agricultural stories in Marathi, Technowon, fogging technology for crop enviornment | Page 2 ||| Agrowon

वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा वापर

कोमल गाडेकर
बुधवार, 11 ऑगस्ट 2021

तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून, त्याचा फटका पिकांनाही बसत आहे. अशा वेळी आधुनिक बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेतीमध्ये तापमान व आर्द्रता असे दोन्ही वातावरणीय घटक नियंत्रित ठेवण्यासाठी धुके तयार करणारी यंत्रणा (फॉगिंग) वापरली जाते. त्याविषयी अधिक माहिती घेऊ.

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता यांचे संतुलित प्रमाण ठेवण्याची आवश्यकता असते. ही बाब पारंपरिक शेतीमध्ये नियंत्रित करणे अवघड असते. तुलनेने नियंत्रित शेतीमध्ये विशेषतः बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त प्रकारच्या हरितगृहामध्ये आधुनिक पद्धतीने वातावरणातील विविध घटकांचे नियोजन करता येते. यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीसोबतच दर्जाही सुधारतो.

समशीतोष्ण वातावरणात संपूर्ण बंदिस्त हरितगृहात तापमान कमी करण्याच्या उद्देशाने फॅन-पॅड प्रणालीचा वापर केला जातो. मात्र अर्धबंदिस्त किंवा शेडनेटमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी जमिनीवर पाणी मारणे, पानांवर पाण्याची फवारणी करणे किंवा जमिनीवर मुळालगत पाण्याचे तुषार उडवणे (मिस्टिंग) या पद्धतींचा वापर केला जातो. यातून थंडावा निर्माण होत असला, तरी यातून अनेक वेळा अधिक पाणी होऊन पिकाभोवतीची आर्द्रता प्रमाणापेक्षा अधिक वाढण्याचा धोका असतो. अधिक आर्द्रतेमुळे रोगांच्या प्रसाराचा धोका वाढतो. अपेक्षेइतके आर्द्रता तर पिकांसाठी मिळाली पाहिजे, त्यासाठी सामान्यतः पाण्याचे अत्यंत लहान कण किंवा धुके उपयुक्त ठरू शकते.

धुके तयार करण्याची पद्धत ः
उच्च दाबाखाली (सुमारे ७०० ते १००० पीएसआय) हवा आणि पाण्याचे सूक्ष्म थेंब (२० ते ४० मायक्रॉन) यांच्या साह्याने धुके तयार केले जाते. यामुळे वातावरणात आर्द्रतेची पातळी राखण्यास मदत करते. पिकांची पाने, मुळांचा भाग ओलसर ठेवण्यास मदत करते.

धुके कधी व कोणत्या स्थितीत तयार करतात?
विशेषतः वातावरण कोरडे असताना, हवेतील आर्द्रता कमी असताना आणि तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना धुके तयार करण्याची यंत्रणा वापरली जाते. विशेषतः उन्हाळ्यात पिकांचे वाढलेले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो.
हरितगृहामध्ये साधारणतः दिवसा ६० ते ७० टक्के व रात्री ७० ते ८० टक्के आर्द्रता नियंत्रित ठेवणे शक्य होते. अशा पोषक वातावरणात वनस्पतींची वाढ चांगली होते.

या पिकांसाठी फायदेशीर ः
धुके तयार करण्याची पद्धत साधारणतः भाजीपाला (उदा. टोमॅटो, काकडी आणि मिरची इ.), फुलपिके (उदा. जरबेरा, कार्नेशन इ.), परदेशी जातींची फुले किंवा शोभीवंत वनस्पती, रोपवाटिकांमध्ये वापरली जाते.

या पिकांसाठी वापरू नये
धुके तयार करण्याची पद्धत काही भाजीपाला पिकासाठी वापरली जात नाही. विशेषतः ज्या भाजीपाला पिकांत पानांची संख्या जास्त असून, दाटी असते, तिथे पाण्याचे दव किंवा ओलसरपणा जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.

