अधिक शाश्वत उत्पादकतेसाठी वनस्पतीतील अंतर्गत घड्याळ उपयुक्त

प्रत्येक सजीवामध्ये, अगदी वनस्पतीमध्येही दडलेले एक घड्याळ असते. त्यासाठी वेळेची ही जाणीव सातत्याने जागृत ठेवण्यासाठी कारणीभूत जनुकांना किकार्डियन क्लॉक जीन्स असे म्हणतात. त्यानुसार दैनंदिन आणि हंगामी कामे वनस्पती पार पाडत असते.
अधिक शाश्वत उत्पादकतेसाठी वनस्पतीतील अंतर्गत घड्याळ उपयुक्त
अधिक शाश्वत उत्पादकतेसाठी वनस्पतीतील अंतर्गत घड्याळ उपयुक्त

प्रत्येक सजीवामध्ये, अगदी वनस्पतीमध्येही दडलेले एक घड्याळ असते. त्यासाठी वेळेची ही जाणीव सातत्याने जागृत ठेवण्यासाठी कारणीभूत जनुकांना किकार्डियन क्लॉक जीन्स असे म्हणतात. त्यानुसार दैनंदिन आणि हंगामी कामे वनस्पती पार पाडत असते. अधिक शाश्वत कृषी उत्पादकतेसाठी या घड्याळावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी वनस्पतीच्या या किकार्डियन घड्याळाच्या वापरातून कृषी उत्पादनामध्ये अधिक शाश्वतता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वनस्पतीशास्त्राचे प्रो. अॅलेक्स वेब यांनी सांगितले, की आपली एका स्वतःभोवती आणि त्याच वेळी सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर राहतो. स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस रात्र तयार होतात आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू किंवा हंगाम निर्माण होतात. यांची एक साखळी असते. या साऱ्या घटकांचा आपल्या जीवशास्त्रावर मोठा परिणाम होतो. पर्यावरणातील विविध घटकांशी सर्व गणिते योग्य प्रकारे जुळून आली तरच वनस्पतीही चांगल्या प्रकारे वाढू शकतात. वनस्पतीच्या प्रत्येक प्रक्रियेमागे हे घड्याळ कार्यरत असते. त्यांच्या फुलोरा येण्याचा कालावधी, प्रकाश संश्लेषण, मुळांद्वारे उचललेल्या पाण्याचा वापर या साऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवणारी जनुकेही शेवटी या घड्याळाशी जोडलेली असतात. यातील कोणतेही कार्य आपल्या मर्जीनुसार नियंत्रित करायचे असेल किंवा त्यानुसार पुढील प्रजातींची पैदास करायची असेल, तर वनस्पतीचे किकार्डियन घड्याळ व त्याचे नेमके कार्य जाणून घेणे गरजेचे असते. याला ‘क्रोनोकल्चर’ असे म्हणतात. याबाबत केंब्रिज विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल सायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. निष्कर्ष १) पिकाच्या वाढीच्या घड्याळाचे चक्र समजून आल्यास पिकाचे सिंचन, तणनाशक वापर, कीटकनाशक वापर यांच्यासाठी योग्य असलेला काळ शोधणे शक्य होईल. त्यातून या घटकांची कार्यक्षमता वाढेल. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य होईल. वेब म्हणाले, की प्रयोगशाळेतील प्रयोगातून आपल्याला पिकाला सिंचन कधी करावे किंवा फवारणी कधी करावी, यांचा योग्य काळ मिळवता येईल. त्याच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी निविष्ठा, खर्च आणि वेळ वाचविणाऱ्या ठरतील. २) आधुनिक मजल्याच्या शेतीमध्ये अनेक वेळा कृत्रिम प्रकाश व उष्णता देणारी यंत्रणा बसवलेली असते. जितका अधिक काळ प्रकाश दिला तितकेच प्रकाश संश्लेषण होईल, असे सामान्यपणे मानले जाते. मात्र प्रकाश किंवा उष्णता पुरवणे हे अधिक ऊर्जा लागणारे काम आहे. अत्यंत कार्यक्षम आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक त्या काळातच प्रकाश पुरवण्याची गरज आहे. हे प्रकाश किंवा उष्णता पुरवण्याचे चक्र वनस्पतीच्या किकार्डियन घड्याळाशी जुळल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. ३) क्रोनोकल्चरचा सर्वात महत्त्वाचा फायदा काढणी पश्चात कामामध्ये होऊ शकतो. कारण त्यानंतर वनस्पतीचे विविध भाग कुजण्यास सुरुवात होते. वनस्पतीची प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर किडीस रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. वेब यांनी सांगितले, की जेव्हा किडी जास्त कार्यरत असतात, अशा दिवसाच्या वेळी वनस्पतींची प्रतिकारशक्ती अधिक कार्यरत असते. म्हणजेच रेफ्रिजरेटेड गाडीमध्ये दिवस रात्रीच्या चक्राप्रमाणे दिव्यांची रचना केली तर वनस्पतींच्या अंतर्गत घड्याळ कार्यरत होते. त्यामुळे वनस्पतींची साठवण चांगली होईल. साठवणीमध्ये शेतीमाल खराब होण्याचे प्रमाण कमी करता येईल. ४) योग्य वातावरणामध्ये नियमित काळापेक्षा मागे किंवा पुढे फुलोरा आणण्याची गरज येत्या हवामान बदलाच्या किंवा तापमान वाढीच्या काळात भासू शकते. पिकांच्या जातींची पैदास करताना या घटकांवर पैदासकारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वेब यांच्या मते, भविष्यात प्रत्येक ठिकाण, हवामान यानुसार पिकाच्या वेगळ्या जाती विकसित कराव्या लागतील. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या अन्नाची सोय शाश्वतपणे करायची असेल, तर अधिक संशोधनाला पर्याय नसल्याचे ते सांगतात. येत्या ३५ वर्षामध्ये सध्याच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन घेणे गरजेचे असेल. ५) हेच घड्याळ मानवी आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे असते. प्रत्येकाची औषधे घेण्याची वेळ त्याच्या आरोग्य आणि अंतर्गत घड्याळानुसार ठरवणे अधिक फायद्याचे राहिले. याला ते ‘क्रोनोमेडिसीन’ असे म्हणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com