agricultural stories in Marathi, technowon, energy from human waste | Agrowon

मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे तंत्र

डॉ. दीपक जाधव, अश्विनी चेंडके
सोमवार, 27 मे 2019

बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल किंवा बायो-इलेक्ट्रोकेमिकल सेप्टिक टँक सिस्‍टिम तंत्रज्ञान आहे. ही यंत्रणा शौचालय व्यवस्थापन आणि घरगुती किंवा सामूहिक तत्त्वावर वीजनिर्मितीसाठी वापरली जाऊ शकते.

बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल किंवा बायो-इलेक्ट्रोकेमिकल सेप्टिक टँक सिस्‍टिम तंत्रज्ञान आहे. ही यंत्रणा शौचालय व्यवस्थापन आणि घरगुती किंवा सामूहिक तत्त्वावर वीजनिर्मितीसाठी वापरली जाऊ शकते.

ग्रामीण भागामध्ये पीट, बोर होल लेट्रिन, डग विथ लेट्रिन, शोष खड्डा, कंपोस्टिंग टॉयलेट याचबरोबरीने पारंपरिक सेप्टिक टँक (सीएसटी)  अशा पारंपरिक स्वच्छता पद्धतींचा अवलंब केला जातो. सेप्टिक टँकद्वारे केवळ ३० ते ४० टक्के सेंद्रिय पदार्थ सीवेजमधून अनएरोबिक प्रक्रिया होऊ शकते.उच्च प्रक्रिया क्षमता प्राप्त करण्यासाठी, पारंपरिक सेप्टिक टँक सिस्‍टिममध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ति मलमूत्रात सुमारे ५० ते ७० ग्रॅम सीओडी असतो. मल मिश्रित सांडपाण्यात ऊर्जा मूल्य अंदाजे १४.७ किलोज्यूल/ग्रॅम सीओडी असते. हे पाणी किंवा मलमूत्रात प्रतिवर्ष ४.५ किलो नायट्रोजन आणि ०.५५ किलो स्फुरद इतके पोषक मूल्य असते. या मलमूत्राची ऊर्जेमध्ये कमी क्षमतेचा बल्ब चालू शकतो.

बायोइलेक्ट्रिक शौचालयाचे घटक ः

 शौचालय केबिन आणि उपकरणे  सौर पॅनेल सिस्‍टिम  मायक्रोबियल फ्यूल सेल बायोरेक्टर  इलेक्ट्रोड सामग्री आणि विद्युत सर्किट  इंधन सेल उपकरणे

बायोइलेक्ट्रिक शौचालयाची कार्यप्रणाली ः

बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल (एमएफसी) किंवा बायो-इलेक्ट्रोकेमिकल सेप्टिक टँक सिस्‍टिम तंत्रज्ञान (बीईटी-एमएफसी) आहे. या प्रक्रियेदरम्यान मलमूत्रातील जैविक पदार्थांचा स्रोत म्हणून वापर करता येतो.बायोइलेक्ट्रिक-एमएफसी मानवी मलमूत्रात असलेल्या जैविक पदार्थांचे ऑक्सिडाईज करण्यासाठी सक्षम आहे. या यंत्रणेतून शौचालय व्यवस्थापन आणि घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती शक्य आहे. बायोइलेक्ट्रिक-मिक्रोबिअल इंधन सेल मानवी अपशिष्ट प्रभावीपणे हाताळण्यास सक्षम असतो. निर्माण झालेल्या ऊर्जेतून एलइडी बल्ब आणि लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवता येतात.

फायदे  

  • मानवी मलमूत्राचा पुरेपूर वापरामुळे स्वच्छता शक्य.
  • मायक्रोबिअल इंधन सेल (एमएफसी) मध्ये मानवी मलमूत्रापासून विद्युतनिर्मिती शक्य असून, त्याद्वारे विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करता येतात.
  • प्रक्रियेनंतरच्या मैला व पाण्याचा शेतीसाठी खत म्हणून वापर शक्य.
  • जैव-शौचालयांच्या तुलनेत उच्च कार्यक्षमता.
  • प्रदूषण विरहीत यंत्रणा, कमी पाण्याचा वापर.

  : डॉ. दीपक जाधव, ८२०८१७९१८६
(डॉ. दीपक जाधव हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद आणि अश्विनी चेंडके या शिवशंकर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, मिरजगाव, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)


इतर टेक्नोवन
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रेटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे...