नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले सोपे

नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले सोपे
नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले सोपे

विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम तपासण्यासाठी प्रक्षेत्रातील तापमान नियंत्रित ठेवले जाते. या तापमान नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि स्वस्त असे तापमान नियंत्रक क्लेमसन विद्यापीठामध्ये तयार केले आहेत. सध्या वातावरणीय नियंत्रण कक्ष तयार करणे महागडे असल्याने अनेक प्रयोग होऊ शकत नाहीत. त्या तुलनेमध्ये लावा आणि वापरा इतके सोपे असल्याने विविध कृषी, फळबाग आणि वन विभागातील प्रयोगांसाठी वापरणे परवडणार आहे. बदलत्या वातावरणामध्ये पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये होणारे परिणाम अनेक प्रयोगांमध्ये तपासले जातात. अशा प्रयोगांसाठी प्रयोगशाळेमध्ये किंवा प्रक्षेत्रामध्ये नियंत्रित वातावरण खास तयार करावे लागते. ते अत्यंत महागडे ठरते. यासाठी खास तापमान नियंत्रक क्लेमसन विद्यापीठामध्ये तयार करण्यात आले आहेत. संशोधक डग्लस बाईलेनबर्ग आणि क्सेनिजा गासिक हे सध्या या तापमान नियंत्रकाचा व्यावहारिक वापर करण्यासाठी चाचण्या घेत आहेत. कापलेल्या फांद्या, डोळे आणि बियांचे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्याचे निष्कर्ष हॉर्टसायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

  • हे प्लग अॅण्ड प्ले (लावा आणि वापरा) तत्त्वावरील तापमान नियंत्रक उपलब्ध झाले आहेत. त्याद्वारे चेस्ट फ्रीझरमध्ये आवश्यकतेनुसार योग्य त्या तापमानाची नियमावली (प्रोग्रॅम) सहजतेने तयार करता येते. चेस्ट फ्रीझरमध्ये ते लावणेही अत्यंत सोपे असून, केवळ काही मिनिटांमध्ये लावून वापर सुरू करू शकतो.
  • या संपर्ण वनस्पती किंवा त्याचा काही भाग नियंत्रित तापमानामध्ये ठेवता येतो. यात आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे तापमान ठेवता येते. उदा. वनस्पतीच्या बिया किंवा लहान रोपांचे भाग यावर उष्णतेच्या विविध अवस्थेमध्ये होणारे परिणाम तपासायचे असतील, तर तशी नियमावली देऊन तापमान नियंत्रकांद्वारे तापमान ठेवता येते.
  • मोठ्या आकाराच्या वनस्पतींवर प्रयोग करण्यासाठी त्रिमितीय आकाराचे वातावरणीय कक्ष (एन्व्हायर्नमेंटल चेंबर) तयार करावे लागतात. असे कक्ष तयार करणे तुलनात्मक महागडे ठरते. त्याऐवजी साध्या चेस्ट फ्रीझरचे रूपांतर नव्या प्लग अॅण्ड प्ले तापमान नियंत्रकांद्वारे वातारवणीय कक्षामध्ये काही मिनिटांमध्ये करणे शक्य होते. त्यात कोणत्याही सुधारणा करण्याची आवश्यकता नसल्याने खर्च वाढत नाही.
  • चाचण्या आणि फायदे ः

  • या उपकरणाच्या चाचण्या घेण्यासाठी एकसारख्या वनस्पती आणि बिया अत्यंत काटेकोर तापमानामध्ये एक बॉक्स फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या. दोन दिवस (४८ तासांसाठी) त्यातील तापमान दर दहा मिनिटांनी नोंदविले जात होते. या कक्षांची तापमान नियंत्रित ठेवण्याची कार्यक्षमता दर दोन जैविक घटकांद्वारे मोजण्यात आली. पीचच्या फांदीवरील डोळा फुटण्याची प्रक्रिया विविध तापमानामध्ये कशी कार्यान्वित होते, हे तपासले. तसेच, सूर्यफुलांच्या बियांचे अंकुरण मोजण्यात आले. कारण, या दोन्ही विकास क्रिया तापमानावर आधारित आहेत. त्याचे तापमान घटले, तरी त्यांच्या विकासाचा वेग कमी होतो.
  • हे नवे तापमान नियंत्रण अत्यंत स्वस्त असून, यात कोणत्याही बदलांशिवाय नियमावली व आवश्यकतेनुसार वेगवेगळे तापमान ठेवता येते. त्यामुळे कृषी व फळबाग शास्त्रज्ञ, वन विभाग आणि शिक्षण, संशोधन संस्थांमध्ये विविध प्रयोगांसाठी वापरणे शक्य होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com