agricultural stories in Marathi, technowon, biogas energy used for all machines, yashkatha namdevrao jagdale | Page 2 ||| Agrowon

बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जा
संतोष मुंढे
शुक्रवार, 28 जून 2019

बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्धव्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्याकील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्कींग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा खुबीने व कल्पकतेने वापर साधून त्यांनी शेतीकामेही सुकर केली आहेत.

बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्धव्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्याकील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्कींग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा खुबीने व कल्पकतेने वापर साधून त्यांनी शेतीकामेही सुकर केली आहेत.

बीड जिल्ह्यात असलेल्या महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाची सुमारे १९७ एकर शेती आहे. शेतीला जोडून त्यांचा दुग्धव्यवसायाचा पूरक व्यवसायदेखील आहे. जगदाळे यांचे सात भावांचे कुटुंब आहे. प्रत्येक भावाकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतदेखील आपली शेती किफायतशीर, कमी खर्चिक करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आहे.
दुग्धव्यवसाय करताना दुधाच्या उत्पादनाव्यतिरिक्त जगदाळे यांनी बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारून जैवइंधनाची सोय केली. त्याचबरोबर या गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून विविधकामे करून घेण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.

वीजनिर्मितीतील प्रयोगशीलता

  • सध्या हे कुटुंब सुमारे २४ संकरित गायी, म्हशी यांच्यासह सुमारे ७५ जनावरांचे संगोपन करते आहे.
  • गोठा, गायींचे आरोग्य व शेणाच्या साह्याने चालणाऱ्या गोबर गॅस युनिटची जबाबदारी
  • सर्वात लहान बंधू नामदेवराव सांभाळतात. वडील कृष्णाजी यांच्यापासून सुरू असलेला हा व्यवसाय
  • तीस वर्षांत बऱ्यापैकी विस्तारला आहे. एवढा पसारा सांभाळताना अनेकदा खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची अडचण येत होती. सध्या ग्रामीण भागातील ही मोठी समस्या आहे. त्यावर काही प्रमाणात उपाय शोधण्यासाठी जगदाळे यांनी जनरेटरचा आधार घेतला. त्याआधारे कडबा कुट्टी यंत्र, दूध काढण्यासाठीचे यंत्र, दूध शीत करणारे यंत्र व अन्य कामे होऊ लागली. मात्र, त्यासाठी ताशी तीन ते साडेतीन लिटर डिझेल लागायचे. डिझेलचे दरही अलीकडे वाढू लागले आहेत. त्याचा परिणाम दुग्धव्यवसायातील उत्पादन खर्च वाढून नफ्याचे मार्जीन कमी व्हायचे.

जनरेटर चालविण्यासाठी गॅसचा वापर

नामदेवराव यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घरच्या गोबरगॅस युनिटमधील गॅसचा वापर करून त्या ऊर्जेवर जनरेटर चालविता येईल का अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मांजरसुंबा येथील आपले मित्र अर्जुन डोळस व जगन्नाथ चव्हाण यांना हा विचार बोलून दाखवला. ‘मॅकेनीक’ असलेल्या या दोघा मित्रांनी प्रयत्न करून पाहू असे सांगत कामाला सुरवातही केली.

अशी झाली तंत्रनिर्मिती

गोबरगॅस युनिटमधून निघणारा गॅस जरनेटर इंजिनाच्या हवा घेण्याच्या मार्गातून सोडला तर हे इंजिन चालायला लागले हे समजले. अर्थात या कामात डिझेलची थोडी मदत त्यांना घ्यावी लागत होती. मात्र, त्यादृष्टीने सुधारणा करण्यात आली. आता इंजिन चालविण्यासाठी ९० टक्‍के गोबरगॅसचा व केवळ दहा टक्‍केच डिझेलचा वापर होतो. म्हणजे साधारण दोन लिटर डिझेलमध्ये सुमारे दिवसभरासाठी
ऊर्जा तयार करणे शक्‍य होत असल्याचं नामदेवराव सांगतात.

असा होतो ऊर्जेचा वापर

गोबरगॅसच्या गॅसवर आधारित इंजिन सुरू केल्यानंतर अनेक कामे करणे शक्य झाले आहे. यात
पाच एचपी मोटरवर कडबा कुट्टी यंत्र चालवणे, साडेसात एचपी मोटरवर एकहजार लिटर दुधाचे शीतकरण करणारे यंत्र, दीड एचपी मोटरवर चालणारे मिल्कींग मशीन आदी कामे या तंत्राद्वारे एकावेळी साधता येतात. याशिवाय गोठ्यातील फॅन, प्रसंगी घरातील पंखे या बाबीही शक्य होऊ शकतात. त्यातून महिन्याला सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांची बचत होत आहे.

मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक

जगदाळे यांचे मोठे कुटुंब आहे. साहजिकच गोबरगॅस इंधनामुळे किमान नऊ जणांचा स्वयंपाक, पाणी गरम करणे, चहा किंवा अन्य पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. यातून सिलिंडरच्या खर्चातही बचत होत आहे. गोबर गॅसधून निघणाऱ्या स्लरीचा वापर फळबागांमधील झाडांना वापरण्याचे तंत्रही जगदाळे यांनी अवलंबिले आहे. त्या माध्यमातून रासायनिक खतांवरील खर्चातही बचत झाली आहे.

असे वापरले तंत्र

  • गोबरगॅसच्या साह्याने जनरेटर इंजिन चालविण्याचा प्रयोग करताना सुरवातीला
  • हा गॅस एका नळीच्या साह्याने इंजिन ठेवलेल्या एका खोलीतील टॅंकमध्ये घेण्यात आला. गॅस साठविण्यासाठी टॅंकच्या पाठीमागील एका खोलीत मोठा रबरी बलून उभा करण्यात आला. टॅंकमधील गॅस नळीच्या साह्याने इंजिनमधील हवा ओढण्याच्या जागेत सोडण्यात आला. इंजिनवरील भार जसजसा वाढेल व त्याला गॅसची जसजशी गरज असेल तशा पध्दतीने त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी कॉकची सोय केली आहे. हा बलून सुमारे १० फूट उंचीचा आहे. तो बारामती येथील एका वितरकाकडून आणला आहे. हा बलून फुटण्याचा व पुढील आपत्तीचा धोका नसल्याचे नामदेवराव यांनी सांगितले.
  • आत्तापर्यंत सुमारे ६०० शेतकऱ्यांनी हा प्रयोग प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले असल्याचे ते म्हणाले. याबाबत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाते आहे. गेल्या दोन वर्षांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. हे तंत्र वापरण्यासाठी गोबरगॅस १० पाटी व २०० लिटर पाणी असे तयार केलेल्या नाल्यात घ्यावे लागते. मात्र सध्या पाणीटंचाई असल्याने बलूनचा वापर थांबवला आहे. त्याऐवजी गोबरगॅस टाकी व पाइप्स यांचा वापर करून जनरेटर चालविण्याचे काम करीत असल्याचे नामदेवराव म्हणाले.

नामदेवराव जगदाळे-९०११६९७१०३

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...
दुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...
स्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...
ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...
ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...
पोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...
पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...
खवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...
यंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...
गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...
लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...
पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...