एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने साधली प्रगती

कर्नाटक राज्यातील मंगलोर जिल्ह्यातील महिला शेतकरी अनिता एम. यांनी एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती पद्धती, पशुपालन, विविध तंत्रज्ञानाचा अवलंब यातून आर्थिक शाश्वत उत्पन्न मिळवले आहे.
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने साधली प्रगती
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने साधली प्रगती

एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक धोक्याची शक्यता अधिक राहते. अशा वेळी कर्नाटक राज्यातील मंगलोर जिल्ह्यातील महिला शेतकरी अनिता एम. यांनी एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती पद्धती, पशुपालन, विविध तंत्रज्ञानाचा अवलंब यातून आर्थिक शाश्वत उत्पन्न मिळवले आहे. आज त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. बेट्टमपॅडी गावातील आदिवासी महिला अनिता एम. यांच्याकडे ४.५ एकर शेती आहे. त्यांच्याकडे नारळ, सुपारी, मिरी भात आणि भाजीपाला अशी काही पिके घेतली जातात. मात्र पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या पिकांतून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. रासायनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शेतीचा खर्चही वाढत चालला होता. अशा वेळी त्यांच्या मदतीला परिसरात कार्य करणारी ग्राम अभिवृद्धी ही स्वयंसेवी संस्था आणि दक्षिण कन्नडा येथील कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आले. त्यांनी या महिलेला सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धती शिकवल्या. पूर्वीपासून त्यांच्याकडे असलेल्या गाई, शेळीपालन, घरगुती कोंबडीपालन अशा पूरक व्यवसायाचाही सेंद्रिय शेतीसाठी फायदा झाला. थोड्याच काळात अनिता यांनी परिषदा, पुस्तके, वर्तमानपत्रे यातील व्याख्याने, लेखन यांच्या मदतीने सेंद्रिय शेतीची मूलतत्त्वे शिकून घेतली. कृषी विस्तारामध्ये मोलाचे योगदान ः आता अनिता स्वतः मंगलोर येथील SKDRDP या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्य झाल्या असून, सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी कार्य करत आहेत. केव्हिके आणि कृषी विभागामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्येही त्या संपर्क व्यक्ती म्हणून कार्य करतात. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे परिसरामधील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होत आहे. अशा सेंद्रिय शेती करणाऱ्या लहान मोठ्या सुमारे ८० शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आहे. या गटाला समृद्धी रायथा गंपू असे नाव दिले आहे. अनिता आता परीसरातील सुमारे ४०० शेतकऱ्यांना शेती व पूरक व्यवसायाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत १५ शेतकऱ्यांनी संपूर्ण सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला आहे. तर सहा शेतकरी शेळीपालन करत आहेत. विविध तंत्रज्ञानातून उत्पन्न दुप्पट शिक्षण कमी असले तरी अनिता यांनी पावसाचे पाणी गोळा करण्याचे तंत्र, यांत्रिकीकरण, मातीचे परिक्षण, चारा उत्पादन, शेळीपालन , डेअरी, परसबागेतील कोंबडीपालन (गिरिराजा आणि अन्य देशी जाती), पिकामध्ये आच्छादन, ठिबक सिंचनाचे तंत्र अशा शेतीपयोगी तंत्रज्ञान वापरत आहेत. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे अनिता यांच्या उत्पन्नही दुप्पट झाले आहे. त्यांचे गत वर्षातील उत्पन्नांचे तपशील ः पशुपालन - ३.०५ लाख रु. भाजीपाल्यातून मिळालेले उत्पन्न - २. ६० लाख रु. भात - ४५ हजार रु. गांडूळखत निर्मिती आणि विक्री - १ लाख रु. शेण गोवऱ्या व अन्य - ५० हजार रु. मिळालेले पुरस्कार अनिता यांना आजवर वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहे. २०११ मध्ये बेंगळूरू येथील राष्ट्रीय कृषी महोत्सवामध्ये ‘जिल्हा पातळीवरील महिला शेतकरी’ हा पुरस्कार, तर २०१२ मध्ये पुत्तूर येथील संस्क्रिथिका कला केंद्र, बोलावार यांच्याकडून ‘संक्रांती पुरस्कार’ मिळाला. २०१४-१५ चा मंगलोर येथील एएमएफ यांच्याकडून जिल्हापातळीवरील पशुपालक महिला हा पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये काद्री (मंगलोर) येथील फूल प्रदर्शनामध्ये ‘हॉर्टिकल्चर ॲवॉर्ड’ मिळाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com