agricultural stories in Marathi, technowon, Garlic storage low cost bamboo technique | Page 2 ||| Agrowon

लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण संरचना विकसित

वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक महत्त्वाचे आहे. साठवणीसाठी अंता (बारान) येथील कृषी विज्ञान केंद्राने कमी खर्चाची सच्छिद्र बांबू छत असलेली संरचना तयार केली आहे. याची किंमत १ लाख रुपये इतकी आहे. पारंपरिक साठवणीच्या तुलनेमध्ये या संरचनेमुळे लसणांची साठवणीतील कुज ३ टक्क्यांपर्यंत कमी होते, तसेच वजनातील घटही चार टक्क्यापर्यंत कमी होते.

राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक महत्त्वाचे आहे. साठवणीसाठी अंता (बारान) येथील कृषी विज्ञान केंद्राने कमी खर्चाची सच्छिद्र बांबू छत असलेली संरचना तयार केली आहे. याची किंमत १ लाख रुपये इतकी आहे. पारंपरिक साठवणीच्या तुलनेमध्ये या संरचनेमुळे लसणांची साठवणीतील कुज ३ टक्क्यांपर्यंत कमी होते, तसेच वजनातील घटही चार टक्क्यापर्यंत कमी होते.

राजस्थानमध्ये लसूण हे पीक बारान, झालावार, कोटा, बुंदी (हरोती प्रांत), चित्तोरगढ, जोधपूर आणि प्रतापगढ जिल्ह्यांतील सिंचित प्रदेशामध्ये घेतले जाते. हरोती प्रांतामध्ये लसूण पिकाखालील भाग ९० टक्क्यांपर्यंत आहे. २०१८-१९ या वर्षामध्ये राजस्थानमध्ये १.३२ लाख हेक्टर इतके लसणाचे क्षेत्र असून, सरासरी उत्पादकता ५.४ टन प्रतिहेक्टर आहे. त्यामुळे ७.१८ लाख मे. टन इतके उत्पादन अपेक्षित आहे.

गेल्या दोन दशकापासून या विभागामध्ये सोयाबीन आणि लसूण अशी पीक पद्धती आहे. येथून आखाती देशांमध्ये लसणाची निर्यातही होते. तिथे लसणाचा वापर प्रामुख्याने मसाल्याच्या पदार्थांसोबतच, मांस, तयार अन्न पदार्थ, चिप्स आणि पापड यामध्ये होतो. अलीकडे लसणाची पेस्ट, पावडर, पाकळ्या, लसणांच्या गोळ्या अशा स्वरूपाच्या उत्पादनांनाही मागणी वाढत आहे.

लसणाच्या साठवणीसाठी बांबूंची कमी खर्चाची संरचना ः
लसणांच्या साठवण ही तिच्या पातीसह केली जात असल्याने अधिक जागा लागते. या प्रदेशातील शेतकऱ्यांना लसणांचे कंद साठवताना कुजणे, खराब होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच काढणीच्या हंगामामध्ये बाजारातील दर कमी असतात. त्यामुळे लसूण काढणीनंतर त्वरित विकण्यामुळे दर कमी मिळून फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होते. साठवणीमध्ये सामान्य तापमानामध्ये लसणांचे वजन ४३ ते ५० टक्क्यांपर्यंत घटू शकते. बारान जिल्ह्यामध्ये लसणांची सामान्य स्थितीमध्ये साठवण केल्यास सरासरी ३४.५ टक्के नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.

या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आरकेव्हीवाय यांच्या आर्थिक साह्याने लसूण सुधारणा केंद्र प्रकल्प राबविण्यात येतो. त्याअंतर्गत अंता (बारान) येथील कृषी विज्ञान केंद्राने कमी खर्चाची सच्छिद्र बांबू छत असलेली संरचना तयार केली आहे. याची किंमत १ लाख रुपये इतकी आहे.
बांबूच्या काठ्यांपासून तयार केलेल्या संरचनेमध्ये तळाची बाजूने सिमेंटच्या साह्याने गुळगुळीत करून घ्यावी. याचे आकारमान १५ फूट रुंदी बाय ३० फूट लांबी आणि १२ फूट उंची असे ठेवले जाते. यात सुमारे १० टन लसूण साठवणे शक्य होते.
४ मार्च २०१७ मध्ये राजस्थानच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. स्थानिक लसूण उत्पादकांना लसूण साठवणीसाठी व उत्तम पर्याय उपलब्ध झाला. हे साठवणगृह लसूण कंद बियाणे साठवणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांकडे वापरले जाते. त्यासाठी प्रती ४० किलो वजनाच्या पिशवीसाठी ५० रुपये इतके किमान भाडे ठेवले आहे. यातून सहा महिन्यामध्ये २० रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे.

साठवणीतील लसूण ढिगाचे प्रमाणीकरण ः
साठवणगृहामध्ये लसणांचे संपूर्ण पीक साठवणे शक्य आहे. त्याचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी सातत्याने हवा खेळती राहणे आवश्यक आहे. साठवणीच्या प्रक्रियेमध्ये लसणांच्या ढिगाचा आकार अत्यंत महत्त्वाचा असतो. लसणाचे साठवण ढीग हे ३ फूट उंचीपर्यंतच असावेत. यामुळे ढिगातील कुजीचे प्रमाण कमी (३.४ टक्के) होते. तर कंदाच्या वजनातील घटही कमी (४.०४ टक्के) होते. शेतकऱ्यांच्या साठवण प्रक्रियेमध्ये वजनातील घट सुमारे २२.२४ टक्के इतकी मोठी आहे.

या संरचनेत लसणाच्या ढिगाच्या उंचीचे कंद कुज आणि वजनावर साठवणीदरम्यान होणारे परिणाम

लसणाच्या ढिगाची उंची (फूट) कंद कुज (टक्के) पूर्ण पातीसह एकूण वजन (ग्रॅम) साठवणीनंतर २०० दिवसांनी एकूण वजन (ग्रॅम) वजनातील घट (टक्के)
शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत
७-८
३४.५ ३३.४५ २६.०१ २२.२४
७.२ ३६.३४ ३१.२१ १४.१२
५.३ ३८.२१ ३५.७६ ६.४१
३.४ ४१.५७ ३९.८९ ४.०४

तंत्राचे फायदे -
अन्ता (बारान) येथील केव्हीके कमी खर्चाच्या साठवण संरचनेमुळे परिसरातील २५ शेतकऱ्यांना फायदा झाला. या शेतकऱ्यांनी ही संरचना तयार करण्याचे कौशल्य प्रशिक्षणाअंती मिळवले आहे. यांनी मादना खेरी या गावाने परिसरातील लसूण साठवण गाव म्हणून परिसरामध्ये ओळख मिळवली आहे. या तंत्रामुळे कमी खर्चामध्ये लसणांचे साठवण दीर्घ काळापर्यंत करता येत असल्याने दरातील चढउतारावर काही प्रमाणात मात करणे शेतकऱ्यांना शक्य होते.


इतर टेक्नोवन
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख...जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर...
धान्य, हळद साठवणुकीसाठी हर्मेटिक...हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद...
काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मितीजिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा...
भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक...देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत...
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप' आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी...
शेवाळापासून पर्यावरणपूरक दिवे...फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी...
कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून...शहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये...
तणनियंत्रणासाठी घरगुती साधनांतून तयार...वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा...मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने...
पारंपरिक पदार्थांसाठी वातावरणरहित तळण...भारतीय लोकांना तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात...
बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीरडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्रसाखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक,...
पारंपरिक साठवण पद्धतीला नव्या...पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
कढीपत्ता भुकटी निर्मितीकढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर...