agricultural stories in Marathi, Technowon, Less salt, more protein -Researchers address dairy processing's environmental, sustainability issues | Agrowon

चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील प्रथिने, क्षार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

चीज प्रक्रिया उद्योगामधील निवळीतील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ‘इलेक्ट्रोकेमिकल रिडॉक्स डिसलायनेशन’ प्रक्रिया विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. निवळीमधील क्षारांचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाल्याने, त्यातील मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रथिने वापरता येतात.

चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या उपपदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, अन् तेच प्रदूषणाचे कारण ठरत आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये हे क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ‘इलेक्ट्रोकेमिकल रिडॉक्स डिसलायनेशन’ प्रक्रिया विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. निवळीमधील क्षारांचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाल्याने, त्यातील मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रथिने वापरता येतात.

अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने एकूण चीज उद्योगातून बाहेर पडणाऱ्या निवळी (व्हे)मुळे ८३ टक्के पाणी प्रवाह प्रदूषित होतात. पर्यावरणासाठी वाढत असलेल्या समस्येच्या निराकरणासाठी अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील रसायन आणि जैवमूलद्रव्यीय अभियांत्रिकीचे प्रो. झियाओ स्यू यांनी अत्याधुनिक विद्यूतरासायनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष केमिकल इंजिनिअरिंग जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

नव्या तंत्रामुळे होणारे फायदे
पारंपरिक निःक्षारीकरणाच्या तुलनेमध्ये विद्युत रासायनिक निःक्षारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ७३ टक्के कमी ऊर्जा लागते, तर खर्चात ६२ टक्के घट होते. त्याविषयी माहिती देताना स्यू म्हणाले, की दूग्ध प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडणाऱ्या निवळी (व्हे)तील प्रथिने महत्त्वाची असली, तरी त्यापेक्षा अधिक शिल्लक राहणाऱ्या निवळीमुळे पर्यावरणावर अनेक विपरीत परिणाम होतात. चीज उद्योगातील निवळीमध्ये क्षार आणि खनिजांची तीव्रता अधिक असते. त्यामुळे त्याचा वापर अन्य कारणांसाठी होत नाही. ते आजवर वाया जात होते. त्याचा वापर होऊ लागले.

...अशी आहे रचना

  • रासायनिक रिडॉक्स आणि डायलिसिस प्रणालीच्या एकत्रीकरणातून उपकरण तयार केले आहे. हे उपकरण बॅटरीच्या सेलपेक्षा फारसे वेगळे नाही.
  •  या प्रक्रियेमध्ये दोन स्वतंत्र पोकळ्या असतात. त्यातील एकात निवळी, तर दुसऱ्यात इलेक्ट्रोड्स असून, त्या दरम्यान आयन देवाणघेवाणासाठी प्रतले असतात.
  •  ही सलग चालणारी निक्षारीकरण प्रक्रिया आहे. त्यातून कोणत्या परिणामाविना नैसर्गिक अशी व्हे प्रथिने मिळवता येतात.
  • तसेच रिडॉक्स स्पेसिजचा मूलद्रव्यीय आकार हा प्रतलाच्या छिद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. म्हणजेच त्यातून क्षार प्रथिनांमध्ये येऊ शकत नाहीत.
  •  ही रिडॉक्स माध्यमात इलेक्ट्रोडायलिसिस प्रणाली अन्न प्रक्रिया उद्योगासाठी क्रांतिकारक ठरणार असल्याचा दावा किम स्यू यांनी केला आहे. कारण त्यातून प्रदूषणाची समस्या कमी होणार असून, त्यातून मिळणारी उपयुक्त प्रथिनेही कुपोषणाच्या समस्येवरही तोडगा ठरणार आहेत.

अशा प्रकारे चालते ही यंत्रणा
प्रथिनांच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये धनभारित सोडिअम आयन खाद्यातून बाजूला होऊन रिडॉक्स पोकळीत येतात. ऋणभारीत इलेक्ट्रोडवर जमा होतात. त्याचवेळी ऋणभारीत क्लोराइड आयन रिडॉक्स पोकळीत येतात. तेथे धनभारित इलेक्ट्रोडवर त्यांचे ऑक्सिडीकरण होते. पुढे या पोकळीतून सोडियम क्लोराइड (म्हणजेच मीठ) वेगळे करता येते. त्याचा वापर पुढील चीजनिर्मितीमध्ये सीझनिंगसाठी करता येतो. थोडक्यात, या संपूर्ण प्रक्रियेतून कोणताही टाकाऊ पदार्थ बाहेर पडत नाही.
या यंत्रणेची प्रथिने शुद्धीकरण आणि क्षार मिळवण्याची कार्यक्षमता अधिक आहे. ती अनेक वेळा, स्थिर व शाश्‍वतपणे चालू शकते, अशी माहिती स्यू यांनी दिली.


इतर टेक्नोवन
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...
हाडावर वाढवता येईल संगणक!हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार...
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने...एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...