agricultural stories in Marathi, Technowon, impliment for soil and water conservation in farm | Agrowon

मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

डॉ. टी. बी. बास्टेवाड
शनिवार, 21 ऑगस्ट 2021

कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे पाणी अडवून तिथेच मुरवण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करून मूलस्थानी जलसंधारण केले जाते. बंदिस्त वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित करण्यात आले आहे.

सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी उत्पादनासाठी प्रामुख्याने जमीन, पाणी आणि हवामान या महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची आवश्यकता असते. जमीन ही मूलभूत साधनसंपत्ती असून, त्यापासून शाश्‍वत उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवली पाहिजे. धूप थांबवण्याबरोबरच महाराष्ट्रात दर तीन ते चार वर्षांनी येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतामध्येच पाणी अडविणे व साठविणे हे मोठे आव्हान आहे. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात थांबवून जिरवला पाहिजे. याला मूलस्थानी जलसंधारण असे म्हणतात. पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाचा पीक संगोपन व वाढीकरिता कार्यक्षम उपयोग करून घेतल्यास पीक उत्पादनात निश्‍चित शाश्‍वतता आणता येईल.

कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणामुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून पिकाच्या संवेदनशील अवस्थेत उपयोगात येतो. परिणामी उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ मिळते. कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसावर अवलंबून नसून ती पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी जमिनीत मुरणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाचे पाणी वाचविण्याचा सर्वांत कार्यक्षम आणि स्वस्त मार्ग जमिनीत मूलस्थानी जलसंधारणद्वारे मुरवून पाणी ठेवणे. माती आणि जलसंधारणाच्या प्रभावी पद्धतींपैकी एक म्हणजे शेतात बंदिस्त वाफे तयार करणे. उताराला आडवे वाफे व उभे वाफे समांतर अंतराने जोडून बंदिस्त वाफे तयार करता येतात.

सध्या शेतीमध्ये बंदिस्त वाफे हे पारंपरिक पद्धतीने बनविले जातात. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतमजुरांची अधिक आवश्यकता भासते. हे अधिक कष्टाचे काम असून, वाढलेल्या मजुरीमुळे खर्च वाढत चालला आहे. या काळात शेतमजुरांचीही टंचाई भासते. अशा परिस्थितीत जलद आणि कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करण्यासाठी यंत्र अधिक उपयुक्त ठरते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित केले आहे. या यंत्राने ६ मीटर लांबी व २ मीटर रुंदी असलेले बंदिस्त वाफे तयार करता येतात. वाफ्याच्या वरंब्याची उंची साधारणपणे २० ते २२ सें. मी. राहते. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी मुरवणे किंवा वाहून जाणारे पाणी अडवणे शक्य होते.

फायदे ः

  • जमिनीमध्ये ५० टक्के जास्त ओल साठवली जाते.
  • पाण्याची व मातीची धूप रोखते, आर्द्रता वाचते आणि पिकाचे उत्पादन वाढते.
  • या यंत्राच्या फार्मर्स फर्स्ट प्रकल्प, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, राहुरी; कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर प्रक्षेत्रावर चाचण्या घेण्यात आल्या. या यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता खूप चांगली आहे. त्यात रब्बी ज्वारीसाठी जमिनीत परतीच्या पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार केल्यामुळे रब्बी ज्वारीचे उत्पादन २ ते ३ क्विंटल पर्यंत वाढल्याचे आढळले.

वैशिष्ट्ये ः

  • हे यंत्र ३५ अश्‍वशक्ती किंवा त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
  • या यंत्राने एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करणे शक्य.
  • यंत्राच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ३० ते ४० टक्के बचत होते.
  • पावसावर अवलंबून असणाऱ्या (कोरडवाहू) पिकांसाठी जास्त फायदेशीर ठरते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, डाळी आणि तेल बियाणे, काही नगदी पिके उदा. कापूस, एरंडेल आणि भुईमूग इ. परिणामी पिकांचे उत्पादन वाढते.

डॉ. टी. बी. बास्टेवाड, ९४२३३४२९४१
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...