चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील प्रथिने, क्षार

चीज प्रक्रिया उद्योगामधील निवळीतील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ‘इलेक्ट्रोकेमिकल रिडॉक्स डिसलायनेशन’ प्रक्रिया विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. निवळीमधील क्षारांचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाल्याने, त्यातील मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रथिने वापरता येतात.
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील प्रथिने, क्षार
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील प्रथिने, क्षार

चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या उपपदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, अन् तेच प्रदूषणाचे कारण ठरत आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये हे क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ‘इलेक्ट्रोकेमिकल रिडॉक्स डिसलायनेशन’ प्रक्रिया विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. निवळीमधील क्षारांचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाल्याने, त्यातील मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रथिने वापरता येतात. अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने एकूण चीज उद्योगातून बाहेर पडणाऱ्या निवळी (व्हे)मुळे ८३ टक्के पाणी प्रवाह प्रदूषित होतात. पर्यावरणासाठी वाढत असलेल्या समस्येच्या निराकरणासाठी अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील रसायन आणि जैवमूलद्रव्यीय अभियांत्रिकीचे प्रो. झियाओ स्यू यांनी अत्याधुनिक विद्यूतरासायनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष केमिकल इंजिनिअरिंग जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. नव्या तंत्रामुळे होणारे फायदे पारंपरिक निःक्षारीकरणाच्या तुलनेमध्ये विद्युत रासायनिक निःक्षारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ७३ टक्के कमी ऊर्जा लागते, तर खर्चात ६२ टक्के घट होते. त्याविषयी माहिती देताना स्यू म्हणाले, की दूग्ध प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडणाऱ्या निवळी (व्हे)तील प्रथिने महत्त्वाची असली, तरी त्यापेक्षा अधिक शिल्लक राहणाऱ्या निवळीमुळे पर्यावरणावर अनेक विपरीत परिणाम होतात. चीज उद्योगातील निवळीमध्ये क्षार आणि खनिजांची तीव्रता अधिक असते. त्यामुळे त्याचा वापर अन्य कारणांसाठी होत नाही. ते आजवर वाया जात होते. त्याचा वापर होऊ लागले. ...अशी आहे रचना

  • रासायनिक रिडॉक्स आणि डायलिसिस प्रणालीच्या एकत्रीकरणातून उपकरण तयार केले आहे. हे उपकरण बॅटरीच्या सेलपेक्षा फारसे वेगळे नाही.
  •  या प्रक्रियेमध्ये दोन स्वतंत्र पोकळ्या असतात. त्यातील एकात निवळी, तर दुसऱ्यात इलेक्ट्रोड्स असून, त्या दरम्यान आयन देवाणघेवाणासाठी प्रतले असतात.
  •  ही सलग चालणारी निक्षारीकरण प्रक्रिया आहे. त्यातून कोणत्या परिणामाविना नैसर्गिक अशी व्हे प्रथिने मिळवता येतात.
  • तसेच रिडॉक्स स्पेसिजचा मूलद्रव्यीय आकार हा प्रतलाच्या छिद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. म्हणजेच त्यातून क्षार प्रथिनांमध्ये येऊ शकत नाहीत.
  •  ही रिडॉक्स माध्यमात इलेक्ट्रोडायलिसिस प्रणाली अन्न प्रक्रिया उद्योगासाठी क्रांतिकारक ठरणार असल्याचा दावा किम स्यू यांनी केला आहे. कारण त्यातून प्रदूषणाची समस्या कमी होणार असून, त्यातून मिळणारी उपयुक्त प्रथिनेही कुपोषणाच्या समस्येवरही तोडगा ठरणार आहेत.
  • अशा प्रकारे चालते ही यंत्रणा प्रथिनांच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये धनभारित सोडिअम आयन खाद्यातून बाजूला होऊन रिडॉक्स पोकळीत येतात. ऋणभारीत इलेक्ट्रोडवर जमा होतात. त्याचवेळी ऋणभारीत क्लोराइड आयन रिडॉक्स पोकळीत येतात. तेथे धनभारित इलेक्ट्रोडवर त्यांचे ऑक्सिडीकरण होते. पुढे या पोकळीतून सोडियम क्लोराइड (म्हणजेच मीठ) वेगळे करता येते. त्याचा वापर पुढील चीजनिर्मितीमध्ये सीझनिंगसाठी करता येतो. थोडक्यात, या संपूर्ण प्रक्रियेतून कोणताही टाकाऊ पदार्थ बाहेर पडत नाही. या यंत्रणेची प्रथिने शुद्धीकरण आणि क्षार मिळवण्याची कार्यक्षमता अधिक आहे. ती अनेक वेळा, स्थिर व शाश्‍वतपणे चालू शकते, अशी माहिती स्यू यांनी दिली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com