agricultural stories in Marathi, Technowon, Hologram experts can now create real-life images that move in the air | Agrowon

हवेतील त्रिमितीय प्रतिमेशी बोलणेही शक्य

वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

हवेसोबत हलू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रतिमा तयार करण्यामध्ये ब्रिघम यंग विद्यापीठातील होलोग्राम तज्ज्ञांना यश आले आहे. लेसर किरणांच्या साह्याने तयार केलेल्या या प्रतिमेशी बोलणेही शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर सायंटिफिक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

हवेसोबत हलू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रतिमा तयार करण्यामध्ये ब्रिघम यंग विद्यापीठातील होलोग्राम तज्ज्ञांना यश आले आहे. लेसर किरणांच्या साह्याने तयार केलेल्या या प्रतिमेशी बोलणेही शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर सायंटिफिक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

स्टारट्रेक सारख्या सायन्स फिक्शन सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे लेसर किरणांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. लाल किंवा हिरव्या रंगामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती सदृश व्यक्ती अचानक आपल्यासमोर बोलताना दाखवलेली असते. सिनेमामध्ये ते केवळ संगणकीय करामतीद्वारे केलेले असतो. मात्र आता वास्तवातही एका जागेवरील व्यक्तीच्या प्रतिमा त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी तयार करणे शक्य होणार आहे. कोणत्याही अन्य साधनांशिवाय साध्या डोळ्यांनी त्या पाहता येतील. ब्रिघम यंग विद्यापीठातील विद्यूत अभियांत्रिकीचे प्रो. डॅनिअल स्मॉली आणि सहकाऱ्यांनी तीन वर्षापूर्वी कोणत्याही पडद्याशिवाय (स्क्रीन) उपलब्ध अवकाशामध्ये तरंगत्या चित्रांची प्रतिमा उभी करण्याचे तंत्र विकसित केले. या तंत्राला ऑप्टिकल ट्रॅप डिस्प्ले असे म्हणतात. त्यात हवेतील कणांना लेसर किरणांच्या साह्याने पकडून ते सारे कण एकत्र आणले जाते. त्यातून संगणकावर उमटलेली कोणतीही प्रतिमा त्याच वेळी हवेमध्ये तरंगत्या स्वरूपामध्ये तयार केली जाते. हे काहीसे थ्री डी प्रिंटिंग तंत्राप्रमाणे (पण केवळ प्रकाशकणांसाठी) आहे.
यातून प्रत्यक्ष त्याच वेळेवर एकमेकाशी समोरासमोर बोलणेही शक्य होणार आहे. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा बनवणे शक्य आहे. पातळ हवेमध्ये साध्या अॅनिमेशन तयार करण्याचे तंत्र अधिक प्रगत करण्याच्या या संशोधन प्रकल्पासाठी राष्ट्रीय शास्त्र फौंडेशन ने अनुदान दिले आहे.

या तंत्रज्ञानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी ः
https://youtu.be/1aAx2uWcENc

भारत

 

आजवर केवळ सिनेमामध्ये पाहत असलेल्या प्रतिमांकनांचे तंत्र आता प्रत्यक्षामध्ये आणण्यात यश आले आहे. सामान्यतः बहुतांश त्रिमितीय डिस्प्ले तंत्रामध्ये तुम्हाला पडद्याकडे पाहावे लागते. मात्र या तंत्रामुळे तयार होणारी त्रिमितीय प्रतिमा आपण कोणत्याही कोनातून पाहू शकतो.
- प्रो. डॅनिअल स्मॉली,
विद्यूत अभियांत्रिकी, ब्रिघम यंग विद्यापीठ.

 


इतर टेक्नोवन
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जमिनीतील ओलावादर्शक उपकरणशेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत,...
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील...
निसर्गाप्रमाणे प्रकाशाचे ग्रहण करणारा...निसर्गामध्ये वनस्पती आणि जिवाणूंकडून...
लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी...अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील...
मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार...नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील...
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे,...मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या...
पेरोव्हस्काइट सौरसेल ः सौर...अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व...
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित...भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे...
बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन्...ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान...
वापर बीबीएफ यंत्राचा...बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या...
पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात...किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला...
पदार्थांची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी ‘...फळे आणि भाजीपाल्यापासून तयार होणाऱ्या...
डीफ्युजर’ तंत्राने वाढवली सिंचन...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...ऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस सुधारणा...