agricultural stories in Marathi, stress management in poultry birds | Agrowon

कोंबड्यांचा ताण करा कमी
धनंजय गायकवाड
बुधवार, 3 एप्रिल 2019

तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो. उष्णतेचा थेट परिणाम आरोग्य आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे तापमानवाढीच्या काळात कोंबड्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो. उष्णतेचा थेट परिणाम आरोग्य आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे तापमानवाढीच्या काळात कोंबड्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

तापमान वाढल्याने कोंबड्यांचा आहार कमी होतो. कोंबड्या कमजोर होतात. उत्पादनात घट होते. स्वास्थ्य बिघडल्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. हे लक्षात घेऊन पोल्ट्री शेड आणि कोंबड्यांचे तापमान  कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोंबड्या त्वचाद्वारे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. सगळ्या प्राण्यांमध्ये घाम ग्रंथी असतात. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. परंतु कोंबड्यांमध्ये घाम ग्रंथी नसतात.

उष्णता वाढल्याने कोंबड्यांमध्ये दिसणारी लक्षणे

 • श्‍वासोच्छ्‍वास जलदगतीने होतो.
 •  भरपूर प्रमाणात तहान लागते.
 •  भूक मंदावते. दिलेले खाद्य कमी प्रमाणात खातात.
 •  पंख पसरून उभ्या राहतात.
 •  कमी प्रमाणात खाद्य खाल्याने, अंडी आणि मांस तयार करण्याची क्षमता कमी होते.
 •  अंडी उत्पादन कमी होते. अंड्याचा आकार बारीक होतो. कवच बारीक होते.
 •  शरीराच्या तापमानात वाढ होते.

उष्णता लागण्याची प्रमुख कारणे

 • शेडमध्ये कमी जागेत जास्त कोंबड्या असल्याने उष्णतेचा त्रास होतो.
 •  खाद्य आणि पाण्याची अयोग्य व्यवस्था.
 •  पोल्ट्री शेडमधील अयोग्य वायुविजन.
 • पोल्ट्रीमध्ये गुदमरल्यासारखे होणे, दुर्गंधी येणे. शेडमधील लिटर वेळोवेळी न हालवणे किंवा खराब झालेला भुसा न बदलणे.
 •  शेडबाहेरील तापमानात वाढ.

 उपाययोजना

 • उन्हाळयामध्ये कोंबड्यांच्या शररातील तापमान स्थिर रहाणे आवश्यक असते.
 •  पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे. खाद्याची पौष्टिकता वाढवावी.
 •  छत आणि भिंती थंड ठेवाव्यात.
 •  शेडमधील हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करावी.

 पाणी व्यवस्थापन

 • उन्हाळयात पोल्ट्रीशेडमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्यप्रकारे व्यवस्था ठेवावी.
 •  स्वच्छ आणि थंड पाण्याचा अखंड पुरवठा असावा. पाण्याचे तापमान १५ ते २० सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर त्यांना उष्णता जाणवेल.
 •   उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यासाठी धातूच्या भांड्याऐवजी मातीच्या भांड्याचा वापर करावा, जेणे करून पाणी थंड राहील, कारण धातूच्या भांड्यांमध्ये पाणी लवकर गरम होते.
 • पोल्ट्रीशेडमध्ये स्वयंचलित पाण्याची व्यवस्था नसेल तर दिवसातून दोन वेळा किंवा भांड्यातील पाणी कमी झाल्यास त्यामध्ये पाणी टाकावे.

 खाद्य नियोजन

 • उन्हाळ्यात कोंबड्यांची भूक कमी होते. ज्यामुळे त्यांच्या खाद्याचे प्रमाण घटते. जेवढी पौष्टिकता खाद्यातून मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी येते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यासाठी आपल्याला खाद्याची पौष्टिकता वाढवायला पाहिजे. 
 •  खाद्यातील पौष्टिक तत्त्व जसे की प्रथिने, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्वे इत्यांदीचे प्रमाण १५ ते २० टक्‍के एवढे वाढवावे. खाद्यामधील जीवनसत्त्व सी ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते. खाद्य आणि पाणी यांचे प्रमाण हे १:३ असे असायला पाहिजे. समजा एक कोंबडी जर १०० ग्रॅम खाद्य खाते, तर तिची पाण्याची आवश्‍यकता ३०० मि.लि.पेक्षा जादा होईल. पाणी ताजे, स्वच्छ आणि थंड असेल तर अतिशय योग्य ठरते.

 - धनंजय गायकवाड ९४२२१०७७१९
(लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, जालंदर, पंजाब)

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...