agricultural stories in Marathi, Technowon, Farmers help create ‘Virtual safe space’ to save bumblebees | Agrowon

परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी सुरक्षित अवकाश’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 सप्टेंबर 2021

खऱ्या अर्थाने परागवाहक असलेल्या बंबल बी या माश्यांच्या सुरक्षिततेसाठी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी आणि शेती व्यवस्थापकांच्या साह्याने आभासी सुरक्षित अवकाश (व्हर्च्युअल सेफ स्पेस) हे साधन विकसित केले आहे.

परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर आपल्याला एखादे शेत किंवा बाग याचे चित्र डोळ्यासमोर येईल. मात्र खऱ्या अर्थाने परागवाहक असलेल्या बंबल बी या माश्यांच्या सुरक्षिततेसाठी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी आणि शेती व्यवस्थापकांच्या साह्याने आभासी सुरक्षित अवकाश (व्हर्च्युअल सेफ स्पेस) हे साधन विकसित केले आहे.

आजूबाजूला असलेल्या परिस्थितीनुसार एखाद्या ठिकाणाची मधमाश्यांच्या दृष्टीने उपयुक्तता बदलू शकते. एखाद्या ठिकाणी भरपूर फुले असूनही मधमाश्या किंवा बंबल बी येत नसल्याचे दिसून येते. मधमाश्यांच्या वसाहतींनी तग धरणे, त्यांची वाढ होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. अशा वेळी अशा व्यक्ती आणि संस्थांना मदत होईल, अशा प्रकारची आधुनिक साधने विकसित करण्याचा प्रयत्न इंग्लंड येथील एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

त्यांनी एखाद्या जागेवर बंबल बीच्या वसाहती कशा प्रकारे सुरक्षित राहतील, या दृष्टीने योग्य ते निर्णय घेण्यास मदत करणारे ‘बी स्टेवॉर्ड’ हे साधन तयार केले आहे. या साधनाद्वारे संगणकीय सिम्युलेशन द्वारे बंबल बी च्या तग धरण्याच्या स्थितीचा अंदाज घेता येतो. या साधनाचा वापर संशोधक, शेतकरी, धोरणकर्ते वेगवेगळ्या जमिनीच्या मधमाशी उपयुक्ततेच्या दृष्टीने तपासणीसाठी करू शकतात.

त्याविषयी माहिती देताना एक्स्टर विद्यापीठाच्या पर्यावरण आणि शाश्‍वतता संस्थेचे डॉ. ग्रेस ट्विस्टन- डेव्हिस यांनी सांगितले, की मधमाश्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. त्याचा फटका पिकांना आणि जंगली फुलांनाही बसणार आहे. ‘बी स्टेवॉर्ड’ हे ऑनलाइन साधन सर्वांसाठी मोफत असून, त्यातून बंबलबीवर परिणाम करणाऱ्या विविध गुंतागुंतीच्या घटकांचा एकाच वेळी विचार करणे शक्य होते. त्यातून मधमाश्यांना उपयुक्त ठरणाऱ्या व्यवस्थापन पद्धतींचा पर्याय निवडणे शक्य होते. या संशोधनपूरक सॉफ्टवेअरची माहिती ‘मेथड्स इन इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युएशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जमिनीच्या वेगवेगळ्या घटकांसाठी तपासणी करण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्या ऐवजी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी बीहॅव (मधमाश्यांसाठी) आणि बंबल बीहॅव (बंबल मधमाश्यांसाठी) अशी दोन संगणकीय प्रारूप तयार केले आहेत. त्याचा वापर करून सामान्य माणसेही जमिनी, शेते किंवा जंगले यांची परागवाहकांच्या योग्य अयोग्यतेची चाचणी घेऊ शकतात.

सध्या बंबल बी संवर्धन ट्रस्ट कडून ‘बी स्टेवॉर्ड’चा वापर कॉर्नवेल येथील बंबल बी आणि शेती व्यवसायाच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी करत आहे. त्यांनी आजवर १५०० हेक्टर क्षेत्राचे परीक्षण केले आहे. या क्षेत्रामध्ये इंग्लंडमधील बंबल बी प्रजातींची वाढ, वर्तन आणि तग धरण्याचा विचार केला गेला. ‘बी हॅव’ प्रारूपांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गटाच्या प्रमुख प्रो. ज्युलिएट ओसबोर्न यांना २०१७ या वर्षाचा बीबीएसआरसी सोशल इनोव्हेटर हा पुरस्कार मिळाला आहे.

 


इतर टेक्नोवन
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक...
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली...जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...