हवेतील त्रिमितीय प्रतिमेशी बोलणेही शक्य

हवेसोबत हलू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रतिमा तयार करण्यामध्ये ब्रिघम यंग विद्यापीठातील होलोग्राम तज्ज्ञांना यश आले आहे. लेसर किरणांच्या साह्याने तयार केलेल्या या प्रतिमेशी बोलणेही शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर सायंटिफिक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
हवेतील त्रिमितीय प्रतिमेशी बोलणेही शक्य
हवेतील त्रिमितीय प्रतिमेशी बोलणेही शक्य

हवेसोबत हलू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रतिमा तयार करण्यामध्ये ब्रिघम यंग विद्यापीठातील होलोग्राम तज्ज्ञांना यश आले आहे. लेसर किरणांच्या साह्याने तयार केलेल्या या प्रतिमेशी बोलणेही शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर सायंटिफिक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. स्टारट्रेक सारख्या सायन्स फिक्शन सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे लेसर किरणांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. लाल किंवा हिरव्या रंगामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती सदृश व्यक्ती अचानक आपल्यासमोर बोलताना दाखवलेली असते. सिनेमामध्ये ते केवळ संगणकीय करामतीद्वारे केलेले असतो. मात्र आता वास्तवातही एका जागेवरील व्यक्तीच्या प्रतिमा त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी तयार करणे शक्य होणार आहे. कोणत्याही अन्य साधनांशिवाय साध्या डोळ्यांनी त्या पाहता येतील. ब्रिघम यंग विद्यापीठातील विद्यूत अभियांत्रिकीचे प्रो. डॅनिअल स्मॉली आणि सहकाऱ्यांनी तीन वर्षापूर्वी कोणत्याही पडद्याशिवाय (स्क्रीन) उपलब्ध अवकाशामध्ये तरंगत्या चित्रांची प्रतिमा उभी करण्याचे तंत्र विकसित केले. या तंत्राला ऑप्टिकल ट्रॅप डिस्प्ले असे म्हणतात. त्यात हवेतील कणांना लेसर किरणांच्या साह्याने पकडून ते सारे कण एकत्र आणले जाते. त्यातून संगणकावर उमटलेली कोणतीही प्रतिमा त्याच वेळी हवेमध्ये तरंगत्या स्वरूपामध्ये तयार केली जाते. हे काहीसे थ्री डी प्रिंटिंग तंत्राप्रमाणे (पण केवळ प्रकाशकणांसाठी) आहे. यातून प्रत्यक्ष त्याच वेळेवर एकमेकाशी समोरासमोर बोलणेही शक्य होणार आहे. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा बनवणे शक्य आहे. पातळ हवेमध्ये साध्या अॅनिमेशन तयार करण्याचे तंत्र अधिक प्रगत करण्याच्या या संशोधन प्रकल्पासाठी राष्ट्रीय शास्त्र फौंडेशन ने अनुदान दिले आहे.

या तंत्रज्ञानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी ः https://youtu.be/1aAx2uWcENc

भारत

आजवर केवळ सिनेमामध्ये पाहत असलेल्या प्रतिमांकनांचे तंत्र आता प्रत्यक्षामध्ये आणण्यात यश आले आहे. सामान्यतः बहुतांश त्रिमितीय डिस्प्ले तंत्रामध्ये तुम्हाला पडद्याकडे पाहावे लागते. मात्र या तंत्रामुळे तयार होणारी त्रिमितीय प्रतिमा आपण कोणत्याही कोनातून पाहू शकतो. - प्रो. डॅनिअल स्मॉली, विद्यूत अभियांत्रिकी, ब्रिघम यंग विद्यापीठ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com