अधिक धुक्यामुळे पसरणारे रोग ः
भाजीपाला पिकांवर जास्त प्रमाणावर धुक्यामुळे रोग पसरतात. उदा. पालकामध्ये ओलसरपणा जास्त काळ टिकून राहतो. फुलांवर धुके किंवा ओलसरपणा अधिक काळ राहिल्यास ते सडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. त्यासाठी बॉट्रायटिस, ग्रे-मोल्ड व बुरशीजन्य कारणीभूत ठरू शकते.

धुके तयार करण्याच्या पद्धतीचे आरेखन कसे करतात?
धुके तयार करण्याची पद्धतीचा आराखडा (layout), आरेखन (design) व कार्य (operation) हे अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. केवळ एक मिनिटांसाठी धुके तयार करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हरितगृहातील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करता येते. अर्थात, फॉगिंग प्रणालीचे आरेखन हे पूर्णतः नोझलच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकते.

साधारणतः दोन प्रकारचे नोझल वापरले जातात.
१) एकमेकांत घट्ट अडकून राहणारे नोझल
२) गोल फवारा देणारे नोझल
नोझलच्या बारीक छिद्रातून उच्च दाबाखाली पाणी जात असताना त्याचा वेग वाढतो. अंतर्गत पातळीवरील विशिष्ट रचनेमुळे पाणी बाहेर अत्यंत सूक्ष्म कणांच्या स्वरूपात फेकले जाते. थेंबाचा आकार हा २० ते ४० मायक्रॉन इतका असतो. लहान कणांमुळे धुक्यासारख्या वातावरण तयार होते. अशा नोझलपासून एक ते तीन मीटर अंतरावर हात धरल्यास पाण्याचे थेंब न जाणवता हात ओलसर होतो. पाण्याच्या कणांचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्यातील बहुतांश कणांचे बाष्पीभवनही हवेतच व वेगाने होते. त्यामुळे पिकांवर ओलावा अधिक काळ टिकत नाही. ओलाव्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

लक्षात ठेवावयाच्या तांत्रिक बाबी :
१) आरेखन करताना धुके तयार करणारे नोझलचा फवारा किती व्यासाचा पडतो, यानुसार एकमेकांना अत्यंत १५ ते २० टक्के इतके ओव्हरलॅपिंग होईल अशा प्रकारे नियोजन करावे.
२) दोन लॅटरलच्या ओळी व दोन नोझल यामधील अंतर समप्रमाणात असावे. उदा. नोझलची जोडणी ३ मी. × ३ मी. अंतरावर करता येईल.
३) फॉगिंग यंत्रणा नेमकी किती काळ चालवायची, याचा कालावधी हरितगृहातील तापमान व आर्द्रता यावरून निश्‍चित करावा.
४) पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर नोझलमधून पाण्याचे थेंब गळत राहू नयेत, यासाठी अँटी ड्रीप प्रकारचे नोझल वापरावेत.
५) हरितगृहातील तापमान कमी होण्यासाठी धुके वापरण्याच्या पद्धतीसोबत वायुविजन प्रणाली प्रभावी असणे आवश्यक आहे. अन्यथा, केवळ आर्द्रता वाढून पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता असते.
६) फॉगिंग प्रणाली व्यवस्थित चालण्यासाठी १२०-१४० मेशची जाळी असलेली गाळण यंत्रणा वापरावी.
७) फॉगिंगसाठी जड किंवा अधिक क्षार असलेले पाणी वापरू नये. यामुळे नोझलच्या छिद्रात क्षाराचे थर साचून ते अंशतः किंवा पूर्णपणे बंद पडू शकतात. तसेच क्षाराचे थर पिकांच्या पानावर साचून त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

कोमल गाडेकर, ९६०४७४३५९४
(सहायक प्राध्यापक -सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)
 


इतर टेक्नोवन
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...