बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त नवे साधन

ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या अंकुरणासाठी कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी रसायनाचा शोध लावला आहे. यामुळे भविष्यात वाढत्या तापमान व दुष्काळाच्या स्थितीतही पिकांचे अंकुरण व पुढील अवस्थांमध्ये योग्य वाढ करून घेणे शक्य होईल.
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त नवे साधन
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त नवे साधन

ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या अंकुरणासाठी कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी रसायनाचा शोध लावला आहे. यामुळे भविष्यात वाढत्या तापमान व दुष्काळाच्या स्थितीतही पिकांचे अंकुरण व पुढील अवस्थांमध्ये योग्य वाढ करून घेणे शक्य होईल. दुष्काळ व अन्य अडचणीच्या स्थितीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता झाडांमध्ये व बियांमध्ये असते. ते पाण्याची योग्य तितकी पूर्तता होईपर्यंत एक विशिष्ट संजीवक सोडून तग धरून राहतात. हेच संजीवक (एबीए) बियांना सध्याचा काळ हा वाढीसाठी योग्य नसल्याचा संदेश देते. या संशोधनाविषयी माहिती देताना विद्यापीठातील प्रकल्प संशोधक आदित्य वैद्य यांनी सांगितले, की जर आपण एबीए या संजीवक बंद करून टाकले तर बियांच्या अंकुरणासाठी असलेला प्रतिरोध काढून टाकता येतो. आम्ही यावर आधारित अॅन्टाबॅक्टीन हे नवे रसायन तयार केले असून, त्याचा वापर केल्यानंतर सुप्तावस्थेतील बियांच्या अंकुरणाला चालना मिळते. एबीए संजीवकाच्या गुणधर्माची नक्कल करणाऱ्या अॅण्टाबॅक्टीनच्या कार्यक्षमतेबाबत केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष ‘दी प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ओपॅबॅक्टीन नावाने अन्य एक रसायन वनस्पतींची वाढ मंद करते. यामुळे पाण्याची साठवण शक्य होते. तसेच वनस्पतींच्या पानावरील सूक्ष्म छिद्रे बंद करण्याचे काम करते. यामुळे पाण्याचे बाष्पोत्सर्जन होण्याचे रोखून पाणी वाचवले जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये संशोधकांनी ही छिद्रे उघडण्याचा परिणाम साधण्यासाठी व झाडांची वाढ वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले. बियांची सुप्तावस्था कमी करण्यासाठी पैदास प्रक्रियेतून सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी अद्याप काही पिकांमध्ये उदा. लेट्यूस, पालक मध्ये सुप्तावस्थेची समस्या जाणवत राहते. त्याविषयी माहिती देताना वनस्पती पेशी जीवशास्त्राचे प्रो. सीन कटलर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांसाठी वनस्पती किंवा पिकांची वाढ वेगाने किंवा आवश्यकतेनुसार योग्य वेळी रोखली जाणे या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओपॅबॅक्टीनच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या रसायनांचा शोध घेण्यासाठी वैद्य यांनी सुमारे ४ हजार डेरिव्हेटिव्ह तयार केले. मात्र त्यात एक रासायनिक अडचण होती. त्यांनी तयार केलेले संयुग अत्यंत सामर्थ्यवान होते. त्यामुळे एबीए ला जोडले गेलेले रिसेप्टर बंद होते. असे आहे संशोधन चाचण्यांमध्ये संशोधकांनी अॅण्टाबॅक्टीनचा वापर बार्ली आणि टोमॅटो बियांवर केला. त्यामुळे अंकुरणाची प्रक्रिया वेगाने झाली. अॅण्टाबॅक्टीन आणि ओपॅबॅक्टीन ही दोन्ही रसायने एकत्रितपणे काम करू शकतात. भविष्यामध्ये वातावरण बदलाच्या काळात वाढत्या कोरडेपणा आणि उष्ण स्थितीमध्ये पिकांच्या अंकुरण आणि वाढीमध्ये उपयुक्त ठरतील. अॅण्टाबॅक्टिनच्या साह्याने एकदा बियांचे अंकुरण करून आरोग्यपूर्ण रोपे विकसित करून घ्यावयाची. पुढे पाण्यामध्ये बचत करण्याची आवश्यकता भासल्यास वाढीच्या अवस्थेत ओपॅबॅक्टिन फवारणीद्वारे वापरायचे. यामुळे पुढे फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये पिकांच्या प्रजननक्षम वाढीसाठी आवश्यक तितके पाणी पिकामध्ये साठवून घ्यायचे. हे थोडेसे गर्भारपणाच्या व प्रसुतीनंतरच्या काळामध्ये अत्यंत पौष्टिक आहाराचा खुराक देण्यासारखे आहे. कारण झाडांना फुलोरा आणि फळे धरण्याच्या अवस्थेमध्ये अधिक पाणी आणि अन्नद्रव्ये लागतात. उदा. मका, गहू इ. सध्या संशोधन एबीए मुळे अन्य वनस्पती प्रजातीमध्ये बियांच्या सुप्तावस्थेतील बदल आणि प्रकाराचा अभ्यास करत आहेत. त्याच प्रमाणे ज्या काळात पाण्याची मुबलकता असताना, हरितगृहासारख्या संपूर्ण नियंत्रित स्थितीमध्येही काही चाचण्या आणि अभ्यास केला जाणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले. अमेरिका  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com