agricultural stories in Marathi, Technowon, Drip Irrigation system for sugarcane drop | Agrowon

ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर

अरुण देशमुख
शुक्रवार, 26 मार्च 2021

ऊस पिकामध्ये प्रवाही पद्धतीने होणारा पाण्याचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती उपयुक्त ठरते. त्याद्वारे पाणी व्यवस्थापनाबरोबर रासायनिक खतांचा वापर करणेही तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. अलीकडे भूमिगत सिंचन पद्धतीही उसासाठी वापरली जात आहे.

उसासाठी योग्य ठिबक सिंचन

 • शक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ड्रीप वापरावी.
 • मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे.
 • दोन ड्रीपरमधील अंतर ४० सें.मी. व प्रवाह ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.
 • भूमिगत ठिबक सिंचनासाठी दाबनियंत्रित इनलाइन ड्रीप वापरावी. दोन ड्रीपरमधील अंतर ४० सें.मी., तर ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखालील आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर ठरते.

ठिबक सिंचन पद्धतीची निवड
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने म्हणजेच दरदिवशी अथवा एक दिवसाआड कमी प्रवाहाने, परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळांशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे आडवे प्रसरण होते आणि मुळांची वाढ चांगली खोलवर होते. त्यामुळे ऊस पिकाची जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करणे, दोन ठिबक नळ्यामधील योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे.
कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. (तक्ता १)

तक्ता १ ः
उसासाठी ठिबक सिंचन पद्धतीच्या निवडीसाठी मार्गदर्शक सूचना ः

जमिनीचा प्रकार शिफारशीत ठिबक सिंचन प्रणाली दोन ठिबक नळ्यातील अंतर (मी.) दोन ड्रीपरमधील अंतर (मी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)
उथळ कमी खोलीची जमीन पृष्ठभागावरील ठिबक १.३५ ०.३०
मध्यम खोलीची जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १.५० ०.४० १ / १.६ /२
जास्त खोलीची काळी जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १.८० ०.५० १.६ / २
चढ उताराची जमीन पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रीपर असणारी इनलाइन ठिबक १.५० ०.४० १ / १.६

तक्ता २
सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात प्रवाह मिळण्यासाठी ठिबक सिंचन नळ्यांची लांबी पुढील प्रमाणे ठेवावी.

ठिबक पद्धती दोन ड्रीपरमधील अंतर (सें.मी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर / तास) ठिबक नळीची लांबी (मी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर / तास) ठिबक नळीची लांबी (मी.)  ड्रीपरचा प्रवाह 
(लि.प्रति तास)  
 ठिबक नळीची लांबी 
(मी.) 
१६ मिमी. इनलाईन ड्रीप पद्धती    ५०   १   १३७   २   ८८   ३   ६८
   ४०    १   ११६   २   ७४   ३   ५७
   ३०   १   ९३   २   ५९   ३   ४६
१६ मिमी. दाब नियंत्रित इनलाइन ड्रीप पद्धती    ५०   १   १८७   १.६   १३७   २   ११९
   ४०   १   १५७   १.६   ११५   २   ९९
   ३०   १   १२४   १.६   ९१   २   ७८
१२ मिमी. इनलाइन ड्रीप पद्धती   ५०   १   ८४   १.९   ५४   २.८५   ४२
   ४०   १   ७१   १.९   ४५   २.८५   ३५ 
   ३०   १   ५६   १.९   ३६   २.८५   २८
१२ मिमी. दाब नियंत्रित इनलाइन ड्रीप पद्धती   ५०   १   ९६   १.६   ८८   २   ७६
   ४०   १   ८२   १.६   ७२   २   ६२ 
   ३०   १   ६५   १.६   ५६   २   ४८

प्रवाही पद्धतीच्या तुलनेमध्ये ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पुढील फायदे होतात.
१) वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व खतांचे योग्य नियंत्रण करता येते.
२) जमिनीमध्ये पिकाच्या मुळांपाशी अन्न, पाणी व हवा यांचे संतुलित प्रमाण ठेवणे शक्य होते.
३) उसाची उगवण लवकर म्हणजे २५ ते ३० दिवसांत, एकसारखी व जास्त प्रमाणात (७५ टक्क्यांपेक्षा जास्त) होते.
४) प्रचलित सरी – वरंबा पद्धतीच्या तुलनेमध्ये पाण्यात ४५ ते ५० टक्के बचत होते.
५) पाणी वापर कार्यक्षमता दुप्पट ते अडीच पटीने वाढते.
६) विद्राव्य खतांचा वापर थेट मुळांपाशी होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये खतांमध्ये ३० टक्के बचत होते.
७) तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन आंतरमशागत, खुरपणी किंवा तणनाशकांचा खर्च कमी होतो.
८) वीज खर्चात ३५ ते ४५ टक्के बचत होते.
९) पाणी व खते देण्यासाठी कमी मजूर लागतात.
१०) एकूणच ऊस उत्पादन खर्चात २० टक्क्यांपर्यंत बचत होते.
११) ऊस उत्पादनात ३० टक्के, तर साखर उताऱ्यात ०.५ युनिटने वाढ होते.
१२) जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहण्यास मदत होते.

जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती
(सबसरफेस ड्रीप)

उसासारख्या दीर्घायुषी पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील (भूमिगत) ठिबक सिंचन (सबसरफेस ड्रीप) योग्य ठरते. पाणी व खते थेट ऊस पिकाच्या मुळाजवळ दिली जात असल्याने कार्यक्षमता वाढते. ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात भरीव वाढ होते.

भूमिगत ठिबक सिंचन असे काम करते
पाण्याचा जमिनीतील प्रवाह हा मुख्यत्वे कॅपिलरी दाबामुळे नियंत्रित केला जातो. हा दाब सर्व दिशांना सारखा असतो. गुरुत्वाकर्षणाचा दाब हा स्थिर व खालच्या दिशेला असतो. जशी जमीन ओली होते तसा कॅपिलरी दाब कमी होत जातो. कोरड्या जमिनीत कॅपिलरीचा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापेक्षा जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सर्व दिशांना सारखा असतो. जेव्हा जमीन ओली होत जाते, तेव्हा जमिनीतील सर्व पोकळ्यांमध्ये पाणी भरल्याने कॅपिलरी दाब कमी होऊन गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढतो. पाण्याचा प्रवाह उताराच्या बाजूला सुरू होतो. अशा साध्या मूलतत्त्वामुळे हलके पाणी देऊन कॅपिलरी दाबाने त्यावर नियंत्रण ठेवता येते. पाण्याची कार्यक्षमता वाढवता येते.

या पद्धतीचे फायदे

 • बाष्पीभवन, वाहून जाणे, जमिनीत खोलवर पाण्याचा निचरा होणे थांबत असल्याने अन्य कोणत्याही सिंचन पद्धतीपेक्षा अधिक पाणी वापर कार्यक्षमता मिळते.
 • तुलना ः सरी – वरंबा पद्धतीच्या ५० ते ५५ टक्के, तर पृष्ठभागावरील ठिबक सिंचनाच्या तुलनेत १० ते १५ टक्के पाणी बचत होते.
 • ऊस उत्पादनात किमान ३५ टक्के वाढ होते.
 • अतिरिक्त पाणी पिकात साचत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो.
 • रासायनिक खते थेट मुळांभोवती मिळतात. कार्यक्षमता वाढून खतमात्रेत ३० टक्के बचत.
 • जमिनीवरील पृष्ठभाग कोरडा राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. आंतरमशागतीची व तोडणीची कामे वेळेवर करणे सोपे जाते.
 • या पद्धतीत इनलाइन ठिबक नळ्या आणि ड्रीपर मजबूत अशा पॉलीमरपासून बनवलेल्या असतात. तसेच त्या जमिनीखाली असल्याने सूर्याची अतिनील किरणे, वातावरणातील चढ- उतार आणि जमिनीतील इतर उपद्रवी घटकांपासून सुरक्षित राहतात. पर्यायाने देखभालीचा खर्च कमी होतो. आयुर्मानही जास्त असते.
 • ड्रीपनेट पीसी या ड्रीपलाइनचा वापर केल्याने ड्रीपर बंद होत नाहीत, चढ-उताराच्या शेतातही सम प्रमाणात पाणी देणे शक्य होते.
 • उसाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जास्त खोडवे घेणे शक्य होते.
 • ही यंत्रणा जमिनीखाली असल्याने लॅटरलचा अडथळा न होता ऊस लागवड, आंतरमशागत व ऊस तोडणी यांत्रिक पद्धतीने करणे शक्य होते.

भूमिगत पद्धतीसाठी ड्रीपलाइनची निवड करताना...

 • या ऊस लागवड जोड ओळ पद्धतीने केली जाते. दोन नळ्यांतील अंतर १.८० मी. तर उसाच्या दोन ओळींतील अंतर ४० ते ५० सें.मी. ठेवले जाते.
 • चढ-उताराच्या जमिनीत दाब नियंत्रित तोट्या असलेली ड्रीपलाइन वापरावी.
 • एकदम सपाट जमिनीमध्ये १६ मि.मी. व्यासाची ०.८ मि.मी. अथवा ०.५ मि.मी. जाडी असलेली ड्रीपलाइन वापरावी.
 • जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपरमधील अंतर व त्याचा प्रवाह बदलतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे शिफारस करण्यात येते. (तक्ता ३)

तक्ता ३

जमिनीचा प्रकार ड्रीपरमधील अंतर (सें मी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर / तास)
खोल काळी जमीन ५० १ किंवा १.६ किंवा २
मध्यम खोलीची जमीन ४० १.६ किंवा २
उथळ जमीन ३०

देखभाल

 • महिन्यातून एकदा न चुकता पहिल्यांदा सबमेव व नंतर ड्रीपलाइन फ्लश कराव्यात. त्यात साठलेली घाण निघून जाईल.
 • पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी.
 • उसाच्या मुळ्या ठिबक लाइनमध्ये घुसू नयेत म्हणून तणनाशकांची प्रक्रिया शिफारशीप्रमाणे करावी.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(प्रमुख, कृषी विद्या विभाग आणि सहसरव्यवस्थापक, ऊस विकास आणि प्रकल्प, नेटाफिम इरिगेशन (इं) लि., पुणे)
 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...