जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’

अलीकडे माणसांच्या कमतरतेमुळे जनावरे मुक्त सोडणे व त्यांची देखभाल करणे ही पद्धत कमी होत चालली आहे. यावर जनावरांना लावल्या जाणाऱ्या टॅगमध्ये अत्याधुनिक ब्लूटूथ ५ या तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने नवी उत्पादने आणली आहेत.
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’

पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील डोंगरावर चरण्यासाठी सोडली जात. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पशुपालकाला वेळ काढावा लागे किंवा एखाद्या राखोळ्याची नेमणूक करावी लागे. परदेशामध्ये जनावरांसाठी मोठमोठी चराऊ कुरणे असतात. त्यामुळे दुधाळ आणि मांसासाठी अशा दोन्ही प्रकारच्या जनावरांना मुक्तपणे सोडले जाते. मात्र अलीकडे माणसांच्या कमतरतेमुळे जनावरे मुक्त सोडणे व त्यांची देखभाल करणे ही पद्धत कमी होत चालली आहे. यावर जनावरांना लावल्या जाणाऱ्या टॅगमध्ये अत्याधुनिक ब्लूटूथ ५ या तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने नवी उत्पादने आणली आहेत. चराऊ कुरणामध्ये मुक्त पद्धतीने दुधाळ जनावरांचे पालन केले जाते. यामुळे जनावरांच्या आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादनात वाढ होते. मात्र परदेशामध्ये मोठ्या क्षेत्रावर पसरलेल्या कुरणामध्ये मुक्त जनावरांवर लक्ष ठेवणे अत्यंत अडचणीचे ठरते. अशा वेळी जनावरांच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अमेरिकेतील हर्डडॉग या कंपनीने ‘ब्लूटूथ ५’ तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट टॅग तयार केले आहेत. हे टॅग जनावरांच्या कानामध्ये नेहमीच्या टॅगप्रमाणे लावता येतात. या टॅगमध्ये सेन्सर बसवले असून, त्याची रेंज साधारणपणे ३०० फूट अंतर इतकी आहे. या टॅगमुळे जनावरांवर मोबाईल अथवा संगणक यांच्या साह्याने लक्ष ठेवता येते. या टॅगद्वारे जनावराचे ठिकाण, आरोग्यसंबंधित माहिती आणि ते सध्या असलेल्या आसपासच्या परिसराविषयी माहिती उत्पादकापर्यंत पोहोचवली जाते. यामुळे दूरवर गेलेल्या किंवा चुकलेल्या जनावरांना शोधणे व परत आणणे अधिक सोयीचे होते. स्मार्ट टॅग ः

  •  ‘ब्लूटूथ ५’ या तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रेस टॅग आणि वेलफेअर टॅग असे दोन टॅग विकसित केले आहेत.
  •  जनावर चरत असलेल्या स्थानाची माहिती ट्रेस टॅगद्वारे उत्पादकांना समजते. या टॅगमध्ये ही माहिती किमान पाच वर्षांपर्यंत जतन करून ठेवणे शक्य जाते.
  •  वेलफेअर टॅगद्वारे जनावराची जैविक ओळख आणि आरोग्यविषयक माहिती सातत्याने जाते. ही माहिती किमान २ वर्षांपर्यंत जतन करून ठेवता येते.
  •  हे टॅग वजनाला अत्यंत हलके आहे.
  •  टॅगवर असलेल्या एलईडी कोणत्याही अँड्रॉइड फोनवरून चालू करता येतात.
  • टॅगरिडर ः टॅगवरील माहिती वाचण्यासाठी हर्डडॉग कंपनीने ‘टॅग रीडर’ची निर्मिती केली असून, त्याला ‘डॉगबोन’ असे नाव दिले आहे. या रिडरमुळे किमान ३०० फुटांवरूनही जनावराची सारी माहिती उत्पादकांना मिळू शकते. सेन्सरद्वारे ही माहिती हर्डडॉग कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर पाठविली जाते. ही माहिती पशुपालक कधीही आपल्या मोबाईल किंवा संगणकावर पाहू शकतो. या जमा झालेल्या नोंदी दीर्घकाळपर्यंत साठवणे शक्य आहेत. त्यावरून आपल्या कळपाचे विश्‍लेषणही करण्याची सोय कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. मूल्य ः

  • ट्रेस टॅगचे सुरुवातीचे किट ११९९ डॉलरमध्ये येते. त्यात २५ ट्रेस टॅग, एक डॉगबोन आणि कंपनीच्या संकेतस्थळावरील जनावरे शोधण्याचे व्यासपीठाचे (ॲनिमल ट्रेसेबिलिटी प्लॅटफॉर्म) एक वर्षाचे भाडे यांचा समावेश असतो.
  • वेलफेअर टॅग किटची किंमत १३९९ डॉलर इतकी असून, त्यात २५ वेलफेअर टॅग, एक डॉगबोन आणि कंपनीच्या संकेतस्थळावरील जनावरे शोधण्याचे व्यासपीठाचे (ॲनिमल ट्रेसेबिलिटी प्लॅटफॉर्म) एक वर्षाचे भाडे यांचा समावेश असतो.
  • फायदे ः

  •  डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्येही हे स्मार्ट टॅग उत्तमरीत्या काम करतात. एखाद्या ड्रोनवर टॅगरिडर लावल्यास दुर्गम भागांपर्यंतही जनावरांवर लक्ष ठेवता येते. पशुपालकाला जनावरांच्या कळपामागे जाण्याची गरज लागत नाही.
  •  हर्डडॉग कंपनीच्या सर्व्हरमध्ये जनावरांच्या टॅगमधील सर्व माहिती स्वयंचलितरित्या संकलित केली जाते. आवश्यकतेनुसार त्याचे विश्‍लेषण करून पशुपालकांना पुरवली जाते. यामुळे पशुपालक व्यवस्थापनामध्ये योग्य त्या सुधारणा करू शकतात.
  •  ही जमा केलेली सर्व माहितीचा उपयोग जनावरांच्या विक्रीप्रसंगी होतो. जनावरांच्या सर्व सवयी, व्यवहार याविषयी संपूर्ण माहिती खरेदी करणाऱ्यांस देता येतो. यामुळे विश्वासार्हता वाढून जनावरांना योग्य मूल्य मिळणे शक्य होते. यातून गुणवत्तापूर्ण व योग्य वंशावळीची जनावरे खरेदी करणे सोपे झाले आहे. यामुळे सर्वसामान्यपणे अशा व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळणेही शक्य होते.
  • जनावरांचे कळप कोठेही असले तरी त्यांची माहिती गोळा करून उत्पादकाला जेव्हा गरज असेल तेव्हा ती पुरविली जावी. हेच आमचे सुरवातीपासूनचे उद्दिष्ट आहे. - मेलिसा ब्रान्डो (‘हर्डडॉग’च्या संस्थापिका)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com