agricultural stories in Marathi, technowon, jambhul processing machines | Agrowon

यंत्राने काढा जांभळाचा गर

प्रमोद बकाने, अश्विनी गावंडे, मिलिंद डोंगरदिवे
सोमवार, 27 मे 2019

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे वेळ, मनुष्यबळ कमी लागते. गराची प्रत सुधारते. प्रक्रिया उद्योगासाठी हा गर फायदेशीर ठरतो.

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे वेळ, मनुष्यबळ कमी लागते. गराची प्रत सुधारते. प्रक्रिया उद्योगासाठी हा गर फायदेशीर ठरतो.

१) जांभूळ हे बहुगुणी झाड आहे. याचे पान, लाकूड, फळ, बियांचा उपयोग होतो. फळाची चव आंबट, तुरट, गोड असते.
२) जांभूळ हे पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. कावीळ, रक्तदोषविकार या आजारांवर जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो.
३) जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक तर किंचित प्रमाणात जीवनसत्त्व ब असते.
४) जांभळामध्ये प्रथिने खनिजे, तंतुमय पदार्थ असतात. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही असते.
५) जांभळाच्या बियांमध्ये ग्लुकोसाईड जाम्बोलीन हा ग्लुकोजचा प्रकार असतो. यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेहावर गुणकारी आहे.
६) जांभूळ हे रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणारे उत्तम फळ आहे. जांभूळ हे पाचक आहे. ते पित्त कमी करणारे असून थकवाही दूर करते. जांभूळ हे रक्त शुद्ध करते.
७) जांभळाच्या सेवनाने कमकुवत दात, हिरड्या घट्ट होतात.

जांभळाचे फळ नाशवंत असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी चांगली संधी आहे. जांभळाच्या गरासून जाम, जेली, वाईन, व्हिनेगार हे मूल्यवर्धित पदार्थ बनविता येतात.त्यामुळे गृहउद्योगाला चांगली संधी आहे. जांभूळाची तोडणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि हमाली खर्चामुळे उत्पादकास बऱ्याच वेळा नुकसान होते. बाजारभाव कमी मिळतो. हे लक्षात घेऊन जांभळाचा गर काढून तो वर्षभर प्रक्रियेसाठी वापरता येतो.
१) जांभळाचा गर एलडीपी(प्लॅस्टिक) पिशवीमध्ये सीलबंद करून -२० अंश सेल्सिअस तापमानामध्ये डीपफ्रिजमध्ये ठेवावा. एक वर्षापर्यंत गर टिकतो. हा गर गैरहंगाम विक्री करून नफा वाढविणे शक्य आहे.

जांभळाचा गर काढणारे यंत्र ः

१) जांभळाचा गर काढणे ही मोठी अडचण आहे. हा गर बियापासून हाताने वेगळा करताना मजूर आणि कालावधी जास्त लागतो. खर्च वाढतो. हाताळणीमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर निष्कासन यंत्र विकसित केले आहे.
२) यंत्रामुळे वेळ, मनुष्यबळ कमी लागते. गराची प्रत सुधारते. हंगाम नसतानासुद्धा गर उपलब्ध होतो. या यंत्रातून ताशी ८० किलो जांभळाचा गर काढला जातो.
३) यंत्राद्वारे काढलेल्या गराची प्रत चांगली असल्यामुळे बाजारभावात वाढ मिळते.

संपर्क ः प्रमोद बकाने, ९८५०७७०८७०
(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)


इतर टेक्नोवन
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रेटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे...
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख...जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर...
धान्य, हळद साठवणुकीसाठी हर्मेटिक...हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद...
काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मितीजिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा...
भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक...देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत...
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप' आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले...