agricultural stories in Marathi, technowon, Brown rice producing machine | Page 2 ||| Agrowon

यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळ

रणजीत शानबाग, डॉ. योगेश कुलकर्णी
गुरुवार, 16 मे 2019

हातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा विचार करून विज्ञान आश्रम या स्वयंसेवी संस्थेने हातसडीचा तांदूळ बनवणारे विद्युतचलीत यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र ग्रामीण भागातील युवा उद्योजक आणि महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

हातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा विचार करून विज्ञान आश्रम या स्वयंसेवी संस्थेने हातसडीचा तांदूळ बनवणारे विद्युतचलीत यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र ग्रामीण भागातील युवा उद्योजक आणि महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

आरोग्य आणि आहाराविषयीच्या जागृतीमुळे हातसडीच्या तांदुळाला चांगली मागणी आहे. भात उत्पादक पट्यातील अनेक महिला बचत गट हाताने कांडून साळ काढतात. भाताच्या बाहेरील टरफलाखाली (साळी) पातळ लालसर रंगाचा थर असतो. भाताच्या जातीनुसार हा थर कमी जास्त आणि लाल ते तांबूस काळ्या रंगाचा असतो. सर्वसाधारणपणे भाताच्या वजनाच्या १० ते १२ टक्के कोंडा भातामध्ये असतो.

कोंड्यामध्ये आहेत अन्नद्रव्ये ः
स्वयंचलित विद्युत यंत्रचा उपयोग करून तांदूळ बनवताना पॉलिश करून पांढरेशुभ्र केले जाते आणि हा लालसर थर पूर्णपणे काढून टाकला जातो. खरेतर भाताच्या कोंड्यामध्ये पांढऱ्या शुभ्र तांदुळापेक्षा दुपटीने फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह सारखे घटक असतात. परंतु तांदूळ पॉलिश करताना ते काढून टाकले जातात. कर्बोदके आणि थोड्या प्रमाणात तंतुमय पदार्थ शिल्लक राहतात.

हातसडी तांदूळ तयार करणारे यंत्र ः

  1. हातसडीच्या पद्धतीने तांदूळ तयार करण्याची प्रक्रिया कष्टाची आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा पॉलिश यंत्रामधून एकदा भात घालून निघालेला तांदूळ हातसडीचा म्हणून दिला जातो. या प्रक्रियेत साळेवर कमी प्रक्रिया होते आणि तांदळाची जास्त तूट होते.
  2. हातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा विचार करून विज्ञान आश्रम या स्वयंसेवी संस्थेने हातसडीचा तांदूळ बनवणारे विद्युतचलीत यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र ग्रामीण भागातील युवा उद्योजक आणि महिला बचत गटांना फायदेशीर ठरणारे आहे.
  3. हे यंत्र साधारणपणे घरातील पिठाच्या चक्कीच्या आकाराचे आहे. घरातील विद्युत प्रवाहावर (सिंगल फेज) एक अश्वशक्ती मोटरच्या सहाय्याने चालते.
  4. यंत्र क्षमता ताशी १५ ते २० किलो आहे. यंत्रामध्ये ८० ते ९० टक्के साळवर प्रक्रिया होते.
  5. यंत्रामध्ये रबरी जाती विशिष्ट प्रकारे बसवलेल्या आहेत. त्यामुळे भाताच्या कोंड्याची कोणतेही हानी न होता फक्त साळ वेगळी करण्यात येते. तांदळाचा तुकडा फक्त १ ते २ टक्के दिसून येतो. साळीचे टरफल व तांदूळ या आपोआप वेगळा होतो.
  6. हातसडीच्या तांदळात पोषक मूल्ये आणि कोंड्यात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्याकडे कीडे आकर्षित होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात तांदूळ न भरडता, ग्राहकांच्या मागणीनुसार साळीवर प्रक्रिया करून विक्री करावी.
  7. आपल्याला गेली अनेक दशके पॉलिश भात शिजवून खाण्याची सवय आहे. त्यामुळे सुरवातीला तांदूळ अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून त्यानंतर कुकरमध्ये मंद आचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवावा किंवा पाण्यामध्ये न भिजवता मंद आचेवर ४० मिनिटांपर्यंत शिजवावा.
  8. हातसडीचा तांदूळ विकताना ग्राहकांना भात शिजवण्याची योग्य माहिती दिली तर कायम स्वरूपी ग्राहक मिळू शकतो.
  9. यंत्राची किंमत साधारणपणे ६५,००० रुपये आहे.

संपर्क ः डॉ. योगेश कुलकर्णी, ९७३०००५०१६
(विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे)
 


इतर टेक्नोवन
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्रसाखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक,...
पारंपरिक साठवण पद्धतीला नव्या...पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
कढीपत्ता भुकटी निर्मितीकढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर...
धान्य, बियाणे साठवणुकीसाठी झिल्ले,...महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांत अनेक...
निर्वातात पदार्थ तळण्याचे तंत्रज्ञान तळलेले पदार्थ हे आपल्या आहाराचा एक भाग आहे....
सागरी पवनचक्क्यांच्या उभारणीतील...गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या...
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेकांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार...
बेकरी प्रक्रिया उद्योगासाठी उपकरणेप्रामुख्याने तृणधान्यावरील प्रक्रिया उद्योगामध्ये...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर...
जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...
यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...
जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...