळेल.
 त्या तुलनेमध्ये सोयाबीन पट्टापेर पद्धतीसह लागवड केलेला ऊस आणि त्यात रब्बीमध्ये घेतलेला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न हाती आले.

पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये एकरी ५.५ क्विंटलने वाढ मिळाली. त्याच क्षेत्रामध्ये ऊस पिकांची लागवड केली. सोयाबीन काढणीनंतर मधील पट्ट्यामध्ये घेतलेल्या हरभरा आंतरपिकानेही चांगलाच हात दिला. नावीन्यपूर्ण पीकपद्धत, दुर्गे सरांचे योग्य मार्गदर्शन आणि अंमलबजावणीमुळे उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाली. प्रथमच शेती हातात घेतल्यानंतर मिळालेल्या यशामुळे वडिलांनीही शाबासकी दिली आहे.
  - कैलास गिरी.  ९८५०९६२१९५, ८६६८७३६०९६

(लेखक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...