agricultural stories in Marathi, Technowon, Comparing the pathogen numbers in backyard and commercial composts | Page 2 ||| Agrowon

संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर ठरतो सुरक्षित

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील संशोधनातून फक्त संपूर्ण कुजलेले कंपोस्ट खत हे हानिकारक सूक्ष्मजीवांपासून अधिक सुरक्षित असू शकते हे पुढे आले आहे. संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्न्मेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील संशोधकांनी गोठे किंवा परसबागेतील शेणखतांच्या खड्ड्यांतील खत आणि व्यावसायिक कंपोस्ट खत या दोन्हीमधील हानिकारक सूक्ष्मजीवांचे प्रमाण मोजले आहे. या सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिजैविकांसाठी प्रतिकारक जनुकांचेही प्रमाण मोजण्यात आले. या संशोधनातून फक्त संपूर्ण कुजलेले कंपोस्ट खत हे हानिकारक सूक्ष्मजीवांपासून अधिक सुरक्षित असू शकते हे पुढे आले आहे. संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्न्मेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

विविध सेंद्रिय अवशेष, शेण, प्राण्याचे मलमूत्र यातून पिकांसाठी सेंद्रिय खतांचे निर्मिती केली जाते. सामान्यतः बहुतेक शेतकरी केवळ हे सारे घटक एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून सहा महिने ते एक वर्ष काळासाठी कुजू देतात. पुढे हंगामाच्या सुरुवातीला या गावखताचा वापर शेतामध्ये केला जातो. त्याच प्रमाणे व्यावसायिक पशुपालन करणाऱ्या मोठ्या गोठ्यांमध्ये शेण व प्राण्यांचे मलमूत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. त्यापासून सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न केले जातात. कारण या घटकांच्या विक्रीतूनही चांगला फायदा मिळू शकतो. अशा दोन्ही प्रकारच्या सेंद्रिय खतांचे नमुने घेऊन त्यांचे विश्‍लेषण इल्लिनॉइज विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्याविषयी माहिती देताना एन्गुएन प्रयोगशाळेत काम करणारे संशोधक विद्यार्थी युक्विंग माओ यांने सांगितले, की गावखत किंवा व्यावसायिक कंपोस्ट खतांच्या प्रक्रियेमध्ये भिन्नता असल्याने त्यांचा पोत व रचनाही वेगळी असते. त्यात प्राणीज घटकांचा समावेश झाल्यास रचनेमध्ये आणखी बदल संभवतात. व्यावसायिक कंपोस्टिंग करणाऱ्या कंपन्या या प्रामुख्याने शेतातील शिल्लक अवशेषांवर लक्ष केंद्रित करतात. या पैकी कोणत्याही पद्धतीमध्ये हानिकारक सूक्ष्मजीवांचा वाढ होऊ नये, यासाठी सामान्यतः काही विशेष प्रयत्न केले जात नाही. मात्र कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या उच्च उष्णतेमध्ये काही हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. तरिही काही उष्ण प्रतिकारक सूक्ष्मजीव यातही तग धरू शकतात.

अशा प्रकारे झाला अभ्यास

  •  दोन पदवीधर विद्यार्थ्यांच्या साह्याने परसबागेतील खत खड्डे, प्राणीज घटकांचा वापर असलेले कंपोस्ट, अगदी सुपर मार्केटमधून मिळवलेले व्यावसायिक कंपोस्ट अशा सुमारे सहा प्रकारच्या कंपोस्ट खतांचे नमुने घेण्यात आले. तसेच कुजलेल्या किंवा अर्धवट कुजलेल्या अशा कोणत्याही प्रकारचे कंपोस्ट न वापरलेले मातीचे दोन नियंत्रित नमुनेही घेण्यात आले. थोडक्यात, या मातीच्या नमुन्यावर कोणताही उष्णता प्रक्रिया झालेली नव्हती. या प्रत्येक नमुन्यातून डीएनए वेगळे करून त्यांची क्यूपीसीआर तंत्रज्ञानाने ओळख पटविण्यात आले. हानिकारक सूक्ष्मजीवांचे विशेषतः अन्नाद्वारे पसरून माणसांसाठी हानिकारक ठरणाऱ्या ई-कोलाय आणि सॅलमोनेल्ला इन्टेरिका आणि हवेतून पसरणारे लेजिओनेल्ला न्युमोफिला (मायकोबॅक्टेरिअम स्पेसिज) यांचे नमुन्यातील प्रमाण मोजण्यात आले.
  •  दुसऱ्या अभ्यासामध्ये अशाच सहा प्रकारच्या कंपोस्टमध्ये प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित झालेल्या जनुकांचा शोध घेण्यात आला.

निष्कर्ष 

  • अभ्यासासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये सॅलमोनेल्ला स्पे. मिळाल्या नाहीत.
  •  अर्धवट कुजलेल्या कंपोस्ट नमुन्यामध्ये ई-कोलाय हे हानिकारक जिवाणू आढळले. मात्र संपूर्णपणे व्यवस्थित कुजलेल्या खतांमध्ये या हानिकारक जिवाणू आढळले नाहीत.
  •  व्यावसायिक पद्धतीने मिळवलेल्या चार कंपोस्ट खत नमुन्यामध्ये लेजिओनेल्ला न्युमोफिला आढळले.
  •  अन्य दोन प्रकारचे हवेतून पसरणारे हानिकारक सूक्ष्मजीव दोन्ही
  • परसबागेतील आणि व्यावसायिक कंपोस्ट नमुन्यात आढळले.
  •  क्यूपीसीआर तंत्रामध्ये जिवंत आणि मृत सूक्ष्मजीव वेगळे ओळखता येत नाहीत. त्यामुळे मानवासाठी ते कितपत हानिकारक आहेत, याविषयी कोणतेही भाष्य करता येत असल्याचे स्पष्टपणे
  • नमूद करण्यात आले आहे.
  •  प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित झालेल्या जनुकांचे प्रमाण अर्धवट कुजलेल्या कंपोस्ट खतांमध्ये अधिक आढळले. मात्र संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांमध्ये त्यांचे प्रमाण उष्णतेमुळे कमी झाल्याचे दिसून आले.

हवेतून पसरणारे सूक्ष्मजीव कंपोस्ट खतांमध्ये शिरकाव कशा प्रकारे करतात, हे अद्याप फारसे स्पष्ट झालेले नाही. त्यावर अधिक प्रकाश पडणे गरजेचे असून, भविष्यामध्ये सुरक्षित कंपोस्ट खते उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या संपूर्णपणे कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर शेती किंवा बागकामांसाठी करण्यावर भर दिला पाहिजे.
- थानह ह्युवान एन्गुएन, इवान रॅचेफ प्रोफेसर, स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी, इल्लिनॉइज विद्यापीठ, अमेरिका


इतर टेक्नोवन
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...